The Family Court Chronicles: A Tale of Three Sisters, a Mother, and the Quest for Resolution – Marathi Version

                                                                          The Family Court Chronicles:

गेले २ वर्षांपासून सुप्रिया

 

फॅमिली कोर्टाच्या  समुपदेशन विभागात  समुपदेशक म्हणून काम करीत आहे. बहुतेक वेळा या विभागात नवरा-बायकोच्या घटस्फोटाच्या केस असत त्यांची प्रकरणे कोर्टात जाण्या अगोदर परस्पर सहमतीने त्यांना  विभक्त केले जात होते. कधी कधी प्रॉपर्टी च्या वादाचे, दोन भावांच्या भांडणाचे, जमिनीच्या विवादाचे प्रकरण पण येत असत. सुप्रिया मॅडम समुपदेशनाच्या या कामात खूपच अग्रेसर होत्या. प्रत्येक प्रकरण जास्तीत-जास्त सहा महिन्यात सेटल करीत होत्या. 

         पण आज सुप्रिया मॅडम समोर आलेली केस खूपच आगळी-वेगळी होती. आणि ती केस दाखल करणारा होता पोलीस इन्स्पेक्टर नंदन गायकवाड! म्हणजे कोणी सामान्य माणूस नव्हता. कायद्याची पूर्ण माहिती असलेला, आज आपली “कौटुंबिक समस्या” समुपदेशनाच्या मार्गाने सोडवण्यासाठी  सुप्रिया मॅडम च्या केबिन मध्ये आला होता

             

 

२५  वर्षाचा अविवाहित नंदन आपल्या फॅमिली बरोबर आला होता. त्याची फॅमिली म्हणजे त्याच्या पेक्षा मोठ्या त्याच्या तीन बहिणी आणि आई. त्याच्या आईचे-अनुराधा चे  वय जास्तीत जास्त ५०/५५ असेल. आणि बाकीच्या तीन बहिणी मध्ये मोठी बहीण स्वाती-३८ वर्षाची आणि बाकीच्या दोनही बहिणी तिच्याहून २/२ वर्षाने लहान म्हणजे गीता-  ३६ आणि शैला -३४ वर्षाची. पहिल्या नजरेत आई आणि मुली मध्ये फरक दिसत नव्हता. असे वाटत होते नंदन आपल्या ४ बहिणीना घेऊन आला आहे. पण २५ वर्षाचा नंदन या बहिणी मध्ये शेंडा फळ खूपच तरुण दिसत होता. नंदन ची आई-अनुराधा फक्त नंदन ची आई शोभत होती. तीन बहिणी मध्ये ३४ वर्षाची शैला च्या

चेहय्रा वरती बुद्धीचे तेज दिसत होते. तिच्या आधुनिक पेहरावाने असे वाटत होते कि ती नुकतीच परदेशातून आली आहे! बाकीच्या २ बहिणी आणि त्यांची आई मात्र साधारण साडी आणि टिपिकल गावाकडच्या पेहरावात होत्या.

 

 

 

                सुप्रिया ला हे विचित्रच वाटले ! तेच जाणून घेण्यासाठी सुप्रिया बोलली,” हा बोला नंदन साहेब, काय प्रॉब्लेम आहे तुमचा.”

                  नंदन,” हा प्रॉब्लेम फक्त माझा नाही आहे. आपल्या भारत देशाचा आहे. आपल्या देशात जेव्हा एखादी बाई गरोदर होते तेव्हाच तिच्या कडून अशी अपेक्षा करतात कि, तिने मुलाला जन्माला घालावे. पण जर ती पहिल्यांदा गरोदर असेल आणि तिला मुलाच्या ऐवजी मुलगी झाली तर त्या मुलीला बिना तक्रार स्वीकारले जाते. हि अपेक्षा ठेऊन कि पुन्हा प्रयत्न करू आता दुसऱ्या वेळी आपल्याला मुलगा होईल. पण दुसऱ्या वेळी जर मुलगी झाली कि मग संपूर्ण परिवाराला एक मोठे नैराश्य येते . मग आपल्या देशाचा कुटुंब नियोजनाचा कायदा मोडून तिसऱ्यांदा चान्स घेतला जातो पण तिसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली कि पुन्हा गरोदर किंवा कुठल्या तरी क्लीनिक मध्ये  बेकायदेशीर गर्भ लिंग चाचणी केली जाते आणि जर मादी गर्भ असेल तर गर्भपात केला जातो. आपल्या देशात मुंबई-पुणे-दिल्ली सारख्या आधुनिक शहरात कायद्याची पायमल्ली होत असते.तिथे आमच्या तुजगावात ४० वर्षांपूर्वी कुठला कायदा पाळणारेत लोक ? बालविवाहाचे कायदे धाब्यावर बसवून माझ्या आईचे म्हणजे श्रीमती अनुराधा गायकवाड यांचे १६ व्या  वर्षीच लग्न झाले. लग्ना  नंतर पुढच्या ५ वर्षा  मध्ये माझ्या आईने मी अगोदर सांगितल्या प्रमाणे मुलाच्या आशेने तीन मुलींना  जन्माला घातले. त्यानंतर गावातल्या एका क्लिनिक मध्ये बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केले. अशीच १९९७ मध्ये गर्भलिंग चाचणी केल्यावर नर गर्भाची खात्री झाली आणि १९९८ मध्ये माझा जन्म झाला. एक मुलगा म्ह्णून गायकवाड परिवारात माझे लाड एखाद्या राजपुत्रा सारखे होत होते. पण त्यामध्ये माझ्या मोठ्या ३ बहिणींचे मात्र हाल झाले खास करून माझी हि तिसरी मोठी बहीण शैलाचे खूप हाल झाले, हो कि नाही शैला ताई ?” नंदन शैला कडे बघून म्हणाला.

                    शैला,”अगदी बरोबर, खूपच हाल झाले.”

                    नंदन.” मग आता तूच सांग एक मुलगी म्हणून आपल्या गायकवाड परिवारात तुझ्यावर किती अन्याय आणि अत्याचार झाले ते.”

                       ” मी तिसरी मुलगी असल्या मुळे आजी आणि आई मध्ये तर सतत भांडणे व्हायची. जसे काही तिसरी मुलगी म्हणून जन्म घेऊन मी एक मोठा गुन्हा केला आहे. माझा भरपूर सांभाळ माझ्याहुन दोन मोठ्या बहिणी स्वाती आणि गीता यांनी केला. आम्ही तिघीही मुली म्हणून आम्हाला गावातल्या स्वस्तातल्या सरकारी शाळेत घातले. जिथे मोफत शिकवले जात होते त्या बॊरॊबर रोज मोफत जेवण  दिले जात असे, त्या निमित्ताने आमचा बराचसा खर्च वाचत होता. त्या शाळे मध्ये कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या. शिक्षक पण कधी – कधी शाळेत येत होते. पण नंदनला मात्र एका महागड्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये घातले त्याला शाळे मध्ये पीक अप -ड्रॉप साठी बस येत होती. जेवणाचा डबा बनवून दिला जात होता. त्यावेळी त्याच्या शाळेचा वार्षिक खर्च हजार-बाराशेच्या घरात होता,”शैला रागाने थरथरत बोलत होती.

 

 

                  तिला मधेच थांबवून सुप्रिया म्हणाली.”पण तुमच्या कडे बघून असे वाटत नाही कि तुमचे शिक्षण एखाद्या साधारण शाळेत झाले असेल. तुमच्या पोषाखाकडे बघून असे वाटते कि तुम्ही आत्ताच विदेशातून आलेले आहात.”

                       ” हो इयत्ता ५ वि पासून माझे शिक्षण नंदन च्या शाळेत झाले.” शैला.

                      ” नंदनच्या शाळेत? ते कसे काय ?” सुप्रियाने आश्चर्याने विचारले.

                      ” इयत्ता ५वी मध्ये असताना आई-बाबाना मला नाईलाजाने नंदनच्या महागड्या कॉन्व्हेंट शाळेत घालावे लागले.” शैला.

                      ” नाईलाजाने ? असा काय प्रॉब्लेम झाला होता कि तुझ्या आई-बाबाना नंदनच्या महागड्या कॉन्व्हेंट शाळेत घालावे लागले.” सुप्रियाने उत्सुकतेने विचारले. 

                       ” २६ जानेवारी ला शाळेतील एका समारंभात  आळंदी छत्रे नावाचे एक तुफान प्रमुख अतिथी म्हणून बोलावले गेले,” शैला.

                        ” आळंदी छत्रे ?  या त्याच बाई आहेत ना ज्या आता दिल्ली च्या संसदे मध्ये मंत्री आहेत. त्यांचा काय संबंध.” सुप्रिया.

                        ” हो त्याच आळंदी छत्रे  ज्या आता दिल्ली च्या संसदे मध्ये मंत्री आहेत. पण त्या काळी त्या आमच्या जिल्ह्या मध्ये एक पक्ष कार्यकर्त्या होत्या. तेव्हा त्यांनी यांच्या शाळेतील मुलांची एक छोटी परीक्षा घेतली, त्यात माझ्या हुशारीने त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले कि मुलगी आहे म्हणून माझ्या आई-बाबानी मला सरकारी शाळेत घातले आणि माझ्या भावाला कॉन्व्हेंट मध्ये घातलेले आहे, तेव्हा त्या प्रचंड संतापल्या आणि सरळ माझ्या घरी आल्या तिथे त्यांना आणखी समजले कि माझे बाबा सरकारी नोकरी करत आहेत आणि असे असून सुद्धा त्यांनी कुटुंब नियोजनाचा कायदा मोडून चार मुलांना जन्म दिला आहे. तेव्हा  त्यांनी पहिले माझ्या बाबांच्या नोकरी वर कडक कारवाई केली. त्यांच्या बढती वर बंदी घातली गेली, तसेच त्यांना माझी ऍडमिशन नंदनच्या शाळेत करायला लावली. नंदनच्या शाळेत ऍडमिशन केल्या वर तिथे माझ्या हुशारीच्या जोरावर मी खूप प्रगती केली. इयत्ता १०वि मध्ये मेरिट मध्ये मी पहिली आली होती. आणि स्कॉलरशिप घेऊन मी लंडन ला उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे मेडिकल मध्ये शिक्षण घेऊन तिथेच एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून काम करीत आहे.” असे बोलून शैला ने आपला परिचय करून दिला. 

             ” ठीक आहे, मग आता इथे कसे काय आगमन झाले तुमचे ?” सुप्रियाने विचारले.

          ” २ दिवसापूर्वी नंदन ने मेसेज केला कि आमच्या गावाकडच्या जमिनीच्या आणि घराची आम्हा ४ बहीण-भावांमध्ये  वाटणी करायची आहे. त्यासाठी आले.”शैला स्मितहास्य करून म्हणाली.

          नंदन , ” त्या घरात आणि जमिनीत तुला तुझा हिस्सा मिळेल. पण त्या अगोदर ती जमीन आणि घरावर जे कर्ज आहे ते फेडले पाहिजे.”

           शैला,” का ? तू आणि बाबानी अजून पर्यंत फेडले नाही ? ती जमीन आणि घर गहाण ठेवून कर्ज का काढावे लागले ?”            

            नंदन, ” म्हणजे तुला आठवत  नाही? तुला स्कॉलरशिप ने लंडन मध्ये ऍडमिशन मिळाली होती पण तुला लंडन ला पाठवण्याचा तिकिटाचा खर्च, तिथे राहण्या साठी हॉस्टेलचा खर्च तू बाबांकडून घेतला होतास. त्या साठी तू बाबाना पत्र पाठवले होतेस. त्या पत्राची कॉपी अजूनही माझ्या कडे आहे. आत्ताच वाचून दाखवतो.—

              बाबा,

              मला स्कॉलरशिप ने लंडनच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली पण इथे राहण्या-खाण्याची सोय करण्यासाठी पैसे अजून पाठवले नाही. माझ्या जागी जर नंदन असता तर त्याला इथे यायच्या अगोदर तुम्ही पैसे पाठवले असते.

              एवढेच पात्रात लिहिले होते . पूर्ण पात्रात आणि गेले १० वर्षात तू एकदाही आमच्या कोणाचीही  चौकशी केली नाही. तुझ्या साठी बाबा पैसे कसे पाठवत होते. आम्ही तीन तुझी भावंडं आता कसे आहोत. आम्ही कसे आमचे शिक्षण पूर्ण केलं? याची एकदाही चौकशी केली नाही. कधी तू स्वतःच्या  घराचा, ऑफिस चा पत्ता दिला नाही. 

              बिचाऱ्या माझ्या बाबानी घर आणि जमीन गहाण ठेऊन तुला पैसे पाठवले. कर्जाचा गाढा ओढत ओढत ६० व्या वर्षी हार्ट अट्याक  ने वारले, तू शेवटचे बघायला देखील आली नाहीस. माझ्या शिक्षणासाठी काही पैसे उरले नाही. स्वाती ताई आणि गीता ताईंचे लग्न झाले नाही. त्या दोघी, आई आणि मी चौघे,दिवस रात्र मेहनत करून कर्जाचे हफ्ते फेडत असतो.”

              ” आपापल्या कर्माची फळे असतात, लहानपणी माझा  काहीही दोष नसताना केवळ मुलगी म्हणून मला जी दुय्यम दर्जाची वागणूक दिली होती त्याची शिक्षा होती.”शैला रागाने म्हणाली.

              “एस्क्युजमी शैला मॅडम कोणाला काय शिक्षा द्यायची हे ठरवण्याचे काम तुमचे नाहीये.”सुप्रियाने दरडावले,

            ” दुय्यम दर्जाची वागणूक आजी, आई-बाबानी दिली होती. पण त्याची शिक्षा स्वाती ताई,गीता ताई आणि मला कशाला दिली?” नंदन.

              ” तूच पहिला जबाबदार आहेस! तुझ्यामुळेच,आजी-आई-बाबा आम्हा तिघीना दूर करीत होत्या. मला तर एकानेही साधे प्रेमाने जवळ केले नाही. झोपेत चुकून आईच्या अंगावर हात पडला तर दूर ढकलत होती. स्वाती ताई आणि गीता ताई फक्त एक कर्तव्य म्हणून लहानपणी माझी शी-शु धुवत होत्या.” बोलता -बोलता शैला च्या डोळ्यात पाणी आले.

                 ” मी जबाबदार ? शैला ताई जसे मुलगी म्हणून जन्माला येणे हे तुझ्या हातात नव्हते तसे मुलगा म्हणून जन्माला येणे माझ्या हातात नव्हते. ज्यावेळी मुलगा म्हणून आजी-आई-बाबा मला डोक्यावर घेऊन नाचत होते तेव्हा मी केवळ ३/४ वर्षाचा होतो. मी काय कोणाला सांगितले नव्हते कि मुलगा आहे म्हणून मला डोक्यावर चढवा. पण आजी-आई-बाबा सारखे तू मला अजूनही  एखाद्या गुन्हेगाराला सारखे वागवतेस आणि शिक्षा  देत आहेस.  लंडन मध्ये शिक्षण पूर्ण झाल्या नंतर तू तिथेच हॉस्पिटल मध्ये जॉईन होऊन पैसे कमवायला लागली होतीस. पण त्या बद्दल तू आम्हाला काहीच कळवले नाही. तुझ्या साठी घेतलेले कर्ज आम्ही फेडत होतो. पण तू एक पैसा हि आम्हाला पाठवला नाहीस. शेवटी इंटरनेट च्या साहाय्याने आम्हीच तुझा लंडन मधील ठाव-ठिकाणा शोधून काढला. आणि इस्टेटी मधील तुझ्या शेअर चे  आमिष दाखवून तुला इथे बोलावून घेतले.” नंदन.

            ” म्हणजे हा सगळा तुमचा डाव होता. ते काही नाही, मी आज संध्याकाळीच्या फ्लाईट ने परत जाईन,” शैला.

           ” शैला मॅडम तुमचा पासपोर्ट बघायला मिळेल का?” सुप्रिया, नंदन आणि शैला चे भांडण थांबवून बोलली. 

            शैला ने लगेच आपला पासपोर्ट दिला. सुप्रियाने तो  पासपोर्ट नंदन च्या हातात दिला आणि म्हणाली “शैला, आता तुझ्या बाबांचे कर्ज फेडल्या शिवाय तू परत जायचे  नाही.”

            ” मॅडम , लंडन ला हॉस्पिटल मध्ये जॉब करते मी. इथे जर थांबले तर मला जॉब शोधावा लागेल. ” शैला 

            ” तुझ्या सारख्या लंडन रिटर्न डॉक्टर ला या देशात जॉब ची काही  कमतरता नाही.” सुप्रिया.

            ” अगदी बरोबर, कालच मी हिंदुजा  हॉस्पिटल मधील डॉक्टर शी बोललो आहे. ते तुला जॉब देतील.” नंदन.

             “अरे पण मला आजच्या दिवस जाऊ दे. तिथल्या बँक मध्ये जे पैसे जमा करून ठेवले आहे ते आणून तुमचे कर्ज फेडेन.” शैला.

              ” शैला ताई” ,  गीता ने पहिल्यांदा तोंड उघडले.”मी बँकेत काम करते तुझ्या लंडन च्या बँके मधील पैसे इथे राहून सुद्धा मागवता येतील. त्या निमित्ताने आम्ही तुला पुन्हा लंडन मध्ये पळून जाण्याची संधी देणार नाही. “

              हे ऐकून शैला मान  खाली घालून  शांतपणे नंदन आणि त्याच्या बहिणी बरोबर सुप्रियाच्या केबिन मधून बाहेर पडली

               समाप्त 

 

Related posts

Leave a Comment