The Kerala Minister’s Saga: A Marathi Rendition of Mumbai’s Crime Underworld – Marathi Version special 26 true story

फ्लॉप मूवी

‘के नारायणन’ ७५ वर्षाचे वयस्कर गृहस्थ त्यांच्या एका तगड्या बॉडीगार्डच्या हाताला पकडून बंगल्याची  प्रत्येक  पायरी सांभाळून उतरून बाहेर येत होते तेव्हा त्यांनी बघितले कि त्यांच्या कार च्या जवळ ACP नुंबी आणि कमांडर  तंबी दोघेही हास्य-विनोदात रंगले होते. ‘के नारायणन’ त्यांच्या जवळ येत असताना त्यांनी ऐकले, “आत्ता तो नक्कीच कोणीतरी politician झाला असेल !”ACP नुंबी, तंबी च्या हातावर जोरात टाळी मारून म्हणाला,असे म्हणून  दोघेही  खो-खो हसायला लागले.  तेवढ्यात त्यांनी समोरून ‘के नारायणन’ याना येताना पाहिल्यावर आपले हसणे थांबवून ‘के नारायणन’ याना सॅल्यूट केला. नंतर कमांडर  तंबी ने कार चा दरवाजा उघडला. ‘के नारायणन’ कार च्या आतमध्ये बसल्यावर तंबी त्यांच्या जवळ बसला ACP नुंबी दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून ‘के नारायणन’ च्या दुसऱ्या बाजूला बसला  आणि त्यांना हाताला धरून आणणारा  बॉडीगार्ड ड्रायव्हर च्या बाजूला बसला.

ड्राइवर ने कार स्टार्ट केल्या वर नारायणन, नुंबी आणि तंबी ला म्हणाला,”What is the joke about? I heard you were talking about a politician, I also want to know what joke you made about a politician?”

” Not joking, let it go,” तंबी हसून बोलला.

Why not  ? मी ऐकले होते कि तुम्ही म्हणत होता कि तो आता politician झाला असेल आणि जोर-जोरात हसायला लागलात. मला पण ऐकायचे आहे, अशी काय कॉमेडी आहे ती राजकारण्यांच्या बद्दल ! ” के नारायणन.

“Nothing special, या ACP नुंबी ने काल पकडलेल्या एका दरोड्याची केस सांगितली,” तंबी ने आजू-बाजूला लक्ष ठेऊन सांगितले.

” नुंबी?” नारायणन नुंबी कडे बघून म्हणाले पण नुंबीचे नारायणन आणि तंबी च्या बोलण्या कडे आजिबात लक्ष नव्हते. तो कार च्या बाहेर प्रत्येक हालचालींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत होता. पण नारायणन ने पुन्हा त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला विचारले ,” नुंबी, काय म्हणत आहे हा ?”

“आँ, काय झाले साहेब ?” नुंबी नारायणन कडे बघून बोलला,”सॉरी साहेब, मी बिझी होतो, मला माहित नाही तुम्ही दोघे काय बोलत होता ते.”

” तंबी म्हणाला कि, तुम्ही दोघे काल पकडलेल्या एका दरोड्याच्या  केस बद्दल बोलत होता आणि हसत होता. मला सांग काय होती ती केस? आणि त्यात पॉलिटिशिअन चा काय संबंध? नारायणन .

“पॉलिटिशिअन? त्यांचा कुठे काय संबंध होता कालच्या केस शी ?”, नुंबी.

“मग तू काय  म्हणत होता? कि तो आता पॉलिटिशिअन झाला असेल आणि जोर-जोरात हसायला लागला.” नारायणन.

“नाही, तस काही नाही,म्हणजे त्या केस शी पॉलिटिशिअन चा काही संबंध  नाही. काय आहे मी आत्ता  बिझी आहे.तुमच्या सेक्युरिटी ची जबाबदारी आहे माझ्यावर. आजू-बाजूला लक्ष ठेवले पाहिजे. आत्ता काही बोलता येणार नाही त्याबद्दल.” नुंबी विषय टाळण्यासाठी बोलला

“आजू-बाजूला लक्ष ठेवण्याचे, माझ्या सेक्युरिटी चे काम तू चालू ठेव फक्त मला तो पॉलिटिशिअन चा जोक ऐकायचा आहे. तो जोक सांग.”नारायणन आवाज चढवून बोलले.

मग नुंबी चा पण नाईलाज झाला आणि तो सांगू लागला…..

” काल दुपारी पोलीस स्टेशन मध्ये एका ज्वेलरी शॉप मधून फोन आला होता. तीन महिला आणि एक पुरुष त्यांच्या ज्वेलरी शो रूम मधे आले होते ते चार हि जण  स्वतःला क्राईम ब्रॅन्च चे अधिकारी आहोत असे सांगत होते आणि पाच लाख रुपयांची डिमांड केली होती. ज्वेलरी शो रूम च्या मालकाने त्यांच्या कडे ID कार्ड मागितले होते तर त्यांनी लगेच ID कार्ड आणि त्याबरोबर जप्ती करण्याचे कागदपत्रे दाखवली. तरीसुद्धा दुकानाच्या मालकाने पडताळणी करण्यासाठी पोलीस स्टेशन ला फोन केला तेव्हा पोलीस दुकानावर पोहोचले आणि त्या ४ हि डुप्लिकेट CBI  अधिकारींना अटक केली. त्यांच्याकडे असलेली खोटी ओळखपत्रे आणि कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलीस स्टेशन ला जेल मध्ये टाकल्या नंतर त्यांची चौकशी केले तेव्हा त्यांनी सांगितले कि हि आयडिया त्यांना अक्षय कुमार च्या  स्पेशल २६ या चित्रपटा वरून सुचली.”

” मग यात पॉलिटिशियन चा काय संबंध ?” नारायणनने पुन्हा तोच प्रश्न विचारला.

” हो ना , यात राजकारणाचा, पॉलिटिशियन चा काहीच संबंध नाहीये आम्ही फक्त या केस बद्दल बोलत होतो.” असे म्हणून नुंबी पुन्हा आपल्या कामाला लागला. पण नारायणन ने पुन्हा विचारले ,”पण तुम्ही बोलत होता कि ‘तो आत्ता  पॉलिटिशियन झाला असेल !’ आणि जोर-जोरात हसत होतास. मी माझ्या कानाने ऐकले होते. मला तो जोक सांग पहिले.”

“काही नव्हते साहेब,म्हणजे आम्हाला तसे काही बोलायचे नव्हते,” नुंबी पुन्हा टाळायला लागला.पण नारायणनने  पुन्हा आग्रह केला तेव्हा नुंबी ने पुढे बोलायला सुरुवात केली ……

“काल जेव्हा त्या चार फ्रॉड ना जेल मध्ये टाकले आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितली कि त्यांनी special २६ मुवि बघितली होती. त्यावरून त्यांनी ठरवले कि त्या मुवि मध्ये दाखवल्या प्रमाणे नकली CBI ऑफिसर बनून एका ज्वेलरी शॉप वर raid टाकायची. मूर्ख लेकाचे, जर कॉपी करायची होती तर एखाद्या सुपरहिट पिक्चर ची आणि आत्ताच्या काळात घडलेल्या स्टोरी ची कॉपी करायची होती.”

“म्हणजे ? असा कोणता सिनेमा होता तो? मला हिंदी चित्रपटाची जास्त माहिती नाहीये. मी केव्हाही तेलगू,कन्नड,मल्याळम चित्रपट बघतो. मला नाही माहित तुम्ही कोणत्या चित्रपटा बद्दल बोलत आहात ते. तो काय flop movie होता का ?” नारायणन भुवया उंचावून आश्चर्याने म्हणाला.

 

 

 

” अगदी फ्लॉप नव्हता, पण एव्हरेज चालला होता.” नुंबी

” आणि त्याच्या स्टोरी बद्दल तू काय म्हणत होतास? आजच्या काळातील स्टोरी ची कॉपी करायची होती. something like that , काय आहे काय त्या चित्रपटाची स्टोरी ?”नारायणन

” Special २६ एका true story वर आधारित आहे.”नुंबी

” कोणती सत्य घटना ? केव्हा घडली होती ती?” नारायणन ने उत्सुकतेने विचारले.

” १९ मार्च १९८७ रोजी मुंबई च्या ज्वेलरी शोरूम मध्ये झालेल्या robery वर.” नुंबी.

“१९ मार्च १९८७ ? काय होती ती true story ? लवकर सांग मला ती true स्टोरी ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. चित्रपटा बद्दल काही ऐकायचे नाहीये,” नारायणन ने अधीरतेने विचारले.

१९८७ मुंबई मध्ये एक त्रिभुवनदास भिमजी झवेरी ज्वेलर्स शोरूम होते म्हणजे अजूनही आहे. मुंबई मधील मोठं-मोठे श्रीमंत लोक त्यांच्या दुकानातून ज्वेलरी खरेदी करीत असतात.मुंबई मध्ये प्रतिष्ठित, सुप्रसिद्ध असे हे  ज्वेलरी शोरूम आहे. अशा शोरूम ला त्यावेळी फक्त एका भामट्याने नकली CBI ऑफिसर बनून लुटले. त्यावेळी त्याने जे प्लॅनिंग केले होते ते खोऱखारीच चक्रावणारें होते. आज हि हे सांगितले जाते कि आत्ता त्याला ३७ वर्षे झाली असेल. खूप वर्षे पोलिसानी तपास केला. त्याला पकडण्यासाठी पोलिसानी कित्येक लोकांची चौकशी केली, दुबई पर्यंत, आपल्या देशात केरळ मध्ये मुंबई पोलिसाची टीम गेली होती.पण अजूनही त्या चोराला पोलीस पकडू शकले नाही. याला एक PERFECT ROBBERY ,PERFECT THEFT , PERFECT CRIME चे पण नाव पोलिसानी दिले होते. ” नुंबी

” काय सांगतोस ! खुद्द पोलिसच याला PERFECT ROBBERY ,PERFECT THEFT , PERFECT CRIME म्हणतात! ” नारायणन डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

” हो पण काल पकडले गेलेल्या त्या ४ stupid fraud लोकांनी हीच आयडिया वापरून ज्वेलरी शो रूम लुटायचा प्रयत्न केला.”असे म्हणून नुंबी  ने नारायणन ला त्यांच्या मोबाइल मध्ये त्या ज्वेलरीशॉप चे CCTV फुटेज  दाखवले आणि म्हणाला  ” ३७ वर्षपूर्वी ची चोरी ची आयडिया आजच्या जमान्यात शक्य तरी आहे का?”

” शक्यच नाही, आज तर  ते कोणत्या ना कोणत्या कॅमेरा मध्ये पकडले जाणार त्यांना हे समजायला हवे होते. आत्ता तर अशी लूट करणे कठीण आहे. टेकनॉलॉजि ने पण क्राईम च्या दुनियेत मोठी क्रांती केली आहे.” तंबी  मधेच म्हणाला.

” हा समजले तू आता  मधेच डिस्टर्ब नको करू,”नारायणन तंबी ला एक फटका मारून म्हणाला,” नुंबी,तू ती १९८७ ची केस सांग.”

                 नुंबी पुढे बोलू लागला,”19 मार्च 1987 रोजी साडेतीनची वेळ होती. अरविंद इनामदार, जे त्यावेळी महाराष्ट्रातील क्राईम ब्रँचमध्ये तैनात होते, त्यांना त्रिभुवनदास भीमजी झवेरी ज्वेलर्सच्या मालकाचा फोन आला की, आमच्या दुकानावर सीबीआयने छापा टाकला आणि सीबीआयच्या अधिकाऱ्याने बरेच दागिने आणि रोख रक्कम घेतली.पण.त्याने आम्हाला कोणतीही पावती दिली नाही. हे ऐकून अरविंद इनामदार यांना धक्काच बसला. एवढ्या मोठ्या दुकानावर छापा टाकला आणि पोलिसांना कोणी कळवले नाही!  साधारणपणे असे छापे टाकावे लागतात तेव्हा सीबीआय स्थानिक पोलिसांना कळवते आणि त्यांची मदत घेतली जाते. आणि तो एवढा पैसा स्लिप शिवाय  घेऊन  निघून गेला तेव्हा त्यांचे कान टवकारले. त्यांनी लगेचच त्यांची टीम पाठवली, टीमने तिथे जाऊन चौकशी केली तेव्हा दुकान मालकाने सांगितले की, काही वेळापूर्वी सीबीआय अधिकारी येथे आला होता.तेव्हा पोलिसानी पहिले त्या CBI  ऑफिसर चे नाव विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि त्याचे नाव मोहन सिंग होते. एक मोहन सिंग हे नाव सोडले तर पोलिसांकडे आत्ता पर्यंत त्याची काहीच माहिती नाही. आणि मोहन सिंग पण त्याचे खरे नाव आहे हे पण खात्रीशीर पणे सांगता येत नव्हते. त्याने सरकारचे  रीतसर सील मारलेले  कागदपत्रे दाखवून, त्याच्या बरोबर आलेल्या २६ लोकांच्या ग्रुप ला  छाप्याचे आदेश दिले. दुकान मालक सुशिक्षित असल्यामुळे  raid म्हणजे  काय ? ते  माहीत होते.दुकानाच्या  मालकाकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर होते आणि त्याने तेही ताब्यात घेतले. त्याची देहबोली आणि बोलण्याची पद्धत अगदी सीबीआय अधिकाऱ्यासारखी होती, त्यामुळे कुणालाही शंका आली  नव्हती. आणि त्याने सांगितले की त्याला काही माहिती मिळाली आहे, त्यांना ऑर्डर मिळाली आहे, म्हणून आम्हाला तुमच्या दुकानाची झडती घ्यावी लागेल.शटर खाली ओढा, आतून कोणीही बाहेर जाऊ नये, बाहेरून कोणीही आत येऊ नये, यानंतर सुमारे ४५ मिनिटे दुकानातील सगळे  दागिने वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवून त्यावर कागद टाकून सीलबंद केले, आणि जेव्हा तो बरोबर घेऊन जाऊ लागला, तेव्हा दुकानाच्या मालकाने त्याला विचारले की तो इतका माल घेऊन जात असेल तर त्याची पावती तरी द्यावी. तेव्हा तो माझ्याकडे रोखून बघू लागला आणि म्हणाला की मी नंतर देईन, म्हणजे त्याने दुकान मालकाला असा attitude  दाखवला की त्यानंतर दुकान मालक गप्प झाले.आणि तो सरळ बाहेर गेला. तोपर्यंत कुणालाही शंका आली नाही. अर्धा तास उलटूनही तो परत न आल्याने दुकान मालकाने पोलिसांना बोलावले.

दुकान  मालकाची चौकशी झाल्या नंतर पोलीस टीम बाहेर आली तर त्यांना दिसले… कि बाहेर एक खाजगी बस उभी आहे, आणि त्यात २०/२५  स्त्री पुरुष होते. दुकान मालकाला आणि बाकीच्या स्टाफला ती बस दाखवल्या वर ते म्हणाले कि हीच ती बस होती आणि हाच तो २६ जणांचा ग्रुप  होता ज्याच्या मध्ये बसून तो CBI ऑफिसर आला होता आणि याच माणसांनी दुकानातील सगळे दागिने छोटी-छोट्या प्लास्टिक च्या पिशव्या मध्ये  भरले आणि त्यावर कागद चिटकवून सीलबंद केले .आणि नंतर त्या पिशव्या एका मोठ्या बॅग मध्ये भरल्या नंतर ती बॅग त्यांनी त्याच्या बॉसला दिली. त्याचवेळी दुकान मालकाने त्याला रिसिट बद्दल विचारले.”

“मग तो CBI ऑफिसर  पण त्याच बस मध्ये असेल आणि त्याच्याकडे ती ज्वेलरी बॅग पण होती म्हणजे तो खरोखरी एक CBI ऑफिसर होता ! “नारायणन ने मधेच विचारले.

” हाच विचार करून, पोलीस आणि दुकान मालक बस मध्ये चढले. तर तिथे तो CBI ऑफिसर नव्हताच ! बाकी सगळे २६ टीम मेंबर  आणि ड्राइवर बस मध्ये होते. तेव्हा पोलिसांनी त्यातील एकाला विचारले कि तुमचा team leader  कुठे आहे? तर तो म्हणाला कि दुकानदाराने रिसिट मागितली ती आणायला पोलीस स्टेशन ला जात आहे. असे म्हणून त्याने इथूनच एक टॅक्सी केली आणि गेला. मग तुम्ही ती रिसिट आणली का? हे सर्व ऐकून पोलीस बुचकळ्यात पडले.

त्या नंतर त्या २६ जणाना ताब्यात घेतले आणि चौकशी केली गेली. आणि त्यातून जी कहाणी समोर आली ती अशी होती…”

“कशी होती?” नारायणन ने  पुन्हा उत्सुकतेने विचारले.

” ती कहाणी समजल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या २६ लोकांची चौकशी केल्या वर समजले कि ते आजच्याआज CBI चे ऑफिसर झाले होते. सगळ्यांकडे CBI  चे ID कार्ड होते. त्यांची निवड करण्या अगोदर   १७ एप्रिल १९८७ ला म्हणजे दुकान लुटण्याच्या २ दिवस आधी. मोहन सिंग ने टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक जाहिरात दिली होती ती अशी कि –

 

 

 

 

Require dynamic graduate. for the intelligent officer post.

त्या जाहिराती खाली लिहिले होते कि interview venue and timing-ताज इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल 10a .m . to 5 p . m .

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ऍड… नोकरीची ऑफर… ती पण इंटेलिजन्ट ऑफिसर साठी ! एक-एक करून candidate ताज हॉटेल मध्ये पोहोचले. सकाळी १० ते संध्याळकळी ५ वाजेपर्यंत प्रत्येकाची interview झाली. interview पण अशी-तशी नाही तर रीतसर इंटेलिजन्ट ऑफिसर साठी जे पण प्रश्न विचारले जातात ते विचारले गेले, म्हणजे तुम्ही CBI कशाला जॉईन करीत आहात? तुमच्यात राष्ट्रभक्ती किती आहे? तुम्ही काय करणार CBI जॉईन करून? म्हणजे पोलीस फोर्स साठी जे पण जरुरीचे प्रश्न असतात ते विचारले गेले. त्यानंतर रिझल्ट अनाऊन्स झाले. टोटल २६ लोकांचे सिलेक्शन झाले. म्हणूनच त्या  मुवि  चे नाव स्पेशल २६ ठेवले होते पण चित्रपटाची स्टोरी वेगळी होती. त्या टोटल २६ लोकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ मार्च १९८७ च्या  सकाळी ११ वाजता  ताज इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल मध्ये बोलावले .गेले. सगळ्यांना मोहन सिंगने  CBI चे ID कार्ड दिले. CBI चे ID कार्ड मिळाल्यावर सगळे एक्दम खुश झाले. अगदी सहजपणे नोकरी मिळाली! ती पण सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत ! ID कार्ड मिळाल्यानंतर मोहनसिंग त्यांना म्हणाला कि आज मुंबईतल्या एका दुकानात आपल्याला रेड टाकायला जायचे आहे. त्यासाठी मोहन सिंग ने ताज हॉटेल तर्फे एक लक्झरी  बस बुक केली. आणि ती बस त्रिभुवन दास भिमजी झवेरी ज्वेलरी च्या दुकान समोर थांबवली.

 

 

 

” बस दुपारी २:२५ ला त्रिभुवनदास ज्वेलरी शॉप ला पोहोचली. बस मधून पहिले मोहन सिंग उतरला आणि त्याच्या मागोमाग २६ जण उतरली आणि सगळे ज्वेलरी च्या शोरूम मध्ये अशा पद्धतीने शिरले कि जसे काही आर्मी च्या एका तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवला. आतमध्ये गेल्या वर मोहन सिंग ने शोरूम च्या ओनर प्रताप झवेरी ला CBI चे ID कार्ड आणि गव्हर्नमेंट चे सील मारलेले रेड चे पेपर अशा पद्धतीने दाखवले जसे काही सोल्जर ने आपली रायफल त्याच्या डोक्यावर रोखली, ते पेपर बघितल्यावर मोहन सिंग ने प्रताप झवेरी कडे त्यांची लायसन्स रिव्हॉल्व्हर मागितली. आणि प्रताप ने पण ती बंदूक त्यांच्या कडे अशी दिली जशी काही एखाद्या योध्याने शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करली.प्रताप झवेरीचा त्याच्या बोलण्याचा,आणि रागीट  हाव-भाव बघून तो CBI ऑफिसर असल्याची खात्री पटली. मोहन सिंग ने   दुकानाचे शटर डाऊन करायला सांगितले. त्याच्या बरोबर असलेल्या बाकीच्या २६ जणांना दुकानातील प्रत्येक दागिना उचलायला सांगितला आणि छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पॅक केले आणि त्यावर सील मारले . हे काम त्याच्या बरोबर आलेल्या २६ जणांना करायला सांगितले सगळे दागिने गोळा केल्या नंतर त्याना ते एका बॅग मध्ये भरायला सांगितले तसेच दुकानात असलेली कॅश पण त्याने त्याच बॅग मध्ये भरायला सांगितले. तो फक्त ऑर्डर देत होता आणि बाकीचे २६ जण त्या प्रमाणे काम करत होते. प्रताप झव्हेरीनी पोलिसांना सांगितले कि त्याच्या बोलण्याचा अंदाज असा होता कि ते त्याच्याशी काही वाद घालू शकले नाही. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कातील इतर व्यावसायिकांकडून अशाच पद्धतीने दुकानावर छापा टाकला जातो असे ऐकून होते. त्यामुळे त्यांना एकदाही असे वाटले नाही कि ते लुटले जात आहेत. फक्त जेव्हा तो ती दागिने आणि कॅश  भरलेली बॅग घेऊन जाऊ लागला तेव्हा एकदा रिसिट मागितली. पण त्यावेळी पण त्याने असा काही ऍटिट्यूड दाखवला आणि म्हणाला आणून देतो. तेव्हा पण ते लगेच गप्प झाले.”एवढे बोलून नुंबी ने त्याच्या कडे असलेल्या पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडले आणि त्यातील पाणी पिऊ लागला.

 

तेव्हा लगेच नारायणन ने विचारले,” एकूण किती किमतीचे दागिने आणि कॅश त्याने त्या बॅग मध्ये भरली?”

“एक्झयाक्ट, अमाऊंट अजून कळली नाही . असे म्हणतात कि पंचवीस ते ३० लाखांची कॅश आणि  दोन  ते साडे तीन कॅरोडची ज्वेलरी त्याने बॅग मध्ये भरली. नक्की किती अमाऊंट होती ते आत्ता पर्यंत कळले नाही कारण शॉप ओनर सांगू शकला नाही.”असे बोलून नुंबी  पुन्हा पाणी पिऊ लागला.

“मग पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी काय केले ?” नारायणन

“पोलिसांनी मग एका स्केच आर्टिस्ट कडून ती २६ जण, ज्वेलरी शॉप ओनर, हॉटेल स्टाफ यांनी दिलेल्या माहिती नुसार त्याचे एक स्केच तयार केले. ते स्केच नंतर त्या एरियातील टॅक्सी ड्रॉयव्हर ना दाखवले. त्या मधील ज्या टॅक्सी मध्ये तो बसला होता त्या टॅक्सिच्या ड्रायव्हरने त्याला ओळखले त्याने सांगितले कि पोलीस स्टेशन ला घेऊन जायला सांगितले पण काही अंतर गेल्यावर एका सिग्नलच्या जवळ खूपच ट्राफिक जॅम झाले तेव्हा त्याने सांगितले कि मला उशीर होईल म्हणून मीटर चे जेवढे भाडे झाले आहे तेवढे देऊन टॅक्सितून उतरला आणि बॅग घेऊन पायी चालत गेला तो गेला ! नंतर कुठे गेला कोणालाच कळले नाही. त्याला जमिनीने खाल्ले कि आकाशाने गिळले काहीच माहित नाही.ती २६ जण, ज्वेलरी शॉप ओनर, हॉटेल स्टाफ यांनी केलेल्या वर्णनानुसार त्याचे त्यावेळी म्हणजे १९८७ मधें त्याचे वय ४० वर्षे असेल. आज ३७ वर्ष नंतर म्हणजे ४०+३७ म्हणजे तुमच्या सारखा ७७ वर्षाचा एक ज्येष्ठ नागरिक झाला असले. आणि आता जिथे कुठे असेल आणि जिवंत असेल तर कायद्यावर,पोलिसांवर हसत असेल.आणि मनातल्या-मनात म्हणत असेल कि बघा कि मी एवढी मोठी चोरी केली आणि आज पण कोणी माझ्यावर हात सुद्धा टाकला नाही!” एवढे बोलून नुंबी ने बाटलीतील उरले-सुरले पाणी संपवले.

“मग या सगळ्यात पॉलिटिशियन चा काय संबंध ?म्हणजे तुझ्या मते तो आता कोणी तरी राजकारणी झाला असेल असे आहे का? आणि तू म्हणाला माझ्या सारखा ७७ वर्षाचा ज्येष्ठ नागरिक म्हणजे तु माझ्या वर संशय घेतो? कारण मी पण गेले ३७ वर्षे राजकारणात सक्रिय आहे. या “चिपलकट्टी” नावाच्या जिल्ह्याच्या नगराध्यक्ष पदा वरती मी काम करीत आहे.आज पर्यंत मी लग्न केले नाही स्वतःला मी पूर्णपणे या  जिल्ह्याच्या विकासासाठी वाहून घेतले. तुला जर संशय येत असेल तर हा तंबी माझा फक्त बॉडीगार्ड  नाही आहे याच्या कडे माझे पूर्ण फायनान्शिअल रेकॉर्ड आहे.त्याचे वडील पण माझे काम पाहत होते. माझा उजवा हात होते ते.?” नारायणन ने रागाने विचारले.

“पण साहेब, मी कधी तुमचे नाव घेतले होते? किंवा कधी असे म्हणालो, कि तो चोर तुम्ही असाल?”

त्याचवेळी त्यांची कार हॉस्पिटल पाशी थांबली. नुंबी आणि तंबी गाडीतून उतरले आणि के नारायणन याना कर मधून उतरण्यासाठी मदत करू लागले. नारायणन सुद्धा दोघांचे हात पकडून गाडीच्या बाहेर आले आणि उतरल्यावर नारायणन लगेच नुंबी वर खेकसले,”तू डायरेक्टली नाही पण इंडिरेक्टली मला टोमणा मारला.” एवढे बोलून नारायणन डॉक्टरांच्या केबिन कडे गेले. नुंबी त्यांना समजावण्या साठी बोलणार होता पण नारायणन यांच्या सेक्युरीटी चे काम त्याच्या कडे होते म्हणून त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून पहिले त्यांच्या मागो-माग चालू लागला डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडून तो पहिले आत गेला. आतली केबिन चेक केल्यानंतर नारायणन ना हाताला धरून डॉक्टर समोर बसवले. नंतर नुंबी आणि तंबी दोघे बाहेर आले आणि दरवाजाच्या बाहेर उभे राहिले.

तेव्हा तंबी म्हणाला,”तू पण, साहेबाना असे कसे बोलला ? साहेब केवढे भडकले तुझ्यावर . ”             ” साहेब रागावले, पण मी नोटीस केले कि ते दिखावा करत होते! मी पाहिले होते. ते मला जेव्हा ओरडत होते, तेव्हा ते गालातल्या गालात हसत होते.” नुंबी आजू-बाजूला लक्ष ठेवत म्हणाला.

” काहीही बोलू नकोस, साहेब खरोखरीच रागावले होते.”तंबी.

“साहेब केव्हा पासून आपल्या जिल्ह्याचे मेयर आहेत रे?” नुंबी स्वतःच्या गाला वरती हात फिरवीत म्हणाला.

” मला माहित नाही. मागच्या वर्षी माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी मी लागलो.”तंबी आपला उजवा हात झटकून म्हणाला.

तेवढ्यात के नारायणन बाहेर आले. त्यांच्या हातात डॉक्टर च्या रिपोर्ट ची फाईल, होती, त्या बरोबर त्यांचे  वॉलेट  होते ते तंबी च्या हातात देऊन म्हणाले,” मी वॉशरूम मध्ये जातो तू हे तुझ्याकडे ठेव.” एवढे बोलत असताना पण  नारायणन च्या चेहऱ्या वर हसू होते. ते त्यांना आवरत नव्हते. नुंबी च्या तीक्ष्ण नजरेने हे नोटीस केले होते. ते वॉशरूम मध्ये गेल्यावर तंबी आणि नंबी वॉशरूम च्या बाहेर उभे राहिले.

आतमध्ये गेल्या वर नारायणन ला पुन्हा नुंबी चे ते शब्द आठवले कि-‘आता जिथे कुठे असेल आणि जिवंत असेल तर कायद्यावर,पोलिसांवर हसत असेल.आणि मनातल्या-मनात म्हणत असेल कि बघा कि मी एवढी मोठी चोरी केली आणि आज पण कोणी माझ्यावर हात सुद्धा टाकला नाही!’

ते आठवल्यावर नारायणन ला हसू आवरले नाही आणि जोरात हसायला लागला. त्यानंतर त्याला नुंबी चे हे पण  शब्द आठवले कि-‘आत्ता तो नक्कीच कोणीतरी पॉलिटिशियन झाला असेल !’ मनातल्या-मनात म्हणाला…..’नुंबी, तू बरोबर ओळखलस ‘. तेवढ्यात त्यांच्या छातीत जोराची कळ  आली आणि ते वेदनेने विव्हाळायला लागले,लगेच त्यांनी वॉशरूम च्या दरवाजाची कडी उघडली. बाहेर नुंबी आणि तंबी ला  नारायणन च्या हसण्याचा आवाज येत होता.ते हसण्याचा आवाज ऐकून गोंधळून गेले होते.  पण तेवढ्यात  नारायणन ने दरवाजा उघडला आणि तो ताम्बीच्या अंगावर कोसळला नुंबीने लगेच नर्स आणि डॉक्टर, वॉर्डबॉय ना आवाज दिला. वॉर्डबॉय लगेच स्ट्रेचर घेऊन आला आणि नारायणन ना स्ट्रेचर वर घेऊन नंतर बेड वर ठेवले. तेव्हा तंबी ने आपल्या हातातील नारायणन ची  फाईल आणि  वॉलेट बेड च्या बाजूला टेबलावर ठेवले.

डॉक्टरांनी चेक केल्यावर सांगितले कि त्यांना हार्ट अटॅक आला आहे. पण लगेच ट्रीटमेंट दिल्यामुळे त्यांचा जीवाला धोका नाहीये. पण ते कोमा मध्ये आहेत. किती दिवस लागतील ते सांगता येणार नाही कोमा मधून बाहेर यायला. तंबी,नुंबी आणि इतर जण नारायणन ला बघत होते आणि डॉक्टरांचे म्हणणे ऐकत होते. नाम्बी ने नोटीस केले कि कोमात गेल्या वर पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. मधून-मधून त्यांचे डोळे हालत आहे. तेवढ्यात डॉक्टरांनी एक लिस्ट दिला आणि मेडिकल मधून सामान आणायला सांगितले. नुंबी  ने लगेच ती लिस्ट घेतली आणि सगळ्यांच्या नकळत त्याने  नारायणन चे  वॉलेट घेतले.

ते घेऊन बाहेर आल्यावर नुंबी अगोदर झरोक्स च्या दुकानात गेला तिथे त्याने नारायणन च्या   वॉलेट मधून नारायणनचे आधार कार्ड आणि पण कार्ड चे झेरॉक्स घेतले आणि नंतर मेडिकल स्टोअर मधून डॉक्टर ने दिलेली लिस्ट दाखवून औषधे घेतली. हॉस्पिटल मध्ये आल्या नंतर  नुंबी  ने नारायणन चे वॉलेट परत जिथे होते तिथे ठेवले, आणि  औषधे  नर्स कडे दिली. तेवढ्यात नाईट शिफ्ट ड्युटी करणारा स्टाफ आला. नुंबी ने  पूर्ण चार्ज, नाईट शिफ्ट ड्युटी स्टाफकडे सोपवली  आणि त्याच्या घरी गेला.

घरी आल्या नंतर नुंबी ने पहिले त्याने इंटरनेट ओपन केले. नारायणन चे आधार कार्ड आणि पॅन कार्ड नेट वर डाउनलोड केले. त्याला आठवत होते कि ४ वर्ष पूर्वी पोलीस ट्रैनिंग ला मुंबईला होता तेव्हा हि केस त्याला स्टडी ला दिली होती. त्या केस ची डिटेल असलेली फाईल त्याने लॅप टॉप मध्ये सेव्ह केली होती, तसेच त्याच्या कडे  नारायणन ची माहिती असलेले काही मासिकाची आणि न्यूज पेपर ची कटिंग होती ती त्याने पहिले वाचली.

नारायणन चा जन्म १९४७ सालात  याच दक्षिण भारतातील केरळ राज्यातील  चिपालकट्टी गावात झाला होता,  त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, १०/१५ वर्षाचे असताना अर्थार्जनासाठी ते दूर कुठल्या तरी शहरात गेले होते. त्यांनंतर १९८७ च्या डिसेम्बर मध्ये ते परत  चिपालकट्टी गावात आले. त्यावेळी त्यांच्या जवळ करोडो रुपये  होते. तेव्हा त्यांनी  सांगितले कि ते दुबई मध्ये गेले २० वर्षे एका कंपनीत कामाला होते आणि तिथे त्यांनी सेविंग करून त्याने एवढे पैसे जमा केले होते.पण याचा कुठलाही लेखी पुरावा नव्हता. फक्त ‘त्यांनी सांगितले’  एवढाच उल्लेख मासिकां मध्ये होता. पण  चिपालकट्टी गावात परत आल्या नंतर त्यांनी जमवलेले करोडो रुपये चिपलकट्टी गावाच्या विकासा साठी खर्च केले त्या रुपयांनी त्यांनी गावात आधुनिक सोयी-सुविधानी युक्त अशी शाळा- कॉलेज बांधली, आणि हॉस्पिटल बांधली. त्यातून जे काही उत्पन्न झाले त्यातून काही उद्योगधंदे सुरु केले . रस्ते, ब्रिज बांधले, हळू-हळू चिपालकट्टी गावाचे रूपांतर एका आधुनिक जिल्ह्यात झाले,

नारायणन यांच्या या कार्याचे कौतुक करणारे अनेक लेख मासिकात, न्यूजपेपर मध्ये होते. पण १९८७ च्या अगोदर ते दुबई मध्ये एका कंपनीत कामाला होते एवढाच उल्लेख एका मासिकात होता, नुंबी ने नेटवरती  तसेच लायब्ररीत जाऊन त्यावेळची न्यूजपेपर, मासिक वाचली, नारायणन च्या नातेवाईकांची जवळच्या मित्रांची चौकशी केली. पण काहीच उपयोग झाला नाही. त्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.

मग नुंबी ने  त्याच्या लॅपटॉप मध्ये सेव्ह केलेली फाइल ओपन केली आणि त्यात १९८७ मध्ये हि चोरी झाल्या नंतर त्या चोरीचा तपास  कोणी-कोणी आणि कशाप्रकारे केली, त्याचे डिटेल लिहिले होते. या तपासाची  सगळी सूत्र त्यावेळचे चाणाक्ष  ऑफिसर DEPUTY COMMISNOR  OF POLICE   S . M . MUSHRAF याना दिली गेली. या तपासाच्या वेळी त्यांनी पहिले कि ज्या  ताज इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल मध्ये मोहन सिंग राहिला होता. ऍक्च्युअली तो मोहन सिंग या नावाने राहिला होता म्हणून त्याचे नाव या केस मध्ये मोहन सिंग लिहिले होते. पण मोहन सिंग हे त्याचे नाव पण खरे होते, हे सांगता येणार नाही. त्याचे कारण असे होते कि त्याने आपला पत्ता त्रिवेन्द्रम केरळ मधून आला आहे सांगितले होते. आणि जी पण लोक त्याला भेटली होती ते सगळे म्हणले कि तो South Indian accent मध्ये बोलत होता. त्यामुळे एक खात्री झाली कि तो कोणी तरी दक्षिण भारतीय होता. त्या नंतर मुंबई पोलीस टीम ला केरळ मध्ये पाठवण्यात आले होते. पोलीस टीम ने केरळ मध्ये खूप शोध घेतला तेव्हा एक संशयित मिळाला-जॉर्ज ऑगस्टाईन फर्नांडिस!

 

स्केच आर्टिस्ट कडून काढलेल्या स्केच शी त्याचे थोडेफार साम्य होते. नुंबी च्या लॅपटॉप स्क्रीन वरती त्याचे स्केच आणि  फर्नांडिस चा फोटो दिसत होता.  त्याची दीर्घकाळ चौकशी केली गेली. पण त्यानंतर कळले कि तो एक मामुली चोर होता. ज्या तारखेला हि चोरी झाली होती म्हणजे १७/१८/१९ मार्च १९८७ ला तो मुंबई मध्ये नव्हताच! तो तिथेच केरळ मध्ये होता. नाईलाजाने त्याला सोडावे लागले. म्हणजे हिच काय ती एकुलती एक अटक झाली होती ती पण अयशस्वी ! यानंतर मुंबई पोलिसाना आणखी एक टीप मिळाली कि तो दुबई मध्ये आहे. म्हणून मुंबई पोलीस टीम दुबई मध्ये गेली. पण तिथे पण मुंबई पोलीस टीम ला काही यश मिळाले नाही. नंतर देशामध्ये  अशाच अधून-मधून भरपूर टीप मिळाल्या पण मोहन सिंग किंवा मोहन सिंग च्या नावावर हि चोरी करणारा चोर मिळाला नाही.

 

या नंतर मुंबई पोलिसानी दुसरा प्लॅन केला, त्याला पकडायचा. त्याच्या चोरी करण्याच्या पद्धती वरून एक गोष्ट नक्की झाली कि त्याला  CBI चा छापा मारण्याच्या  पद्धती बद्दल पूर्ण पणे  माहिती होती. त्याला माहिती होती कि CBI चा छापा मारण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात, त्यासाठी सील कसे कुठे मारावे लागतात. तेव्हा दोन शक्यता उत्पन्न झाली. एक-मोहनसिंग स्वतः CBI  मध्ये काम करत असेल आणि काम करता करता अचानक त्याची नियत बिघडली असेल आणि जास्तीत-जास्त पैसे कमावण्या साठी.असली CBI  ऑफिसर असून सुद्धा  वरिष्ठांच्या नकळत नकली CBI ऑफिसर बनून खोटी छापेमारी करून लुटत असेल. म्हणून मुंबई पोलिसानी CBI  च्या अनेक ऑफिसिअल ची लिस्ट बनवली. वेग- वेगळ्या राज्यामध्ये. आज पण CBI मध्ये ८०० ऑफिसर  आहेत. म्हणजे खूप मोठी फोर्स नसते.मग १९८७ मध्ये ३००-४०० ऑफिसर असतील.  त्यामुळे मुंबई पोलिसांनी मोहन सिंग यांचे स्केच त्यांच्या फोटोंसोबत जुळवले.. पण मोहनसिंग शी मिळत-जुळता एक हि चेहरा मिळाला नाही.  म्हणजे पहिली शक्यता  फेटाळून लावली.

मग दुसऱ्या शक्यतेचा विचार केला गेला तो म्हणजे तो कुठल्या तरी CBI ऑफिसर च्या संपर्कात असेल जो त्याला सगळी माहिती देत असेल. किंवा त्या CBI ऑफिसर ला पण माहित नसेल कि त्याच्या माहितीचा तो  गैर फायदा घेत असेल.  या दुसऱ्या शक्यतेचा विचार करून CBI ऑफिसर्स ची चौकशी केली गेली पण त्यात सुद्धा मुंबई पोलीस अयशस्वी झाले,

त्यामुळे आजहि या केस ची फाईल मुंबई पोलिसांच्या कॉम्पुटर मध्ये PERFECT ROBBERY ,PERFECT THEFT , PERFECT CRIME या नावाने सेव्ह आहे.

हे वाचून नुंबी ने ती  फाईल तंबी ला पाठवली आणि त्या बरोबर मेसेज केला- हि केस आत्ता PERFECT ROBBERY ,PERFECT THEFT , PERFECT CRIME या नावाने सेव्ह होणार नाही तर क्लोज केस म्हणून सेव्ह राहील. कारण तो चोर मी बायोमेट्रिक पुराव्याने  पकडला आहे. आणि तो चोर म्हणजे आपले ग्रेट पॉलिटिशियन- के नारायणन…!

हा मेसेज वाचून तंबी चांगलाच भडकला. आणि तो सरळ नुंबीच्या घरी आला आणि ओरडला,”तुझी हिम्मत कशी झाली आपल्या नारायणन साहेबाना चोर बोलण्याची.तू इथे ट्रान्सफर होऊन आला आहेस त्यामुळे तुला माहित नाही. आमच्या नारायणन  साहेबानी गेले ३७ वर्षात  चिपलकट्टी गावाचे  जिल्ह्यात रूपांतर केले.आत्ता ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक त्यांची कोमा मधून बाहेर येण्याची वाट बघत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक देवळात लाखो लोक त्यांना बरे करण्यासाठी पूजा, प्रार्थना जलाभिषेक करीत आहेत.

आणि काय रे तुला १९८७ च्या त्या रोबरी चा कुठला बायोमेट्रिक पुरावा मिळाला ? बायोमेट्रिक म्हणजे काय ते तुला माहित तरी आहे का? DNA टेस्ट, डोळ्यांचा रेक्टिना १९८७ मध्ये DNA टेस्ट चा D पण कोणाला माहित होता का?”

“DNA टेस्ट, फक्त बायोमेट्रिक पुरावा होत नाही. इथे ये  मी तुला माझ्या लॅपटॉप वर दाखवतो कुठला बायोमेट्रिक पुरावा मिळाला आहे तो.” नुंबी ने तंबी ला हाताने  इशारा करून जवळ बोलावले आणि त्याला लॅपटॉप ची स्क्रीन दाखवली.

” हे आहे नारायणन साहेबांचे  आधार कार्ड आणि पॅन कार्ड, या मध्ये हा QR कोडं मी ओपन करतो.” ते ओपन केल्या वर  नारायणन च्या हाताच्या पंज्याचे ठसे दिसतात. “१९८७ मध्ये ज्वेलरी शॉप वर नकली रेड करणाऱ्या मोहन सिंग उर्फ आपल्या नारायणन साहेबांनि त्यांच्या बरोबर असलेल्या २६ जणांना स्वतःच्या हाताने IDकार्ड  वाटली त्यांचे फिंगर प्रिंट हे बघ.” नुंबी ने लॅपटॉप स्क्रीन वर फिंगर प्रिंट वर एर्रो  नेऊन दाखवला.

“मग हे प्रिंट कुठल्या  फिंगर प्रिंट एक्सपर्ट ला दाखवले ?”तंबी.

” अरे कुठल्या जमान्यात वावरतोस ?आज २०२४ मध्ये  फिंगर प्रिंट मॅच करण्यासाठी  फिंगर प्रिंट एक्सपर्ट ची जरुरत नाही लागत . हे बघ…” असे म्हणून  गूगल सर्च  वरती एका लिंक वर क्लिक केले त्यात त्याने दोन्ही फिंगर प्रिंट ची इमेजेस डाउनलोड केले. आणि लगेच समोर स्क्रीन वर उत्तर आले “मॅच”.

“एवढेच नाही तर हे बघ” असे बोलून नुंबी ने नारायणन ने  १९८७ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये जाहिरात देण्या साठी  स्वतःच्या हाताने लिहिलेली    Require dynamic graduate. ची चिठ्ठी डाउनलोड केली  आणि दुसऱ्या बाजूला पॅन कार्ड वरची नारायणन ची सिग्नेचर डाउनलोड केली. त्याचे हि उत्तर ‘मॅच’ असे आले.

” हे २ बायोमेट्रिक प्रूफ नारायणन साहेबाना अटक करण्यासाठी पुरेसे आहेत. ” नुंबी लॅपटॉप बंद करून म्हणाला.

तंबी, नुंबी ला काही बोलणार तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. फोन वरून समोरचे बोलणे ऐकल्या तंबी चे डोळे पाणावले.आणि गळा दाटून आला. मोबाईल डिस्कनेक्ट करून रडवेल्या आवाजात तो नुंबी ला म्हणाला,” हा मेसेज आणि हे प्रूफ तू माझ्या व्यतिरिक्त आणखी कोणाला दाखवलेस ?”

” कोणालाच नाही, फक्त तुलाच पहिल्यांदा दाखवले.” नुंबी.

” दाखवू पण नको,त्याचा काहीच उपयोग नाही. कारण आत्ताच फोन आला होता त्यात सांगितले कि नारायणन साहेबांचे निधन झाले. बाहेर जमलेली पब्लिक एवढी भडकली कि त्यांनी हॉस्पिटलची तोड-फोड केली. आता आपल्याला हॉस्पिटल मध्ये पब्लिक वर कंट्रोल करण्यासाठी गेले पाहिजे. माझ्या  मोबाईल वरचा तुझा मेसेज मी डीलीट करतो तुझ्या मोबाईल वरचा मेसेज तू  डीलीट कर. कारण हा मेसेज चुकून जरी दुसऱ्या कोणाकडे गेला तर. हॉस्पिटल प्रमाणे ते तुला फोडतील.” तंबी डोळ्यातील पाणी पुसून म्हणाला.

नुंबी ने पण पुढचा धोका ओळखून आपला विचार बदलला आणि मेसेज डीलीट करून तंबी बरोबर हॉस्पिटल मध्ये जायला निघाला.

समाप्त

Related posts

Leave a Comment