Samet: Bridging Differences in Live-In Relationships Through Unconventional Solutions – English Version

  Reconcile (One Act)      one flat of large living Room. A large sofa in the middle of the living room, a center table with a flower pot on it and a chair on either side of it. Behind the sofa, the gallery has white curtains. From the entrance   door of living Room.  Yakub and Aditya both 28 Years Youth. Both come inside discussing. His behind Aditya to explain him   Aditya -Yakub,dont behave like teenager ! I cant understand  that, You are a 28 year old Gold Medal Winner Police Officer or 17/ 18 years old  boy, madly in love !   Yakub – and Mr  Aditya …….  I cant understand  that, You are my friend  or her lawyer ?   You agree with everything she says! Aditya-  Of-course ! I think she is right. Because I am your friend since…

Read More

Samet: Bridging Differences in Live-In Relationships Through Unconventional Solutions -मराठी एकांकिका script

Samet एका फ्लॅट चा मोठा लिविंग रूम. मधोमध मोठा सोफा मध्ये सेंटर टेबलं त्यावरती एक वाझ आणि त्याच्या दोन हि बाजूला सिंगल चेअर.सोफ्याच्या मागे गॅलरी तिथे प्लेन पांढऱ्या रंगाचे पडदे लावले आहेत. हॉल  च्या दरवाजा मधून याकूब आणि आदित्य दोघेही 28 वर्षीय तरुण एन्ट्री घेतातं. पहिले याकूब बोलत बोलत आत येतो. त्याच्या मागून आदित्य त्याला समजावण्याच्या सुरात बोलत येत असतो.   आदित्य -याकूब,dont behave like teenager ! मला एक समजत  नाही कि तू एक तगडा  28 वर्षाचा गोल्ड मेडल विनर  पोलीस ऑफिसर आहेस कि,१७/१८ वर्षाचा एक तर्फी प्रेमात पडलेला चॉकलेट बॉय !   याकूब – आणि मिस्टर  आदित्य……. मला एक समजत नाही, तू माझा मित्र आहेस कि तिचा वकील ?  तिचे  प्रत्येक म्हणणे तुला  बरोबर वाटते!   आदित्य- हो हो मला तिचेच म्हणणे  बरोबर वाटते . कारण मी तुझा लहानपणा पासूनचा मित्र आहे. तू अभ्यासात जसा हुशार होतास तसाच कराटे, बॉक्सिंग, स्विमिंग यामध्ये पण चॅम्पियन होतास तू ,कॉलेज मध्ये मॅचो मॅन म्हणून फेमस झाला होतास तू, कॉलेज मधल्या भरपूर मुली तुझ्यावर फिदा झाल्या होत्या. तुझ्या मध्ये झालेला प्रत्येक बदल मी नोटीस करतो. वयाच्या १७/१८ वर्षांपासून तू तर मुलींच्या बाबतीत प्लेबॉय नंबर वन  होतास ! दर २/३ महिन्याने नवीन मैत्रीण असायची.! एक्दम हायपर सेक्सऊलीटी डेव्हलप  झाली होती तुझ्यामध्ये ! त्यात आणखी चेनस्मोकर  सारखी सिग्रेट आणि दारूची भर पडली ! मला तर भीती वाटत होती कधी बलात्काराचा अपराध तर घडणार नाही ना तुझ्या हातून !!! याकूब – त्या साठी तू मला एका सायकॅट्रिस्ट कडे पाठवले. सायकॅट्रिस्ट कसला,हिप्नॉटिझम चा स्पेसिलीस्ट   होता, त्यांनी माझ्या वर हिप्नॉटिझम चा प्रयोग केला !   आदित्य -(डोक्यावर हात मारून ) तीच माझी घोडचूक झाली ….!!!!! त्यांच्या  हिप्नॉटिझम मुळे तुझे सिग्रेट आणि दारूचे व्यसन सुटले पण ऐश्वर्या नावाचे व्यसन लागले.   याकूब – त्यांनी हिप्नॉटिझम चा एक व्हीडिओ माझ्या मोबईल वर पाठवला.—— (सेट वर ब्लॅक आऊट गॅलरी  चा पांढरा पडदा प्रकाशमान होतो. पडद्यावर फक्त एका माणसाची सिग्रेट ओढताना आणि दारूचे पेग घेत असताना त्याबरोबर मोबाईल बघत असताना एक काळीकुट्ट सावली त्याच्या मागे  चकलीच्या आकाराची एक आकृती गोल गोल फिरायला लागते. ) याकूब – ( व्हॉइस ओव्हर ) आणि तो व्हिडीओ पण अशा वेळी मिळाला जेव्हा मी मस्त आरामात माझ्या घरी ड्रिंक घेत होतो बरोबर मस्त सिग्रेट चा झुरका घेत होतो तेव्हा मोबईल वर हिप्नॉटिझम चा  व्हिडीओ आला, मी त्या व्हिडीओ च्या अमलाखाली असताना माझ्या समोर ऐश्वर्या आली तेव्हा माझ्या हातून सिगरेट आणि दारूचा ग्लास हलकेच गळून पडला आणि मी तिच्या मागोमाग मंतरल्या सारखा बेडरूम मध्ये गेलो. अचानक मी तिला मागून घट्ट पकडले, पहिले तर तिने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण नंतर रागाने  मागे वळून तिने बघितले तेव्हा माझ्या नजरेशी तिची  नजर भिडली आणि तिचा सगळा विरोध गळून पडला नंतर जे काही झाले ते सगळे आमच्या दोघांच्या सहमतीने झाले. (ब्लॅक आऊट ओव्हर आणि व्हॉइस ओव्हर अल्सो फिनिश  ) याकूब – रात्र आम्ही अशीच संपवली. सकाळी मी तिला लग्ना  बद्दल विचारले तर ती म्हणाली  कि तिच्यात आणि माझ्या मध्ये प्रेम नाहीये, फक्त शारीरिक आकर्षण आहे. तेव्हा लग्न न  करता फक्त शरीर संबंध ठेवूया.माझ्या साठी हे एक्दम शॉकिंग होते ! कधी च वाटले नव्हते कि एक स्त्री असे काही बोलू शकते ! आदित्य – आता समजले ? त्या मुलींचे, स्त्रियांचे  दुःख ? जेव्हा तू त्यांना अंगावरच्या कपड्यांसारखे बदलत होता !!! याकूब, तू आणि ती  प्रेमात नव्हता. त्या डॉक्टरांचा  हिप्नॉटिझम चा प्रभाव तुम्हा दोघांवर चुकीच्या पद्धतीने झाला होता. पण ती लवकरच त्या प्रभावातून बाहेर पडली होती. पण तुझयावर ……   याकूब – (दीर्घ श्वास घेऊन )  मी तर अजून त्याच नशेत आहे. त्यानंतर मी सिग्रेट आणि दारूच्या व्यसनातूनन कायमचा  मुक्त झालो, आणि ऐश्वर्या शिवाय आज पर्यंत मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितले पण नाही. आदित्य – तेच तर…. तुझ्या मेंदूवर, तुझ्या मनात सिगरेट आणि दारूची जागा ऐश्वर्याने घेतली. मला वाटले कदाचित डॉक्टरांच्या  हिप्नॉटिझम चा प्रभाव काही दिवसांसाठीच असेल !!   याकूब – म्हणून तू म्हणाला, कि हेच योग्य आहे. एवढेच नाही तर  तू तिचे म्हणणे माझ्या हि गळी उतरवले ! गेले 2 वर्षा  पासून आम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकुन, पूर्ण समाजाला अंधारात ठेवून, बिना लग्नाचे शरीरसंबंध  ठेवले…!   आदित्य -आणि तेच तुझ्या साठी योग्य आहे.  अजून सुद्धा तू तिचा नाद सोड आणि एखादी तुझ्याच मुस्लिम धर्मातील iiमुलगी बघून तिच्याशी लग्न कर. ऐश्वर्या एक 35 वर्षीय आर्थिक दृष्ट्या इंडीपेंडेंट  बिझनेस वुमन आहे. तिच्याशी लग्न करून तिला हिंदू धर्मा मधून मुस्लिम मध्ये कन्व्हर्ट  करण्याचे स्वप्न पाहू नकोस !!   याकूब -( जोरात ओरडून )  शट अप  !  तू माझा लहान पणा पासूनचा मित्र आहेस आणि आत्ता पर्यंत तू मला एवढेच ओळखलेस ? ऐश्वर्याशी तुझी ओळख माझ्या बोलण्यातून 2 वर्षा पूर्वी झाली. आज पर्यंत तू तिला प्रत्यक्ष पहिले सुद्धा नाहीये. तरी सुद्धा तुला तिचेच म्हणणे बरोबर वाटते. तिचे आणि तुझे म्हणणे एकच आहे. तुला पण मी एक लव्ह जिहादी वाटतो ? मी ऐश्वर्या वर खरोखर  प्रेम करतो त्यासाठी मी स्वतः हिंदू मध्ये  कन्व्हर्ट व्हायला तयार आहे!   आदित्य – हे बघ जेव्हा वणवा पेटतो तेव्हा सुक्या बरोबर ओले पण जळते. तसेच तुझ्या बाबतीतही आहे. आजच्या परिस्थितीत मुस्लिम पुरुषाचे हिंदू स्त्री बरोबर प्रेम म्हणजे लव्ह जिहाद ! हेच समीकरण धरले जाते . मला शट अप म्हणून माझे तोंड बंद करशील पण लोकांचे तोंड कसे बंद करशील? आणि लोकांचे जाऊ दे ऐश्वर्याला कसे पाटवशील ?   याकूब – 2 वर्षांपूर्वी तूच मला सांगितले होतेस कि ऐश्वर्या बरोबर तुझे शरीरसंबंध परस्पर सहमतीने होते याचे प्रूफ जमा करून ठेव. त्या प्रमाणे हे बघ मी प्रूफ (असे म्हणून याकूब आदित्य ला मोबईल दाखवतो ) जमा केले आहे. आदित्य – काय आहे हे ? याकूब- हे बघ यामध्ये किती तरी हॉटेल मधली रूम बुकिंग ची  बिले आहेत ती सगळी ऐश्वर्या च्या नावा  वरती आहेत. आणि हा विडिओ बघ ज्यामध्ये ऐश्वर्या बघ काय म्हणते.   ऐश्वर्या- (मोबईल मधील विडिओ मधून आवाज ) आज मी डॉक्टर कडे गेले होते त्यांनी मला अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट दिल्या. खूपच चांगल्या आहेत आणि याचे काही  साइड इफेक्ट पण होणार नाही!   आदित्य – ओ हो खूपच स्ट्रॉंग प्रूफ आहे रे , तुला काय वाटते ? कि तू हा प्रूफ कोर्टात दाखवल्यावर केस    जिंकशील आणि ऐश्वर्या  तुझ्या शी लग्नाला तयार होईल ?   याकूब- अरे पण, या पुराव्याचा काहीच उपयोग नाही आहे का?   आदित्य – मी तुला हे पुरावे यासाठी जमा करून ठेवायला सांगितले कि पुढे जाऊन ऐश्वर्याने तुझ्यावर  सेक्सऊल हॅरॅसमेंट किंवा रेप  ची खोटी केस केली तर हेच पुरावे तुला कोर्टा मध्ये निर्दोष ठरवतील. पण आता सगळा मामालाच उलटा आहे. आत्ता तू तिच्या वर केस करणार आहे आणि ज्या मुद्द्यावरून केस करणार आहेस त्यासाठी या पुराव्याचा काहीच उपयोग होणार नाहीच, उलट कोर्ट तुलाच दोषी ठरवेल ! आणि देव ना करो मीडिया ला या केस बद्दल कळले तर त्याचा 24 तास तमाशा बनवतील. गेले 2 वर्षे एक मी सोडलो तर बाकी कोणालाही तुमच्या शरीर संबधा  बद्दल कानोकान खबर नव्हती पण या केस मुळे जर मीडिया ला समजले तर वर्ल्ड वाईड हि एक ब्रेकिंग न्यूज होईल. मीडिया तर या असल्या मसाल्याची वाटच बघत असते आणि शेवटी या केस चा निर्णय तुझ्या विरोधातच होईल!   याकूब – अरे पण या वर काहीच उपाय नाही का ? आदित्य- या वर  एकच उपाय आहे ते म्हणजे तू ऐश्वर्या बरोबर ब्रेक अप कर. जे तिला हवे आहे ते कर, आणि तिला मोकळे कर !   याकूब – ते शक्य नाही, माझे ऐश्वर्या वर जीवापाड प्रेम आहे, माझे प्रेम हे फक्त शरीर संबधा पुरते राहिले नाही मानसिक रित्या मी तिच्या मध्ये पूर्णपणे गुंतलो आहे. मी तिच्या शिवाय जगूच शकत नाहीये. मला आत्ता तिच्याशी लग्न करून तिच्या मुलाचा बाप बनायचे आहे. आणि यासाठी मला माझा धर्म बदलावा लागला तरी चालेल.   आदित्य – आणि हे असे झाले नाही तर ऐश्वर्याने तरीही तुझ्याशी ब्रेक अप केले तर ? याकूब – संपवून टाकेन!!! पहिले तिला संपवेन आणि नंतर स्वतःला !!!   आदित्य – झाले ? श्री. याकूब आपण मुंबई पोलीस डिपार्टमेंट मध्ये acp च्या पोस्ट वरती काम करीत आहेत. पण  ऐश्वर्यावरच्या  एकतर्फी प्रेमाने तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या त्या गुन्हेगारांच्या जागी बसवले. तुम्ही अगदी सिरफीरे आशिक बनले आहात! आज तुम्ही हिंसा करण्याचा विचार बोलून दाखवत आहात .उद्या खरोखरीचे कराल सुद्धा. तुम्ही हाच हट्ट चालू ठेवला हाच वेडेपणा चालू ठेवला तर मला तुमच्या बरोबर ची लहानपणपासूनची मैत्री संपवावी लागेल आणि ऐश्वर्याच्या सुरक्षेचा विचार करावा लागेल ! आणि तुम्हाला कुठल्या तरी सायकिऍट्रिस्ट ला दाखवावे लागेल !   याकूब- तसे नाही पण मला सुद्धा ऐश्वर्या च्या मर्जी विरुद्ध वागतोय याची अपराधी पणाची भावना मनात घर करून बसली आहे.मनावर प्रचंड ओझे झाले आहे या भावनेचे. या मानसिक तणावातून  पडायचे आहे.   आदित्य- त्यासाठीच तुला आणि ऐश्वर्याला  कोर्टात केस करण्या ऐवजी कौन्सिलिंग इथे माझ्या घरी बोलावले आहे. माझी पत्नी दीपिका हि सिविल कोर्ट मध्ये वकील आहे. त्यामुळे अशा केस कौन्सिलिंग ने कशा सोडवायच्या याचा अनुभव आहे. आत्ता थोड्या वेळात ऐश्वर्या आणि दीपिका येतील.   (आणि त्याच वेळी दीपिका आणि ऐश्वर्या बेडरूम मधून बाहेर येतात पहिले दीपिका येते तिच्या मागोमाग ऐश्वर्या येते.ऐश्वर्य च्या चेहऱ्यावर खूप निराशेचे आणि दुःखी भाव आहे. दीपिका तिला खुर्ची वर बसायला खुणावते. खुर्ची वर बसत असताना तिची नजर याकूबच्या नजरेला भिडते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव एक्दम बदलतात आणि स्तब्ध उभे राहून ती रागाने बघते. तेव्हाच दीपिका तिला बोलते.)   दीपिका – बस ना ऐश्वर्या . याकूब तू पण (ऐश्वर्याच्या समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून) इथे बस. (असे बोलून आदित्य आणि दीपिका दोघे हि मधल्या सोफ्या वर बसतात .)   दीपिका- हं आता बोल ऐश्वर्या काय प्रॉब्लेम आहे तुझा? ऐश्वर्या- हा याकूब, एक नंबरचा “लव्ह जिहादी” आता मला लग्न करून मुस्लिम धर्म मध्ये कॉन्व्हर्ट होण्याची जबरदस्ती करत आहे. आदित्य- ऑब्जेक्शन मॅडम, याकूब ने कधीच कोणाही पासून स्वतःची आयडेंटीटी लपवली नाही. तूम्ही दोघे  हि एका फ्लॅट मध्ये गेले 2 वर्षा पासून as a रूम पार्टनर राहात आहात. त्या फ्लॅट चा मालक याकूब ला याकूब याच नावाने ओळखतो.त्याचं कडे याकूब चे आधार कार्ड आहे ज्यावर त्याचे नाव याकूब आहे. आणि तुमच्या पासून पण त्याने स्वतःची आयडेंटीटी लपवली नव्हती. तुम्हाला याकूब बरोबर फक्त शरीर संबंध ठेवायचे होते याचे पुरावे आहेत आमच्याकडे. हॉटेल ची बिले आहेत आणि विडिओ आहे ज्यामध्ये तुम्हीच अँटी प्रेग्नन्सी गोळ्या घेऊन  याकूब ला शरीरसंबंध चे आव्हान करतानाचे.   ऐश्वर्या- एक्झॅटली, मी अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट घेत होते कारण मी बिझिनेस साठी लोन घेतले आहे. आणि ते फेडण्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. त्यात मला माझी फॅमिली साठी वेळ नाहीये. तर याने माझ्या अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट च्या जागी दुसऱ्या गोळ्या देऊन माझी फसवणूक केली. आणि जेव्हा माझा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा पासून तर मला मारझोड करून लग्नासाठी जबरदस्ती करीत आहे. आणि हे मी खोटे बोलत नाहीये. हे बघा माझ्या चेहऱ्या वर निशाण  आले आहेत. (असे म्हणत ऐश्वर्य स्वतःचा चेहरा दाखवते ) एवढेच नाही तर मी डॉक्टर कडे ऍबॉर्शन साठी जाऊ नये म्हणून काल त्याने मला घरामध्ये कोंडून ठेवले. खोटे वाटत असेल तर त्यालाच विचारा.   आदित्य- याकूब, is it true…

Read More