एका फ्लॅट चा मोठा लिविंग रूम. मधोमध मोठा सोफा मध्ये सेंटर टेबलं त्यावरती एक वाझ आणि त्याच्या दोन हि बाजूला सिंगल चेअर.सोफ्याच्या मागे गॅलरी तिथे प्लेन पांढऱ्या रंगाचे पडदे लावले आहेत.
हॉल च्या दरवाजा मधून याकूब आणि आदित्य दोघेही 28 वर्षीय तरुण एन्ट्री घेतातं. पहिले याकूब बोलत बोलत आत येतो. त्याच्या मागून आदित्य त्याला समजावण्याच्या सुरात बोलत येत असतो.
आदित्य -याकूब,dont behave like teenager ! मला एक समजत नाही कि तू एक तगडा 28 वर्षाचा गोल्ड मेडल विनर पोलीस ऑफिसर आहेस कि,१७/१८ वर्षाचा एक तर्फी प्रेमात पडलेला चॉकलेट बॉय !
याकूब – आणि मिस्टर आदित्य……. मला एक समजत नाही, तू माझा मित्र आहेस कि तिचा वकील ?
तिचे प्रत्येक म्हणणे तुला बरोबर वाटते!
आदित्य- हो हो मला तिचेच म्हणणे बरोबर वाटते . कारण मी तुझा लहानपणा पासूनचा मित्र आहे. तू अभ्यासात जसा हुशार होतास तसाच कराटे, बॉक्सिंग, स्विमिंग यामध्ये पण चॅम्पियन होतास तू ,कॉलेज मध्ये मॅचो मॅन म्हणून फेमस झाला होतास तू, कॉलेज मधल्या भरपूर मुली तुझ्यावर फिदा झाल्या होत्या.
तुझ्या मध्ये झालेला प्रत्येक बदल मी नोटीस करतो. वयाच्या १७/१८ वर्षांपासून तू तर मुलींच्या बाबतीत प्लेबॉय नंबर वन होतास ! दर २/३ महिन्याने नवीन मैत्रीण असायची.! एक्दम हायपर सेक्सऊलीटी डेव्हलप झाली होती तुझ्यामध्ये ! त्यात आणखी चेनस्मोकर सारखी सिग्रेट आणि दारूची भर पडली !
मला तर भीती वाटत होती कधी बलात्काराचा अपराध तर घडणार नाही ना तुझ्या हातून !!!
याकूब – त्या साठी तू मला एका सायकॅट्रिस्ट कडे पाठवले. सायकॅट्रिस्ट कसला,हिप्नॉटिझम चा स्पेसिलीस्ट होता, त्यांनी माझ्या वर हिप्नॉटिझम चा प्रयोग केला !
आदित्य -(डोक्यावर हात मारून ) तीच माझी घोडचूक झाली ….!!!!! त्यांच्या हिप्नॉटिझम मुळे तुझे सिग्रेट आणि दारूचे व्यसन सुटले पण ऐश्वर्या नावाचे व्यसन लागले.
याकूब – त्यांनी हिप्नॉटिझम चा एक व्हीडिओ माझ्या मोबईल वर पाठवला.——
(सेट वर ब्लॅक आऊट गॅलरी चा पांढरा पडदा प्रकाशमान होतो. पडद्यावर फक्त एका माणसाची सिग्रेट ओढताना आणि दारूचे पेग घेत असताना त्याबरोबर मोबाईल बघत असताना एक काळीकुट्ट सावली त्याच्या मागे चकलीच्या आकाराची एक आकृती गोल गोल फिरायला लागते. )
याकूब – ( व्हॉइस ओव्हर ) आणि तो व्हिडीओ पण अशा वेळी मिळाला जेव्हा मी मस्त आरामात माझ्या घरी ड्रिंक घेत होतो बरोबर मस्त सिग्रेट चा झुरका घेत होतो तेव्हा मोबईल वर हिप्नॉटिझम चा व्हिडीओ आला, मी त्या व्हिडीओ च्या अमलाखाली असताना माझ्या समोर ऐश्वर्या आली तेव्हा माझ्या हातून सिगरेट आणि दारूचा ग्लास हलकेच गळून पडला आणि मी तिच्या मागोमाग मंतरल्या सारखा बेडरूम मध्ये गेलो. अचानक मी तिला मागून घट्ट पकडले, पहिले तर तिने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण नंतर रागाने मागे वळून तिने बघितले तेव्हा माझ्या नजरेशी तिची नजर भिडली आणि तिचा सगळा विरोध गळून पडला नंतर जे काही झाले ते सगळे आमच्या दोघांच्या सहमतीने झाले.
(ब्लॅक आऊट ओव्हर आणि व्हॉइस ओव्हर अल्सो फिनिश )
याकूब – रात्र आम्ही अशीच संपवली. सकाळी मी तिला लग्ना बद्दल विचारले तर ती म्हणाली
कि तिच्यात आणि माझ्या मध्ये प्रेम नाहीये, फक्त शारीरिक आकर्षण आहे. तेव्हा लग्न न करता फक्त शरीर संबंध ठेवूया.माझ्या साठी हे एक्दम शॉकिंग होते ! कधी च वाटले नव्हते कि एक स्त्री असे काही बोलू शकते !
आदित्य – आता समजले ? त्या मुलींचे, स्त्रियांचे दुःख ? जेव्हा तू त्यांना अंगावरच्या कपड्यांसारखे बदलत होता !!! याकूब, तू आणि ती प्रेमात नव्हता. त्या डॉक्टरांचा हिप्नॉटिझम चा प्रभाव तुम्हा दोघांवर चुकीच्या पद्धतीने झाला होता. पण ती लवकरच त्या प्रभावातून बाहेर पडली होती. पण तुझयावर ……
याकूब – (दीर्घ श्वास घेऊन ) मी तर अजून त्याच नशेत आहे. त्यानंतर मी सिग्रेट आणि दारूच्या व्यसनातूनन कायमचा मुक्त झालो, आणि ऐश्वर्या शिवाय आज पर्यंत मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितले पण नाही.
आदित्य – तेच तर…. तुझ्या मेंदूवर, तुझ्या मनात सिगरेट आणि दारूची जागा ऐश्वर्याने घेतली. मला वाटले कदाचित डॉक्टरांच्या हिप्नॉटिझम चा प्रभाव काही दिवसांसाठीच असेल !!
याकूब – म्हणून तू म्हणाला, कि हेच योग्य आहे. एवढेच नाही तर तू तिचे म्हणणे माझ्या हि गळी उतरवले ! गेले 2 वर्षा पासून आम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकुन, पूर्ण समाजाला अंधारात ठेवून, बिना लग्नाचे शरीरसंबंध ठेवले…!
आदित्य -आणि तेच तुझ्या साठी योग्य आहे. अजून सुद्धा तू तिचा नाद सोड आणि एखादी तुझ्याच मुस्लिम धर्मातील iiमुलगी बघून तिच्याशी लग्न कर. ऐश्वर्या एक 35 वर्षीय आर्थिक दृष्ट्या इंडीपेंडेंट बिझनेस वुमन आहे. तिच्याशी लग्न करून तिला हिंदू धर्मा मधून मुस्लिम मध्ये कन्व्हर्ट करण्याचे स्वप्न पाहू नकोस !!
याकूब -( जोरात ओरडून ) शट अप ! तू माझा लहान पणा पासूनचा मित्र आहेस आणि आत्ता पर्यंत तू मला एवढेच ओळखलेस ? ऐश्वर्याशी तुझी ओळख माझ्या बोलण्यातून 2 वर्षा पूर्वी झाली. आज पर्यंत तू तिला प्रत्यक्ष पहिले सुद्धा नाहीये. तरी सुद्धा तुला तिचेच म्हणणे बरोबर वाटते. तिचे आणि तुझे म्हणणे एकच आहे. तुला पण मी एक लव्ह जिहादी वाटतो ? मी ऐश्वर्या वर खरोखर प्रेम करतो त्यासाठी मी स्वतः हिंदू मध्ये कन्व्हर्ट व्हायला तयार आहे!
आदित्य – हे बघ जेव्हा वणवा पेटतो तेव्हा सुक्या बरोबर ओले पण जळते. तसेच तुझ्या बाबतीतही आहे. आजच्या परिस्थितीत मुस्लिम पुरुषाचे हिंदू स्त्री बरोबर प्रेम म्हणजे लव्ह जिहाद ! हेच समीकरण धरले जाते . मला शट अप म्हणून माझे तोंड बंद करशील पण लोकांचे तोंड कसे बंद करशील? आणि लोकांचे जाऊ दे ऐश्वर्याला कसे पाटवशील ?
याकूब – 2 वर्षांपूर्वी तूच मला सांगितले होतेस कि ऐश्वर्या बरोबर तुझे शरीरसंबंध परस्पर सहमतीने होते याचे प्रूफ जमा करून ठेव. त्या प्रमाणे हे बघ मी प्रूफ (असे म्हणून याकूब आदित्य ला मोबईल दाखवतो ) जमा केले आहे.
आदित्य – काय आहे हे ?
याकूब- हे बघ यामध्ये किती तरी हॉटेल मधली रूम बुकिंग ची बिले आहेत ती सगळी ऐश्वर्या च्या नावा वरती आहेत. आणि हा विडिओ बघ ज्यामध्ये ऐश्वर्या बघ काय म्हणते.
ऐश्वर्या- (मोबईल मधील विडिओ मधून आवाज ) आज मी डॉक्टर कडे गेले होते त्यांनी मला अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट दिल्या. खूपच चांगल्या आहेत आणि याचे काही साइड इफेक्ट पण होणार नाही!
आदित्य – ओ हो खूपच स्ट्रॉंग प्रूफ आहे रे , तुला काय वाटते ? कि तू हा प्रूफ कोर्टात दाखवल्यावर केस जिंकशील आणि ऐश्वर्या तुझ्या शी लग्नाला तयार होईल ?
याकूब- अरे पण, या पुराव्याचा काहीच उपयोग नाही आहे का?
आदित्य – मी तुला हे पुरावे यासाठी जमा करून ठेवायला सांगितले कि पुढे जाऊन ऐश्वर्याने तुझ्यावर सेक्सऊल हॅरॅसमेंट किंवा रेप ची खोटी केस केली तर हेच पुरावे तुला कोर्टा मध्ये निर्दोष ठरवतील. पण आता सगळा मामालाच उलटा आहे. आत्ता तू तिच्या वर केस करणार आहे आणि ज्या मुद्द्यावरून केस करणार आहेस त्यासाठी या पुराव्याचा काहीच उपयोग होणार नाहीच, उलट कोर्ट तुलाच दोषी ठरवेल ! आणि देव ना करो मीडिया ला या केस बद्दल कळले तर त्याचा 24 तास तमाशा बनवतील. गेले 2 वर्षे एक मी सोडलो तर बाकी कोणालाही तुमच्या शरीर संबधा बद्दल कानोकान खबर नव्हती पण या केस मुळे जर मीडिया ला समजले तर वर्ल्ड वाईड हि एक ब्रेकिंग न्यूज होईल. मीडिया तर या असल्या मसाल्याची वाटच बघत असते आणि शेवटी या केस चा निर्णय तुझ्या विरोधातच होईल!
याकूब – अरे पण या वर काहीच उपाय नाही का ?
आदित्य- या वर एकच उपाय आहे ते म्हणजे तू ऐश्वर्या बरोबर ब्रेक अप कर. जे तिला हवे आहे ते कर, आणि तिला मोकळे कर !
याकूब – ते शक्य नाही, माझे ऐश्वर्या वर जीवापाड प्रेम आहे, माझे प्रेम हे फक्त शरीर संबधा पुरते राहिले नाही मानसिक रित्या मी तिच्या मध्ये पूर्णपणे गुंतलो आहे. मी तिच्या शिवाय जगूच शकत नाहीये. मला आत्ता तिच्याशी लग्न करून तिच्या मुलाचा बाप बनायचे आहे. आणि यासाठी मला माझा धर्म बदलावा लागला तरी चालेल.
आदित्य – आणि हे असे झाले नाही तर ऐश्वर्याने तरीही तुझ्याशी ब्रेक अप केले तर ?
याकूब – संपवून टाकेन!!! पहिले तिला संपवेन आणि नंतर स्वतःला !!!
आदित्य – झाले ? श्री. याकूब आपण मुंबई पोलीस डिपार्टमेंट मध्ये acp च्या पोस्ट वरती काम करीत आहेत. पण ऐश्वर्यावरच्या एकतर्फी प्रेमाने तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या त्या गुन्हेगारांच्या जागी बसवले. तुम्ही अगदी सिरफीरे आशिक बनले आहात! आज तुम्ही हिंसा करण्याचा विचार बोलून दाखवत आहात .उद्या खरोखरीचे कराल सुद्धा. तुम्ही हाच हट्ट चालू ठेवला हाच वेडेपणा चालू ठेवला तर मला तुमच्या बरोबर ची लहानपणपासूनची मैत्री संपवावी लागेल आणि ऐश्वर्याच्या सुरक्षेचा विचार करावा लागेल ! आणि तुम्हाला कुठल्या तरी सायकिऍट्रिस्ट ला दाखवावे लागेल !
याकूब- तसे नाही पण मला सुद्धा ऐश्वर्या च्या मर्जी विरुद्ध वागतोय याची अपराधी पणाची भावना मनात घर करून बसली आहे.मनावर प्रचंड ओझे झाले आहे या भावनेचे. या मानसिक तणावातून पडायचे आहे.
आदित्य- त्यासाठीच तुला आणि ऐश्वर्याला कोर्टात केस करण्या ऐवजी कौन्सिलिंग इथे माझ्या घरी बोलावले आहे. माझी पत्नी दीपिका हि सिविल कोर्ट मध्ये वकील आहे. त्यामुळे अशा केस कौन्सिलिंग ने कशा सोडवायच्या याचा अनुभव आहे. आत्ता थोड्या वेळात ऐश्वर्या आणि दीपिका येतील.
(आणि त्याच वेळी दीपिका आणि ऐश्वर्या बेडरूम मधून बाहेर येतात पहिले दीपिका येते तिच्या मागोमाग ऐश्वर्या येते.ऐश्वर्य च्या चेहऱ्यावर खूप निराशेचे आणि दुःखी भाव आहे. दीपिका तिला खुर्ची वर बसायला खुणावते. खुर्ची वर बसत असताना तिची नजर याकूबच्या नजरेला भिडते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव एक्दम बदलतात आणि स्तब्ध उभे राहून ती रागाने बघते. तेव्हाच दीपिका तिला बोलते.)
दीपिका – बस ना ऐश्वर्या . याकूब तू पण (ऐश्वर्याच्या समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून) इथे बस.
(असे बोलून आदित्य आणि दीपिका दोघे हि मधल्या सोफ्या वर बसतात .)
दीपिका- हं आता बोल ऐश्वर्या काय प्रॉब्लेम आहे तुझा?
ऐश्वर्या- हा याकूब, एक नंबरचा “लव्ह जिहादी” आता मला लग्न करून मुस्लिम धर्म मध्ये कॉन्व्हर्ट होण्याची जबरदस्ती करत आहे.
आदित्य- ऑब्जेक्शन मॅडम, याकूब ने कधीच कोणाही पासून स्वतःची आयडेंटीटी लपवली नाही. तूम्ही दोघे हि एका फ्लॅट मध्ये गेले 2 वर्षा पासून as a रूम पार्टनर राहात आहात. त्या फ्लॅट चा मालक याकूब ला याकूब याच नावाने ओळखतो.त्याचं कडे याकूब चे आधार कार्ड आहे ज्यावर त्याचे नाव याकूब आहे. आणि तुमच्या पासून पण त्याने स्वतःची आयडेंटीटी लपवली नव्हती. तुम्हाला याकूब बरोबर फक्त शरीर संबंध ठेवायचे होते याचे पुरावे आहेत आमच्याकडे. हॉटेल ची बिले आहेत आणि विडिओ आहे ज्यामध्ये तुम्हीच अँटी प्रेग्नन्सी गोळ्या घेऊन याकूब ला शरीरसंबंध चे आव्हान करतानाचे.
ऐश्वर्या- एक्झॅटली, मी अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट घेत होते कारण मी बिझिनेस साठी लोन घेतले आहे. आणि ते फेडण्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. त्यात मला माझी फॅमिली साठी वेळ नाहीये. तर याने माझ्या अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट च्या जागी दुसऱ्या गोळ्या देऊन माझी फसवणूक केली. आणि जेव्हा माझा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा पासून तर मला मारझोड करून लग्नासाठी जबरदस्ती करीत आहे. आणि हे मी खोटे बोलत नाहीये. हे बघा माझ्या चेहऱ्या वर निशाण आले आहेत.
(असे म्हणत ऐश्वर्य स्वतःचा चेहरा दाखवते ) एवढेच नाही तर मी डॉक्टर कडे ऍबॉर्शन साठी जाऊ नये म्हणून काल त्याने मला घरामध्ये कोंडून ठेवले. खोटे वाटत असेल तर त्यालाच विचारा.
आदित्य- याकूब, is it true ?
याकूब- yes ,
आदित्य- what nonsense ! तू एका महिलेला मारझोड केलीस आणि तिच्या मनाविरुद्ध तिला घरात कोंडून ठेवलेस? तुला काळत नाही का तू केवढा मोठा गुन्हा केला आहेस ते?
याकूब – अरे माझा नाईलाज होता , मी काल हिला प्रेमाने किती समजावले होते कि या मुलाची पूर्ण जबाबदारी घ्यायला तय्यार आहे. हवे तर तू लग्न करू नकोस, किंवा जर लग्न करायचे असेल तर मी स्वतः हिंदू धर्म स्वीकारेन.तू तुझा बिझनेस चालू ठेव! तुझी पूर्ण मिळकत तू तुझे लोन फेडण्या साठी वापर किंवा तुझ्या स्वतःसाठी वापर मला त्यातील एक पैसा हि नको. मी अक्षरशः तिच्या समोर गुढगे टेकून तिच्याकडे भीक मागत होतो पण ती काही ऐकायलाच तय्यार नव्हती उलट डॉक्टर कडे जायला निघाली ऍबॉर्शन साठी ! मग माझा पण नाईलाज झाला होता.
दीपिका- म्हणून तू तिला मारझोड करून घरात कोंडून ठेवलेस ? बरोबर आहे तिचे, तू लाख म्हणत असशील कि त्या मुलाची जबाबदारी मी घेईन त्याचा खर्च मी करेन पण 9 महिने मूल तिच्या पोटात वाढणार आहे, तुझ्या नाही! गरोदर पणात वाढलेले पोट तिचे दिसणार आहे. कितीही झाले तरी लोक विचारणार कि याचा बाप कोण आहे ते?
याकूब- हो मग मी तय्यार आहे ना तिच्याशी लग्न करायला!
ऐश्वर्या – आत्ता तर तू लग्न करशीलच ! त्या निमित्ताने माझे धर्मांतरण करून घेता येईल! तुझा लव्ह जिहाद करण्याचा उद्देश सफल होईल !
याकूब – मला असे काही करायचे नाहीये. आणि तुला जर असे वाटत असेल तर मी तय्यार आहे स्वतःला हिंदू मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी.
ऐश्वर्या – शट अप ! ना मला मुसलमानांमध्ये कन्व्हर्ट होण्याचिं इच्छा आहे आणि ना हि मला तुला हिंदू बनवण्यात इंटरेस्ट आहे! इन फॅक्ट मला तुझ्यातच इंटरेस्ट नाहीये ! आत्ता तर तुला बघितले कि माझी तळ पायाची आग मस्तकात जाते. या अगोदर बेडरूम मध्ये मी तुझ्या बरोबर एन्जॉय करायचे ! पण काल पासून तुझा ओझरता स्पर्श सुद्धा मला सहन होत नाही ! किळस वाटते.
याकूब – ऐश्वर्या….! एक स्त्री असून सुद्धा तू अशी कसे बोलू शकतेस ? स्वतःची लैंगिक उपासमार भागवण्यासाठी तू माझ्याशी शरीर संबंध जोडलेस ! आणि आता प्रेग्नन्ट झाल्या वर तू त्या अर्भकाला जन्माच्या आगोदरच मारायला निघालीस?
ऐश्वर्या – हो हो मी स्वतः माझ्या अर्भकाला जन्माच्या आगोदर मारायला निघाले !याला जबाबदार पूर्णपणे तूच आहे ! आत्ता प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मी हजारो मरणे मारणार आहे. माझ्या मनात हि अपराधी पणाची भावना सदैव घर करून राहणार आहे. त्यामुळे मी एक सेकंड सुद्धा सुखाने जगू शकणार नाहीये. हे सर्व भोगायला लागू नये म्हणून मी नचूकता अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट घेत होते पण तू माझ्या नकळत माझ्या गोळ्या बदलून मला प्रेग्नन्ट केलेस त्यामध्ये तुझा उद्देश एकच होता कि या मुलाच्या निमित्ताने माझ्याशी लग्न करून मला मुस्लिम बनवायचे! हेच तुझे षडयंत्र आहे ! पण मी तुला या षड्यंत्रात कधी हि यशस्वी होऊ देणार नाही.
याकूब – मी acp आहे माझी मंथली इनकम तुझ्या इतकी नसली तरी तीन जणांच्या फॅमिलीला आरामशीर पोसू शकेन एवढी आहे. पोलीस स्टेशन मध्ये कित्येक लिव्ह इन रिलेशन च्या अशा केसेस येत असतात ज्यामध्ये मुली प्रेग्नन्ट झालेल्या असतात आणि त्याद्वारे आपल्या प्रियकरावर दबाव टाकत असतात, कि त्यांनी लग्न करावे!आणि अशा केसेस मध्ये पुरुषांना इच्छा नसता मानसिक तय्यारी नसताना त्यांच्या लिविंग पार्टनर्शी लग्न करावे लागते. तसे नाही केले तर पुरुषांवर सेक्सऊल हॅरॅसमेंट किंवा रेप ची केस करतात. प्लीज, हो मी तुझ्या गोळ्या बदलून मी तुला प्रेग्नन्ट केले पण यामागे माझा उद्देश फक्त एकच होता , ‘तुझ्या बरोबर लग्न करायचे !’ माझे तुझ्या वर मनापासून प्रेम आहे.
There is no such conspiracy please beleve me .
( असे म्हणून याकूब जमिनी वर गुढगे टेकवून रडायला लागतो )
दीपिका -“मिस्टर याकूब “, कायदेशीर पणे तू असे कोणावर हि लग्नाची जबरदस्ती नाही करू शकत ! आणि तुझे ऐश्वर्या शी लग्न झाले नाहीये तेव्हा तू तिला ऍबॉर्शन करण्या पासून अडवू शकत नाही. तेव्हा तू कितीही गुढगे टेकवलेस रडलास तरी उपयोग होणार नाही! तरी ऐश्वर्या तू म्हणालीस कि ऍबॉर्शन केल्यामुळे तुझ्या मनात अपराधी पणाची भावना निर्माण होईल. एका अर्भकाच्या हत्येमुळे तू प्रत्येक दिवशी हजारो मारणे मारशील.
मग या वर एक उपाय आहे माझ्याकडे ! तू सरोगसी बद्दल ऐकलेच असेल ? याकूब, तुला पण सरोगसी बद्दल माहिती असेल?
ऐश्वर्या- हो माहित आहे. प्रेग्नन्ट लेडी मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तिचा गर्भ दुसऱ्या स्त्री च्या गर्भाशयात सोडला जातो आणि त्यानंतर तो गर्भ त्या स्त्री च्या गर्भाशयात विकसित होतो आणि नंतर डिलिव्हरी होते.
याकूब – हो या ट्रीटमेंट बद्दल मला सुद्धा माहित आहे. पण त्याचा इथे काय संबंध ?
दीपिका- तूच म्हणाला होतास कि तुला ऐश्वर्या पासून तुझी स्वतःची बेबी पाहिजे आहे. ऐश्वर्याने तुझ्याशी लग्न नाही केले तरी चालेल. तू त्या अपत्याची सगळी जबादारी घेशील? त्याचा सांभाळ तू करशील? मग आत्ता ऐश्वर्याच्या गर्भातील मुल असेच सरोगसीचा ट्रीटमेंट ने दुसऱ्या महिलेच्या गर्भात ट्रान्सफर कर आणि नंतर त्या अपत्याला तू सांभाळ.
याकूब ( हे ऐकल्या वर याकूब च्या चेहय्रा वर सहमतीचे भाव उमटतात ) – हा हे ठीक आहे! ग्रेट दीपिका its व्हेरी गुड आयडिया ! i am ready !
ऐश्वर्या- no ! but i am not ! या अपत्याला जन्माला घालून त्याचा ताबा याकूब ला देणे ही मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा आहे. त्यापेक्षा ऍबॉर्शन करून मृत्यू देणे चांगले! त्यातच मुक्ती आहे. कारण झालेले अपत्य जर मुलगा झाला तर ठीक पण जर मुलगी झाली(एक दीर्घ श्वास घेऊन ) …….. तर कल्पनाच करू शकत नाही……………….!!!!
याकूब – ऐश्वर्या, असे काही नाही. मला मुलगा मुलगी दोघेही सामान आहे, मी दोघांचा सांभाळ सारखाच करेन.
आदित्य- याकूब (ओरडून) !! हा तुझा एकदम फाझील आत्मविश्वास आहे. मला माहीत आहे कि दीपिकाचा हा युक्तिवाद तू का मान्य केला आहेस ते! कारण ऐश्वर्या चे अपत्य तू आपल्या ताब्यात घेतले कि त्या अपत्याला निष्काळजी पणे हॅन्डल करायचे. आणि कितीही झाले तरी एक माता आपल्या मुलाचे हाल बघू शकणार नाही! मग तिला नाईलाजाने तुझ्या बरोबर रहावेच लागेल.
याकूब – असे काही सुद्धा मी करणार नाही. असे कसे म्हणतोस तू आदित्य ? तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहेस .
आदित्य- हो, मी तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे म्हणूनच तुला चांगला ओळखतो. याकूब तुझ्या मनामध्ये हे अचानक लहान मुलांबद्दल प्रेम कसे जागृत झाले ? या पूर्वी तर तुला लहान मुले आजिबात आवडत नव्हती. i hate child … i hate child … असे सारखे म्हणायचा. माझा 2 वर्षाचा मुलगा सुबोध याला कधी तो जन्माला आल्यापासून कधी नीटसे बघितले नाही, ना त्याला कधी जवळ घेतले, ना कधी त्याच्या बर्थ डे ला गिफ्ट आणले. मला माहित आहे कि तुला त्याची बर्थ डेट पण माहित नाहीये !!!
याकूब – हो पण …..
ऐश्वर्या – पण बिन काही नाही आदित्य म्हणतो आहे तेच बरोबर आहे…
याकूब – काय बरोबर आहे…..
आदित्य- हेच…
( असे म्हणून ऐश्वर्या ,आदित्य आणि याकूब एक मेकांना पूर्णपणे बोलू ना देता आरडाओरडा करत भांडू लागतात तेव्हा दीपिका दोन्ही हात वरती करून जोरात ओरडते.)
दीपिका- एक मिनिट ….. सायलेन्स सायलेन्स…….सायलेन्स….
(आदित्य, याकूब आणि ऐश्वर्या तिघेही शांत होतात )
दीपिका- ऐश्वर्या , याकूब तुमच्या या प्रॉब्लेम वर पण सोल्युशन आहे माझ्याकडे. ऐश्वर्या, सरोगसी ने अपत्य जन्माला घातल्या वर त्या अपत्याचा ताबा याकूब कडे दिल्या नंतर तुला जबाबदारीतून मोकळे होता येणार नाही. ज्या प्रमाणे डिवोर्स झाल्यानंतर नवऱ्याला मुलांच्या कस्टडी साठी दर महिन्याला पैसे द्यावे लागतात त्याप्रमाणे तुला सुद्धा याकूब ला सरोगसी चा आणि डिलिव्हरी चा अर्धा खर्च आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुझ्या इनकम चा 10 पर्सेंट द्यावा लागेल. त्याबरोबर तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तुझा होणारा मुलगा/ मुलगी ला केव्हाही भेटता येईल त्यांच्या वर लक्ष ठेवता येईल.
जर का तुला कळले कि याकूब तुझ्यां अपत्याचा योग्य प्रकारे सांभाळ करीत नाहीये तर तू कोर्टात जाऊन तुझ्या मुलाची/ मुलीची कस्टडी मागू शकते. इज इट ओके………?
ऐश्वर्या- नो ……. i have an objection ….!
दीपिका- What objection ?
ऐश्वर्या – 2 महिन्या नंतर मी आऊट ऑफ इंडिया जाणार आहे.आणि कदाचित तिथेच कायमचे राहणार आहे. पैसे तर मी ऑनलाईन भरेन पण मला तिथे राहून माझ्या बेबी चा कसा सांभाळ होत आहे ते मला कळणार नाही.
दीपिका – का ? आजचा जमान्यात विडिओ, cctv फुटेज ने तू केव्हाही कुठे हि माहित करून घेऊ शकते.
ऐश्वर्या – व्हीडीओ आणि cctv फुटेज is not enough to convince me . हा याकूब काय iखोटे विडिओ बनवून दाखवेल कि माझी बेबी किती सेफ आहे किती हैप्पी आहे ते.
याकूब- ठीक आहे, आदित्य आणि दीपिका माझ्या घराजवळच राहत आहे ते पण तुला डेली रिपोर्ट करतील.
ऐश्वर्या – ठीक आहे, पण जर का त्यांच्या रिपोर्ट ने कळले कि माझ्या बेबी चा सांभाळ योग्य रीतीने होत नाही आणि मला त्याचा ताबा घेण्यासाठी कोर्टात केस करावी लागली तर माझ्या कडे पुरावा काय आहे कि? आमच्या मध्ये अशी डील झाली होती ?
दीपिका – त्या साठी पुरावा म्हणून तू आजच्या मिटिंग चा व्हिडीओ कोर्टात दाखवू शकतेस !
याकूब आणि ऐश्वर्या -(दोघेही एकदम ) मिटिंग चा व्हिडिओं ? ( आणि शॉकिंगली दीपिका कडे बघायला लागतात.)
दीपिका – हो आज आपल्या मिटिंग चे विडिओ शूटिंग झालेले आहे !
(असे म्हणून दीपिका सेंटर टेबल वर ठेवलेल्या वांझ मधून एक हॅंडीकॅम काढते आणि सगळ्यांना दाखवते. आणि नंतर तो हॅंडीकॅम ऐश्वर्या च्या हातात देऊन म्हणते.)
दीपिका- हा घे हॅंडीकॅम यातील रेकॉर्डिंग तू पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी कर आणि स्वतः जवळ ठेव. याकूब, तू पण एक कॉपी करून ठेव.
याकूब- मी कॉपी करून ठेवणार नाही आणि मला त्याची जरुरत हि नाही. इव्हन मला ऐश्वर्याच्या पैशांची देखील जरुरत नाही.
आदित्य – my dear friend , असे करू नकोस. प्रकरण कोर्टात गेले तर या व्हिडीओ चा तुला उपयोग होईल. आजच्या जमान्यात एकाच्या पगारात मुलांचे शिक्षण करणे सांभाळ करणे सोपे नाहीये.
याकूब – हे मूल मला हवे होते त्यासाठी मी ऐश्वर्याची फसवणूक केली आता त्याचा सांभाळ, त्याच्या पालन पोषणाची पूर्ण जबाबदारी माझी आहे. ऐश्वर्याला ती जबाबदारी वाटून घ्यायची असेल-नसेल , तर तिची मर्जी.
( आणि नंतर ऐश्वर्या कडे जाऊन तिचा हात हातात घेऊन ) सरोगसी नंतर तू तुझ्या मर्जी प्रमाणे जीवन जग. सरोगसी चा सम्पूर्ण खर्च मीच कारेन पुढे पण सगळा खर्च मीच करेन. मी कधीच कोणालाही सांगणार नाही कि या मुलाची आई कोण आहे किंवा होती. पण तुला कधी वाटले कि आपल्या मुलाला किंवा मुलीला भेटायचे तर you are most welcome . माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत….
समाप्त