रोहित–रोहिणी नावाचे नवरा-बायको पळत पळत पोलीस स्टेशन मध्ये शिरले आणि पोलिसां समोर हात जोडून बोलू लागले…
” साहेब- साहेब आत्ताच्या आत्ता आमच्या बरोबर या बाजूच्या भैरव टॉवर मध्ये चला. आणि तिथे आम्हा दोघांच्या हातात बेड्या ठोकून जेल मध्ये टाका!!”
त्यांची हि विचित्र मागणी ऐकून पोलीस स्टेशन मधला प्रत्येक जण गोंधळून गेला.
“काय, तुमच्या हातात बेड्या ठोकून जेल मध्ये टाकू! ते कशाला ?” इन्स्पेक्टर रविशंकर बोलले.
” ते सांगायला वेळ नाहीये साहेब. भैरव टॉवर हा बघा इथे बाजूलाच आहे. आमच्या बरोबर तिथे चला.”रोहीत रविशंकरच्या हाताला पकडून ओढत-ओढत म्हणाला.
हे बघून रोहिणी ने सुद्धा तिथल्या एका महिला पोलिसांचा हात पकडून तिला स्वतः बरोबर घेऊन जाऊ लागली. पोलीस स्टेशन आणि भैरव टॉवर मध्ये एका भिंतीचे अंतर होते. पाच मिनिटात, ते टॉवर च्या पायथ्या शी पोहोचले. त्याच वेळी तिथे फायर ब्रिगेड,कुलूप- दार तोडणारे कारपेंटर पण आले.
“ते बघा तिथे २५ व्या मजल्यावर माझ्या ६ महिन्याच्या मुलीला किडनॅप करून ठेवले आहे. ” रोहित वरती बोट दाखवून म्हणाला.
“आम्हाला इथून काहीच दिसत नाही.आणि सूर्याची किरणे डोळ्यात जात असल्या मुळे डोळे पूर्णपणे उघडून बघता येत नाहीये. आपण पहिले वरती जाऊन बघूया.” रविशंकर लिफ्टकडे धावत जाऊन बोलला. त्यांच्या मागोमाग रोहित-रोहिणी, फायर ब्रिगेड ची माणसे आणि कारपेंटर लिफ्टमध्ये शिरले. २५ व्या मजल्यावर लिफ्ट पोहोचल्यावर ती सगळीजण रोहित-रोहिणीच्या मागो-माग एका बेडरूमच्या गॅलरी मध्ये गेले. तिथे रोहित-रोहिणीचे नातेवाईक होते. सगळ्यांनी पारंपारिक भरजरी कपडे दागिने घातले होते आणि घरात एका बाजूला सत्य-नारायणाची पूजा मांडली होती. एवढ्या सगळ्या गर्दीत आणि समारंभात कोणी लहान मुलीला किडनॅप केले ? हा विचार करीत रविशंकर रोहित रोहिणीच्या मागोमाग गॅलरी मध्ये गेला. रविशंकरला बघितल्यावर रोहितच्या वयाचा एक तरुण गॅलरी मधून ओरडला, ” ऋषी, हे बघ पोलीस आलेले आहेत आणि त्यांनी रोहितकाका आणि रोहिणीकाकूंना दोघांना पकडले आहे.”
त्यांचे बोलणे ऐकून रविशंकर ने समोर पहिले तर त्यांना दिसले…
एक 6/7 वर्षाचा मुलगा त्याच फ्लॅट च्या लिविंग रूम च्या गॅलरी मध्ये ६ महिन्याच्या छोट्या मुलीला खांद्यावर घेऊन उभा होता आणि गॅलरी चा दरवाजा त्याने कडी लावून बंद केला होता.
“साहेब आणि मॅडम तुम्ही दोघेही मला आणि रोहिणी च्या हातात बेड्या घाला आणि त्या समोरच्या मुलाला म्हणजे रिशीला दाखवा म्हणजे तो गॅलरी चा दरवाजा उघडून माझ्या मुलीला सोडवेल.” रोहन रवीशंकर आणि त्याच्या बाजूला असलेल्या महिला पोलिसांच्या कानात कुजबुजला.
तेव्हा त्या गर्दीतील २/3 माणसे फायर ब्रिगेडच्या लोकांना घेऊन वरच्या मजल्यावर गेली आणि इतर २/३ माणसे कारपेंटर ला घेऊन गॅलरी चा दरवाजा तोडू लागले.
रविशंकर ने दोघांच्या हातात बेड्या घातल्या आणि त्यांचे बेड्या घातलेले हात ऋषी ला दाखवले. तेव्हा ऋषी म्हणाला,” काय पोलीस अंकल, तुम्ही किती उशिरा आलात. इथे खालीच तुमचे ऑफिस आहे ना.”ऋषी खाली बोट दाखवून म्हणाला. पोलिसांनी खाली बघितले तर तिथून पोलीस स्टेशन चा कंप्लिट एरिया दिसत होता.” मी तुम्हाला इथून किती हाका मारत होतों.”
त्यांचे बोलणे ऐकून तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना हसू आले पण प्रत्येकानी आपले हसणे खाली मान घालून तोंडावर हात ठेऊन आवरले. रविशंकर पण मोठ्या मुश्किलीने आपले हसणे लपवून म्हणाला,”अरे,एवढ्या उंचावरून आम्हाला तुझी हाक ऐकू येत नव्हती. पण आत्ता बघ मी या दोघाना पकडले आहे. तर मग दाराची कडी उघड.”
त्याच वेळी फायर ब्रिगेड चा एक माणूस वरच्या बाल्कनी मधून तिथे उतरला . त्याने रिशीच्या नकळत गॅलरी चा दरवाजा उघडला.तिथून काही माणसे गॅलरी मध्ये आली आणि त्यांनी ऋषी कडून त्या छोटीला खेचून घेण्या चा प्रयत्न केला, पण रिशीच्या खांद्यावर ती ६ महिन्याची मुलगी तशीच होती. रिशीने तिला घट्ट पकडून ठेवले होते. तो तिला सोडत नव्हता. तो पुन्हा म्हणाला,” पोलीस अंकल, तुम्ही या रोहितकाका आणि रोहिणी काकूला जेल मध्ये टाका आणि तिथे त्यांना चांगले मारा. कारण हे दोघे एक नंबर चे चोर आहेत. मी जेव्हा झोपतो तेव्हा हे दोघे माझ्या या छोट्या बहिणीला चोरून घेऊन जातात. पहिले तुम्ही माझ्यासमोर त्यांना जेल मध्ये टाका.”
“साहेब, हा जसे बोलतं आहे तसेच करा,” रोहित पोलिसांच्या बाजूलां उभा राहून पुट-पुटला.
रविशंकरला पण त्या छोट्या किडनॅपरचे म्हणणे मान्य करण्याशिवाय काही पर्याय राहिला नव्हता. त्याने दोघांना पकडून जेल मध्ये टाकले, आणि ऋषी समोर त्या दोघांना हवालदाराकडून खोटे-खोटे फटके मारले.
“हे बघ पोलीस तुझ्या काका-काकूंना मारत आहे ना, आत्ता त्या छोटीला माझ्याकडे दे .”असे म्हणून रविशंकर त्याच्या कडून घेऊ लागला तेवढ्यात ऋषी म्हणाला, “आई, हे घे आपल्या स्वीटी ला सांभाळ. आत्ता हे दोघे तिला परत चोरून नेणार नाही. जसे तिला हॉस्पिटल मध्ये जन्माला आल्यावर घेऊन गेले होते तसे.”असे म्हणून ऋषी ने त्या छोट्या मुलीला आई कडे दिले. त्याचे बोलणे ऐकल्या वर रविशंकर ला धक्काच बसला. तेव्हा त्याने ऋषी आणि ऋषी बरोबर आलेल्या प्रत्येकाला जायला सांगितले. ते गेल्या नंतर त्याने रोहित-रोहिणीला लॉकर मधून बाहेर यायला सांगितले आणि चौकशी करण्या साठी समोर खुर्चीत बसवले.
“आत्ता बोला, हा सगळा काय प्रकार आहे?”रविशंकर.
” ऋषी माझ्या सक्ख्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. आणि त्याने किडनॅप केलेली छोटी मुलगी स्वाती माझी आहे.”रोहिणी.
“तुमची मुलगी ? मग ऋषी असे का म्हणत होता कि हॉस्पिटल मध्ये जन्माला आल्यावर तुम्ही तिला चोरून नेले? ” रविशंकर आश्चर्याने म्हणाला.
“साहेब, आपण सरोगेट मदर किंवा सरोगसी बद्दल ऐकले आहे का ?” रोहित म्हणाला.
“हो ऐकले आहे पण त्याचा इथे काय संबंध ?”रविशंकर.
” साहेब, माझ्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम होता. ४ महिन्या नंतर आपोआप गर्भपात होत होता. दोन दा माझा नैसर्गिक गर्भपात झाला होता. तेव्हा डॉक्टर ला दाखवल्यावर त्यांनी सांगितले कि माझे गर्भाशय छोटे असल्या मुळे त्यात ४ महिन्या पेक्षा जास्त मोठा गर्भ मावत नव्हता,आणि त्यामुळे आपोआप गर्भपात होत होता. तरी डॉक्टरांनी सांगितले कि निराश होऊ नका. या वर उपाय आहे. सरोगसी करण्याचा. म्हणजे तुमचा गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात सोडला जाईल आणि तिच्या पोटी तुमचे अपत्य जन्माला येईल.”रोहिणीने माहिती सांगितली.
“ओ हो, म्हणजे तुमची ती ६ महिन्याची मुलगी तुमच्या मोठ्या बहिणीच्या पोटी जन्माला आली होती बरोबर ना?”रविशंकर.
“हो बरोबर,आणि त्या साठी डॉक्टरांनी एखाद्या विवाहित तसेच जिला एक अपत्य असेल अशा महिलेची निवड करायला सांगितले. यासाठी डॉक्टरांनी ४/५ महत्वाची कारण सांगितली- जर ती विवाहित असेल तर तिच्या नवऱ्याची पूर्णपणे सहमती असायला हवी. त्यामुळे तिच्या गरोदरपणात तिच्या आजूबाजूच्या परिसरात तिला जी लोक जुजबी ओळखत असतील ते तिच्या चारित्र्यावर संशय घेणार नाहीत. तसेच अगोदर एक अपत्य असेल तर तिला गरोदर पणाचा चांगला अनुभव असतो आणि दुसऱ्या अपत्याला जन्माला घातल्या नंतर त्यात ती मानसिक रित्या जास्त गुंतून जात नाही.
डॉक्टरांच्या या अटी ऐकल्यावर आम्हाला एक च महिला योग्य वाटली ती म्हणजे माझी ताई. तिला आणि तिच्या नवऱ्याला या बद्दल सांगितल्या वर त्यांनी एका क्षणाचा विलंब न करता होकार दिला,” रोहिणी.
“काय नाव आहे तुमच्या मोठ्या बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे ?”रविशंकर.
“माझ्या मोठ्या बहिणीचे, रागिणी आणि तिच्या नवऱ्याचे राकेश. रागिणीने माझा गर्भ तिच्या उदरात उत्तम रित्या काळजी घेऊन वाढवला. आणि प्रसूती नंतर म्हणजे माझ्या मुलीला स्वातीला माझ्या मांडीवर ठेवले. आणि म्हणाली-
“रोहिणी, हि तुझी ठेव आहे,सांभाळ तिला.”असे म्हणून आम्ही सगळी जण त्या नवजात शिशुकडे कौतुकाने बघत होतो.
पण या सगळ्या प्रकारात आम्ही ५ वर्षाच्या ऋषी चा काही विचार केलाच नव्हता. रागिणीच्या घरून आम्ही अनेकदा बॅग, कधी-कधी कपडे,साड्या, स्वयंपाकाची भांडी, मोबाइलचा चार्जेर, लॅपटॉप अशा वस्तू वापरण्यासाठी घेत होतो. तेव्हा ऋषी आमच्या वर खूप ओरडायचा रडायला लागायचा. हि प्रत्येक लहान मुलाची नैसर्गिक मानसिकता असते. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो किंवा कधी कधी जाणून-बुजून त्याला चिडवण्यासाठी त्याच्या समोर वस्तू घेऊन जायचो. या थट्टा-मस्करीची एवढी मोठी शिक्षा मिळेल,याची कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती.
त्या दिवसात ऋषी, रागिणी आणि राकेश कडे बाळ पाहिजे,मला एक बहीण हवी असा सारखा हट्ट करीत होता. तेव्हाच सरोगसी मुळे रागिणी गरोदर झाली आणि तिचे पोट दिसू लागले तेव्हा ऋषी ला समजले कि आपल्या कडे बाळ येणार आहे. तो खुशीने नाचायला लागला. आपल्या मित्रांना -मैत्रिणींना जो भेटेल त्याला सांगू लागला कि माझ्याकडे एक बाळ येणार आहे! रागिणीला जेव्हा डिलिव्हरी साठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होतें तेव्हा, ऋषी पण हट्ट करून हॉस्पिटल मधेच थांबला. आणि आम्ही जेव्हा स्वाती ला घेऊन जाऊ लागलो तेव्हा रिशीने आरडा-ओरड करून हॉस्पिटल मधे खूप तमाशा केला. मोठ्या मुश्किलीने त्याच्या आई-वडलांनी त्याला समजावले आणि वेळ मारून नेली.”
काही दिवसानंतर राकेश ला अमेरिकेत जॉब मिळाला आणि तो रागिणी आणि ऋषी बरोबर यु .एस. ला जायला निघाला. तेव्हा सुद्धा ऋषी एअरपोर्ट वर स्वाती ला घेऊन चला, स्वाती कुठे आहे, असे विचारत होता. पण फ्लाईट रात्रीची होती आणि टेक ऑफ च्या अगोदर ऋषी ला झोप लागली. त्यामुळे त्याचा काही त्रास झाला नाही. पण तिथे पोहोचल्यावर सुद्धा रिशीने सगळ्यात अगोदर स्वातीची चौकशी केली. तेव्हा रागिणीने त्याला काहीतरी सांगून शांत केले. काही दिवसानंतर ऋषी तिथल्या जीवनशैलीत रुळला. त्याचे स्वाती साठी हट्ट करणे पण कमी झाले. आम्हाला सगळ्यांना वाटले कि ऋषी आता स्वातीला विसरून गेला आहे. पण आत्ता आम्हाला कळले कि हा सगळा आमचा भ्रम होता.
परवा राकेश च्या बहिणीचे लग्न आहे. आज तिच्या लग्नाचा संगीत समारंभ आहे. या समारंभाच्या गडबडीत माझ्या नकळत ऋषी स्वातीला घेऊन गॅलरी मध्ये गेला आणि दरवाजाची कडी लावली. मी त्याच्यावर लक्ष ठेवून होते पण तरी ५ मिनिटाचे माझे दुर्लक्ष झाले आणि तेवढ्यात रिशीने हे कांड केले. आता मला मोठी काळजी वाटत आहे कि पुढच्या २ दिवसात आम्ही लग्नात शामिल कसे होणार? आणि ऋषी ला स्वाती पासून दूर कसे करणार?”एवढे बोलून रोहिणी कपाळावर हात मारून तशीच बसून राहिली.
“तुमच्या या समस्येचे निराकरण करू शकेल अशी एक व्यक्ती माझ्या ओळखीची आहे,”असे म्हणून रविशंकर ने ड्रॉवर मधून एक विझिटिंग कार्ड काढले. आणि रोहिणी कडे देऊन म्हणाला “याना कॉन्टॅक्ट करून तुमची समस्या सांगा,”
“धन्यवाद साहेब,”रोहित रोहिणी दोघेही एक्दम बोलले आणि पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले.
इथे घरी, संगीत कार्यक्रम खूप रंगात आला होता. कोणी गाणी म्हणत होते तर कोणी आनंदात मस्ती मजेत धुंद होऊन नाचत होते. ऋषी पण स्वाती ला खांद्यावर घेऊन नाचत होता. तेव्हाच रागिणी तिच्या वयाच्या एका महिलेला घेऊन ऋषी जवळ आली आणि म्हणाली ,”ऋषी हि बघ माझी मैत्रीण सुचित्रा हिला तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे, तू असे कर स्वाती ला माझ्या कडे दे”,असे म्हणून रागिणी ने स्वातीला घेतले आणि तिथून निघून गेली.
रागिणी गेल्या नंतर सुचित्राने ऋषी ला हॅलो म्हणून शेक-हॅन्ड केला आणि त्याला एक चॉकलेट दिले. त्यानंतर त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. ऋषी पण तिच्याशी गप्पा मारण्यात रमून गेला. पुढचे दोन दिवस लग्नकार्य संपे पर्यंत सुचित्रा, ऋषी बरोबर राहिली. तिच्या बरोबर असताना ऋषी ने कधी हि स्वाती साठी हट्ट केला नाही. लग्नकार्य झाल्या नंतर ऋषी त्याच्या आई-वडीलां बरोबर जायला निघाला तेव्हा पुन्हा म्हणाला,”आई स्वाती कुठे आहे?”
ऋषींचा हा प्रश्न ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळींच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याच वेळी ऋषीला तिथे खेळत असलेली स्वाती दिसली. ऋषी धावत तिच्याकडे गेला आणि तिला उचलून खांद्यावर घेतले. आणि म्हणाला,”रोहितकाका आणि रोहिणीकाकू, कुठे आहात तुम्ही ?” त्याची हाक ऐकून रोहित रोहिणी, ऋषीच्या समोर आले. “रोहित काका आणि रोहिणी काकू हि घ्या तुमची मुलगी स्वाती. सुचित्रा मॅडम ने मला समजावले कि स्वाती तुमची मुलगी आहे.” असे म्हणून ऋषी त्याच्या आई-वडलांबरोबर निघाला.
ऋषी मध्ये झालेला हा बदल बघून तिथे असलेल्या प्रत्येकाने सुटकेचा श्वास सोडला.
दुसऱ्या दिवशी रोहित-रोहिणी पोलीस स्टेशन च्या समोरून जात असताना त्यांना पोलीस स्टेशन च्या गेट जवळ रविशंकर दिसले. त्यांना बघून रोहित त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला,”धन्यवाद साहेब,त्या दिवशी तुम्ही चाईल्ड सायकिऍट्रिस्टस सुचित्रा चा नंबर दिला.तिने ऋषी चे चांगले समुपदेशन केल्या मुळे रिशीने आम्हाला आमची मुलगी स्वतःहून परत दिली.”
Great goods from you, man. I’ve bear in mind
your stuff previous to and you’re just extremely wonderful.
I really like what you’ve acquired right here, really like
what you are stating and the way during which you assert it.
You make it enjoyable and you still care for to keep
it sensible. I can not wait to read much more from you.
That is actually a wonderful site.
THANX A LOT SAHEB
thanx a lot