Samet: Bridging Differences in Live-In Relationships Through Unconventional Solutions -मराठी एकांकिका script
एका फ्लॅट चा मोठा लिविंग रूम. मधोमध मोठा सोफा मध्ये सेंटर टेबलं त्यावरती एक वाझ आणि त्याच्या दोन हि बाजूला सिंगल चेअर.सोफ्याच्या मागे गॅलरी तिथे प्लेन पांढऱ्या रंगाचे पडदे लावले आहेत. हॉल च्या दरवाजा मधून याकूब आणि आदित्य दोघेही 28 वर्षीय तरुण एन्ट्री घेतातं. पहिले याकूब बोलत बोलत आत येतो. त्याच्या मागून आदित्य त्याला समजावण्याच्या सुरात बोलत येत असतो. आदित्य -याकूब,dont behave like teenager ! मला एक समजत नाही कि तू एक तगडा 28 वर्षाचा गोल्ड मेडल विनर पोलीस ऑफिसर आहेस कि,१७/१८ वर्षाचा एक तर्फी प्रेमात पडलेला चॉकलेट बॉय ! याकूब – आणि मिस्टर आदित्य……. मला एक समजत नाही, तू माझा मित्र आहेस कि तिचा वकील ? तिचे प्रत्येक म्हणणे तुला बरोबर वाटते! आदित्य- हो हो मला तिचेच म्हणणे बरोबर वाटते . कारण मी तुझा लहानपणा पासूनचा मित्र आहे. तू अभ्यासात जसा हुशार होतास तसाच कराटे, बॉक्सिंग, स्विमिंग यामध्ये पण चॅम्पियन होतास तू ,कॉलेज मध्ये मॅचो मॅन म्हणून फेमस झाला होतास तू, कॉलेज मधल्या भरपूर मुली तुझ्यावर फिदा झाल्या होत्या. तुझ्या मध्ये झालेला प्रत्येक बदल मी नोटीस करतो. वयाच्या १७/१८ वर्षांपासून तू तर मुलींच्या बाबतीत प्लेबॉय नंबर वन होतास ! दर २/३ महिन्याने नवीन मैत्रीण असायची.! एक्दम हायपर सेक्सऊलीटी डेव्हलप झाली होती तुझ्यामध्ये ! त्यात आणखी चेनस्मोकर सारखी सिग्रेट आणि दारूची भर पडली ! मला तर भीती वाटत होती कधी बलात्काराचा अपराध तर घडणार नाही ना तुझ्या हातून !!!...