हिरानंदानी, पवई मुंबई मधील जॉगर्स पार्क रोजच्या सारखा सकाळी सहाच्या सुमारास जॉगिंग ,मॉर्निंग वॉक ,लाफ्टर क्लब मध्ये जोरजोरात हसणाऱ्या सदस्यांनी आणि जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणाऱ्या युवकांनी नेहमीसारखा ताजा टवटवीत झाला होता.
पण जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणारा सहा फूट तीन इंचाचा, पिळदार शरीरयष्टीचा,सिक्स पॅक २८ वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर तारिक पठाण
मात्र एक्सरसाईस करीत असताना त्याच्या मित्राची आदित्यची आतुरतेने वाट बघत होता. त्याच्याशी त्याला अत्यंत महत्वाचे बोलायचे होते. रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. आदित्य शी चर्चा केल्या शिवाय त्याला आता चैन पडणार नव्हते. तेवढ्यात समोरून आदित्य आला आणि तारिकने व्यायाम सोडून लगेच त्याच्याकडे धाव घेतली.
तारिक चा समवयस्क असलेला, पाच फूट दोन इंच म्हणजे साधारण उंचीचा, पेशाने क्रिमिनल लॉयर असलेला आदित्य तारिक चा कॉलेज च्या दिवस पासून चा मित्र होता. तारिक पोलीस झाल्यापासून व्यावसायिक स्तरावर दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली होती. दोघेही एकमेकांच्या समस्येवर काहीतरी उपाय करून सोडवत असत.
” काय झाले तारिक ? कशाला एवढ्या सकाळी सकाळी भेटण्या साठी बोलावले”, आदित्य तारिक च्या खांद्याला धरून त्याला एका बेंचवर बसवून आणि त्याच्या शेजारी बसून म्हणाला. is anything serious ?”
“एवढे काही सिरीयस नाहीये. पण तुझ्याशी डिस्कस करायचे आहे.” तारिक.
“काय ते?'”, आदित्य.
“तुला ती रिया पटवर्धन माहित आहे ना, ती माझी रूम पार्टनर जी माझयाहून सात वर्षाने मोठी आहे. बिझनेस वूमन. माझ्यापेक्षा पाच इंच ऊंची कमी असलेली, सुडोल अंगाची गोऱ्या रंगाची घाऱ्या डोळ्यांची ….””आपल्याच कॉलेजमधली जेव्हा आपला कॉलेज मध्ये पहिला दिवस होता आणि तिचा सेंड ऑफ होता तेव्हा सिनिऑरिटी चा फायदा घेऊन आपल्यावर रॅगिंग केले होते, श्रीमंतीचा माज चढलेली पण आता कफल्लक झालेल्या त्या रिया पटवर्धन ला मी चांगलेच ओळखतो. पुढचे बोल,” आदित्य तारिक चे बोलणे मधेच थांबवून वैतागून म्हणाला.
” काल रात्री ती आणि मी ,,,,,,,,,म्हणजे आमच्या दोघांच्यात ,,,,,,,,,, फिजिकल रिलेशन झाले !” तारिक ने एकदाचे बोलून टाकले!
ऐकल्या वर लगेच आदित्य ने कपाळाला हात मारला आणि म्हणाला,”झालें ना कांड? तरी मी तुला सांगितले होते कि रिया सारख्या बाई बरोबर एका फ्लॅट मध्ये असे रूम शेअरिंग वर राहणे तुझ्या साठी धोकादायक होऊ शकते. त्या फ्लॅट चा मालक तुला खरे म्हणजे तुला पेयिंग गेस्ट म्हणून रूम द्यायला तयार नव्हता कारण तू मुस्लिम आहेस म्हणून ! तर तू आपला पोलिसी खाक्या दाखवून भाड्याने राहायला लागला.”
” हो मग बरोबरच आहे हे बेकायदेशीर आहे. जात-धर्मावरून कोणीही हक्क हिरावून घेऊ शकत नाही.” तारिक रागावून बोलला.
“हो असशील तू पोलीस, पण रिया सारख्या बाई समोर तुझा हा पोलिसी खाक्या चालणार नाही. आत्ता ती पोलीस स्टेशन मध्ये गेली असेल तुझी पोलीस कंप्लेंट करण्यासाठी, तुझ्यावर रेप केस फाईल करण्या साठी!,” आदित्य उभा राहून म्हणाला.
“नाही , जे काही झाले ते आमच्या दोघांच्या परस्पर सहमतीने झाले”, तारिक,
” तरी सुद्धा तिला तुझ्या वर रेप ची केस करता येईल. मी आत्ताच तुझ्या जामिनाची तयारी करायला लागतो. आणि तू स्वतःला अंडरग्राऊंड कर.” असे म्हणून आदित्य तिथून निघायला लागला. पण तारिक त्याला अडवून म्हणाला,”cool down आदित्य, ती असे काहीही करणार नाही, ”
” Are you sure ?” आदित्य.
” Yes , I have spoken to her, she will not do such a thing. be relax . calm down .” असे बोलून तारिक ने आदित्य ला दोन हि हाताला धरून पुन्हा बेंच वर बसवले.
” Then what is your problem? मग मला कशाला एवढ्या सकाळी सकाळी बोलावले ? रिया काही पहिली बाई नाहीये कि जिच्याशी तू शरीर संबंध जोडलेस. कॉलेज च्या दिवसापासून मी तुझी रासलीला बघत आहे.” आदित्य एक मोठा सुटकेचा श्वास घेऊन म्हणाला.
” आज सकाळी, मी जेव्हा तिला लग्ना बद्दल विचारले…..
“Excellent , very good , आज शेरास सव्वा शेर मिळाला. ती जे काही बोलली तेच योग्य आहे. तुम्हा दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जर तुम्ही दोघांनी लग्न केले तर ती तुमच्या आयुष्यातील एक मोठी घोडचूक ठरेल. आणि ते शरीर संबंधातील सुख सुद्धा जास्त काळ टिकणार नाही. एकदा तुझी किंवा तिची भूक पूर्णपणे भागली तर तुम्हाला एकमेकांबरोबर एक सेकंड सुद्धा राहता येणार नाही.”असे बोलून आदित्य ने खिशातून एक सिग्रेट चे पाकीट काढले तारिक ला एक सिगरेट ऑफर केली पण तारिक ने ती नाकारली, आदित्य एक्दम शॉक होऊन म्हणाला,” तू सिगरेट ला नाही म्हणतोस !! really shocking for me !” असे बोलून आदित्य ती सिगरेट फुकायला लागतो. त्या धुराने तारिक ला जोरात खोकला येतो आणि नंतर बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात उलटी करतो. आदित्य पण त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्याला पकडतो आणि त्याच्या पाठीवर हात फिरवतो. तेव्हा तारिक आदित्य च्या हातातील सिगरेट डब्या मध्ये फेकून देतो.
” नाही,नाही, त्याची काही जरुरी नाही. माझे सिगरेट स्मोकिंग माझ्या कण्ट्रोल मध्ये आहे “, मी साफ नकार दिला होता पण तरी सुद्धा रात्री मी माझ्या फ्लॅट च्या गॅलरी मध्ये व्हिस्की चे पेग घेत होतो बरोबर सिगरेट चे मस्त झुरके घेत होतो पण अचानक मोबाईल वर मेसेज आला. ओपन करून बघितला आणि अचानक डॉक्टर ने पाठवलेला विडिओ चालू झाला आणि मोबाइलला वर एक चक्राकार आकृती समोर आली …….
ती आकृती माझ्या डोळ्यात सामावली.
तेवढ्यात माझ्या समोर रिया आली आणि माझ्या हातातून दारूचा ग्लास आणि सिगरेट गाळून पडली.
ती आपली मार्गाने तिच्या रूम मध्ये चालली होती पण मी तिच्या वाटेत होतो आणि तिला अडवले होते. मला तिच्या शिवाय दुसरे कोणी दिसत नव्हते. आजू-बाजूच्या कोणत्याही गोष्टीचे भान राहिले नव्हते. मी तिचा चेहरा दोन्ही हाताने पकडला.
पहिले तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तिच्या नजरेशी माझी नजर भिडली तेव्हा माझ्या बरोबर ती पण मंतरल्या सारखी माझ्या मिठीत शिरली आणि मी तिला ओढत ओढत माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेलो. नंतर जे काही झाले ते आमच्या दोघांच्या मर्जीने झाले. अशीच आम्ही पूर्ण रात्र घालवली ” एवढे बोलून तारिक तसाच शांतपणे बसून राहिला.
हे ऐकून आदित्य रागाने बोलला,” म्हणजे त्या डॉक्टर नि तुझ्या नकळत तुला हिप्नोटाईज्ड केले. तू मला तो विडिओ दाखव. मी आत्ताच त्या डॉक्टर वर केस करतो.”
तारिक लगेच फोन मध्ये व्हिडीओ शोधायला लागला पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला कुठेही व्हिडीओ मिळाला नाही. “मला वाटते तो विडिओ माझ्याकडूनच डिलीट झाला किंवा ऍटोमॅटिकली डिलीट झाला असेल,”
” हे देवा, निदान फोन नंबर तरी आहे का ?” आदित्य ओरडला.
“नाही, पण पोलीस स्टेशन मध्ये मिळेल. मी तुला आज दुपार पर्यंत पाठवेन.” तारिक
” ठीक आहे, आता त्या डॉक्टर चा हायप्नोटिझम चा प्रभाव तुझ्यावर किती वेळ राहील, कोणास ठाऊक पण काल तुमच्यात जे काही घडले त्या मध्ये ती सहज पणे तुझ्या वर बलात्काराची केस करू शकली असती. तेव्हा तुला तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे असेल तर ठेव. पण त्या अगोदर तू स्वतः जवळ असे पुरावे जमा करून ठेव,ज्या मध्ये असे सिद्ध होईल कि बिना लग्नाची शरीर संबंधाची पहिली मागणी तिने केली होती. म्हणजे पुढे कधी ती तुझ्या वर सेक्सशुअल हॅरॅसमेंट ची किंवा रेप ची केस करू शकणार नाही. ते कसे आणि कुठले पुरावे घ्यायचे ते मी तुला सांगायला नको कारण तू पोलीस ऑफिसर आहे. तुला बरोबर माहित आहे.” असे बोलून आदित्य तिथून निघून गेला.
आदित्यचा हा सल्ला तारिक ला पूर्णपणे पटला. त्याच विचारात तारिक रात्री वॉश बेसिन च्या आरशासमोर उभा राहिला.तेव्हा अचानक तिथे रिया आली आणि तिने तारिक ला मागून मिठी मारली आणि बोलली,” हाय तारिक, काय ठरवलेस तू ?
“मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण, काय ग या संबंधामुळे तू जर गरोदर झालीस तर ?” तारिक.
” डोन्ट वरी यार, मी आज एका गायनेकॉलॉजिस्ट कडे गेले होते तिने मला अँटी प्रेग्नन्सी गोळ्या दिल्या आहेत. या बघ.” असे बोलून तिने गोळ्यांचे पाकीट दाखवले. “Then, let us get naked and go to bed .” असे म्हणून रिया त्याला हाताला धरून बेडरूम मध्ये घेऊन गेली.
सकाळी पुन्हा तारिक त्या आरशा समोर आला, पण प्रत्यक्षात तो आरसा नव्हता! पारा लावलेली आरपार दिसणारी काच होती ! आणि त्याच्या मागे होते एक कॅबिनेट ! त्यामध्ये तारिक ने एक कॅमेरा ठेवला होता. त्या कॅमेरा मध्ये रियाचे रात्रीचे सगळे बोलणे चित्रित झाले होते. ते बघून तारिक स्वतःशीच म्हणाला,”हे देवा, या पुराव्याची कधीही गरज पडू नये.कारण मी रिया वर खरोखर मनापासून प्रेम करतो.
समाप्त.