Hypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – MARATHI VERSION

Hypnotized    हिरानंदानी, पवई मुंबई मधील जॉगर्स पार्क रोजच्या सारखा  सकाळी सहाच्या सुमारास जॉगिंग ,मॉर्निंग वॉक ,लाफ्टर क्लब मध्ये जोरजोरात हसणाऱ्या सदस्यांनी आणि जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणाऱ्या युवकांनी नेहमीसारखा ताजा टवटवीत झाला होता.                        पण जिम एकविकपमेन्ट वर एक्सरसाईस करणारा सहा फूट तीन इंचाचा, पिळदार शरीरयष्टीचा,सिक्स पॅक  २८ वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर तारिक पठाण  मात्र एक्सरसाईस करीत असताना त्याच्या  मित्राची आदित्यची आतुरतेने वाट बघत होता. त्याच्याशी त्याला अत्यंत महत्वाचे बोलायचे होते. रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. आदित्य शी चर्चा…

Read More

Hypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – Hindi Version

Hypnotized हीरानंदानी, पवई मुंबई में जॉगर्स पार्क हमेशा की तरह सुबह छह बजे जॉगिंग, मॉर्निंग वॉक, लाफ्टर क्लब के सदस्यों के जोर-जोर से हंसने और जिम उपकरणों पर व्यायाम करने वाले युवाओं के साथ तरोताजा हो गया  था।                                लेकिन 28 वर्षीय पुलिस इंस्पेक्टर तारिक पठान, छह फुट तीन इंच लंबे, तराशे हुए, सिक्स पैक वाले, जिम उपकरणों पर  व्यायाम करते समय अपने दोस्त आदित्य का बेसब्री से इंतजार कर रहे थे। उनसे बहुत महत्वपूर्ण बातचीत…

Read More

Hypnotized: Love Explored with Caution in a Tale of Cautious Romance – English

Hypnotized   The Joggers Park in Hiranandani, Powai Mumbai       was as usual refreshed around six in the morning with jogging, morning walk, laughter club members laughing loudly and youths exercising on gym equipment.                        But 28-year-old Police Inspector Tariq Pathan, a six-foot-three-inch, six-pack, exercising on the gym equipment, was eagerly waiting for his friend “Aditya” while he was exercising. He had a very important talk with him. All night he did not sleep. Without discussing with Aditya,…

Read More

Echoes of Mortality: Unveiling the Haunting Tale of Human Remains and the Specter of Death – Hindi Version

Human Remains                          हवा की गति से दौड़ती हुई श्वेता अस्पताल की लॉबी में दाखिल हुई | उन्हें अपने सामने देखकर हॉस्पिटल में मौजूद एयरलाइन के क्रू मेंबर खड़े हो गए और कहा– “माफ़ करें मैडम, मुझे मालूम है के आप और आप के  पति आशीष दोनों साथ मैं रहते नही है,लेकिन यहां कोलकाता उतरने के बाद अचानक  आशीष की तबीयत इतनी  खराब हुई के,उन्हें यहां एक अस्पताल में भर्ती कराना पड़ा! उसकी जांच करने पर डॉक्टर ने ,मरीज के निकट संबंधी को बुलाने के लिए…

Read More

Samet: Bridging Differences in Live-In Relationships Through Unconventional Solutions -मराठी एकांकिका script

Samet एका फ्लॅट चा मोठा लिविंग रूम. मधोमध मोठा सोफा मध्ये सेंटर टेबलं त्यावरती एक वाझ आणि त्याच्या दोन हि बाजूला सिंगल चेअर.सोफ्याच्या मागे गॅलरी तिथे प्लेन पांढऱ्या रंगाचे पडदे लावले आहेत. हॉल  च्या दरवाजा मधून याकूब आणि आदित्य दोघेही 28 वर्षीय तरुण एन्ट्री घेतातं. पहिले याकूब बोलत बोलत आत येतो. त्याच्या मागून आदित्य त्याला समजावण्याच्या सुरात बोलत येत असतो.   आदित्य -याकूब,dont behave like teenager ! मला एक समजत  नाही कि तू एक तगडा  28 वर्षाचा गोल्ड मेडल विनर  पोलीस ऑफिसर आहेस कि,१७/१८ वर्षाचा एक तर्फी प्रेमात पडलेला चॉकलेट बॉय !   याकूब – आणि मिस्टर  आदित्य……. मला एक समजत नाही, तू माझा मित्र आहेस कि तिचा वकील ?  तिचे  प्रत्येक म्हणणे तुला  बरोबर वाटते!   आदित्य- हो हो मला तिचेच म्हणणे  बरोबर वाटते . कारण मी तुझा लहानपणा पासूनचा मित्र आहे. तू अभ्यासात जसा हुशार होतास तसाच कराटे, बॉक्सिंग, स्विमिंग यामध्ये पण चॅम्पियन होतास तू ,कॉलेज मध्ये मॅचो मॅन म्हणून फेमस झाला होतास तू, कॉलेज मधल्या भरपूर मुली तुझ्यावर फिदा झाल्या होत्या. तुझ्या मध्ये झालेला प्रत्येक बदल मी नोटीस करतो. वयाच्या १७/१८ वर्षांपासून तू तर मुलींच्या बाबतीत प्लेबॉय नंबर वन  होतास ! दर २/३ महिन्याने नवीन मैत्रीण असायची.! एक्दम हायपर सेक्सऊलीटी डेव्हलप  झाली होती तुझ्यामध्ये ! त्यात आणखी चेनस्मोकर  सारखी सिग्रेट आणि दारूची भर पडली ! मला तर भीती वाटत होती कधी बलात्काराचा अपराध तर घडणार नाही ना तुझ्या हातून !!! याकूब – त्या साठी तू मला एका सायकॅट्रिस्ट कडे पाठवले. सायकॅट्रिस्ट कसला,हिप्नॉटिझम चा स्पेसिलीस्ट   होता, त्यांनी माझ्या वर हिप्नॉटिझम चा प्रयोग केला !   आदित्य -(डोक्यावर हात मारून ) तीच माझी घोडचूक झाली ….!!!!! त्यांच्या  हिप्नॉटिझम मुळे तुझे सिग्रेट आणि दारूचे व्यसन सुटले पण ऐश्वर्या नावाचे व्यसन लागले.   याकूब – त्यांनी हिप्नॉटिझम चा एक व्हीडिओ माझ्या मोबईल वर पाठवला.—— (सेट वर ब्लॅक आऊट गॅलरी  चा पांढरा पडदा प्रकाशमान होतो. पडद्यावर फक्त एका माणसाची सिग्रेट ओढताना आणि दारूचे पेग घेत असताना त्याबरोबर मोबाईल बघत असताना एक काळीकुट्ट सावली त्याच्या मागे  चकलीच्या आकाराची एक आकृती गोल गोल फिरायला लागते. ) याकूब – ( व्हॉइस ओव्हर ) आणि तो व्हिडीओ पण अशा वेळी मिळाला जेव्हा मी मस्त आरामात माझ्या घरी ड्रिंक घेत होतो बरोबर मस्त सिग्रेट चा झुरका घेत होतो तेव्हा मोबईल वर हिप्नॉटिझम चा  व्हिडीओ आला, मी त्या व्हिडीओ च्या अमलाखाली असताना माझ्या समोर ऐश्वर्या आली तेव्हा माझ्या हातून सिगरेट आणि दारूचा ग्लास हलकेच गळून पडला आणि मी तिच्या मागोमाग मंतरल्या सारखा बेडरूम मध्ये गेलो. अचानक मी तिला मागून घट्ट पकडले, पहिले तर तिने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण नंतर रागाने  मागे वळून तिने बघितले तेव्हा माझ्या नजरेशी तिची  नजर भिडली आणि तिचा सगळा विरोध गळून पडला नंतर जे काही झाले ते सगळे आमच्या दोघांच्या सहमतीने झाले. (ब्लॅक आऊट ओव्हर आणि व्हॉइस ओव्हर अल्सो फिनिश  ) याकूब – रात्र आम्ही अशीच संपवली. सकाळी मी तिला लग्ना  बद्दल विचारले तर ती म्हणाली  कि तिच्यात आणि माझ्या मध्ये प्रेम नाहीये, फक्त शारीरिक आकर्षण आहे. तेव्हा लग्न न  करता फक्त शरीर संबंध ठेवूया.माझ्या साठी हे एक्दम शॉकिंग होते ! कधी च वाटले नव्हते कि एक स्त्री असे काही बोलू शकते ! आदित्य – आता समजले ? त्या मुलींचे, स्त्रियांचे  दुःख ? जेव्हा तू त्यांना अंगावरच्या कपड्यांसारखे बदलत होता !!! याकूब, तू आणि ती  प्रेमात नव्हता. त्या डॉक्टरांचा  हिप्नॉटिझम चा प्रभाव तुम्हा दोघांवर चुकीच्या पद्धतीने झाला होता. पण ती लवकरच त्या प्रभावातून बाहेर पडली होती. पण तुझयावर ……   याकूब – (दीर्घ श्वास घेऊन )  मी तर अजून त्याच नशेत आहे. त्यानंतर मी सिग्रेट आणि दारूच्या व्यसनातूनन कायमचा  मुक्त झालो, आणि ऐश्वर्या शिवाय आज पर्यंत मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितले पण नाही. आदित्य – तेच तर…. तुझ्या मेंदूवर, तुझ्या मनात सिगरेट आणि दारूची जागा ऐश्वर्याने घेतली. मला वाटले कदाचित डॉक्टरांच्या  हिप्नॉटिझम चा प्रभाव काही दिवसांसाठीच असेल !!   याकूब – म्हणून तू म्हणाला, कि हेच योग्य आहे. एवढेच नाही तर  तू तिचे म्हणणे माझ्या हि गळी उतरवले ! गेले 2 वर्षा  पासून आम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकुन, पूर्ण समाजाला अंधारात ठेवून, बिना लग्नाचे शरीरसंबंध  ठेवले…!   आदित्य -आणि तेच तुझ्या साठी योग्य आहे.  अजून सुद्धा तू तिचा नाद सोड आणि एखादी तुझ्याच मुस्लिम धर्मातील iiमुलगी बघून तिच्याशी लग्न कर. ऐश्वर्या एक 35 वर्षीय आर्थिक दृष्ट्या इंडीपेंडेंट  बिझनेस वुमन आहे. तिच्याशी लग्न करून तिला हिंदू धर्मा मधून मुस्लिम मध्ये कन्व्हर्ट  करण्याचे स्वप्न पाहू नकोस !!   याकूब -( जोरात ओरडून )  शट अप  !  तू माझा लहान पणा पासूनचा मित्र आहेस आणि आत्ता पर्यंत तू मला एवढेच ओळखलेस ? ऐश्वर्याशी तुझी ओळख माझ्या बोलण्यातून 2 वर्षा पूर्वी झाली. आज पर्यंत तू तिला प्रत्यक्ष पहिले सुद्धा नाहीये. तरी सुद्धा तुला तिचेच म्हणणे बरोबर वाटते. तिचे आणि तुझे म्हणणे एकच आहे. तुला पण मी एक लव्ह जिहादी वाटतो ? मी ऐश्वर्या वर खरोखर  प्रेम करतो त्यासाठी मी स्वतः हिंदू मध्ये  कन्व्हर्ट व्हायला तयार आहे!   आदित्य – हे बघ जेव्हा वणवा पेटतो तेव्हा सुक्या बरोबर ओले पण जळते. तसेच तुझ्या बाबतीतही आहे. आजच्या परिस्थितीत मुस्लिम पुरुषाचे हिंदू स्त्री बरोबर प्रेम म्हणजे लव्ह जिहाद ! हेच समीकरण धरले जाते . मला शट अप म्हणून माझे तोंड बंद करशील पण लोकांचे तोंड कसे बंद करशील? आणि लोकांचे जाऊ दे ऐश्वर्याला कसे पाटवशील ?   याकूब – 2 वर्षांपूर्वी तूच मला सांगितले होतेस कि ऐश्वर्या बरोबर तुझे शरीरसंबंध परस्पर सहमतीने होते याचे प्रूफ जमा करून ठेव. त्या प्रमाणे हे बघ मी प्रूफ (असे म्हणून याकूब आदित्य ला मोबईल दाखवतो ) जमा केले आहे. आदित्य – काय आहे हे ? याकूब- हे बघ यामध्ये किती तरी हॉटेल मधली रूम बुकिंग ची  बिले आहेत ती सगळी ऐश्वर्या च्या नावा  वरती आहेत. आणि हा विडिओ बघ ज्यामध्ये ऐश्वर्या बघ काय म्हणते.   ऐश्वर्या- (मोबईल मधील विडिओ मधून आवाज ) आज मी डॉक्टर कडे गेले होते त्यांनी मला अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट दिल्या. खूपच चांगल्या आहेत आणि याचे काही  साइड इफेक्ट पण होणार नाही!   आदित्य – ओ हो खूपच स्ट्रॉंग प्रूफ आहे रे , तुला काय वाटते ? कि तू हा प्रूफ कोर्टात दाखवल्यावर केस    जिंकशील आणि ऐश्वर्या  तुझ्या शी लग्नाला तयार होईल ?   याकूब- अरे पण, या पुराव्याचा काहीच उपयोग नाही आहे का?   आदित्य – मी तुला हे पुरावे यासाठी जमा करून ठेवायला सांगितले कि पुढे जाऊन ऐश्वर्याने तुझ्यावर  सेक्सऊल हॅरॅसमेंट किंवा रेप  ची खोटी केस केली तर हेच पुरावे तुला कोर्टा मध्ये निर्दोष ठरवतील. पण आता सगळा मामालाच उलटा आहे. आत्ता तू तिच्या वर केस करणार आहे आणि ज्या मुद्द्यावरून केस करणार आहेस त्यासाठी या पुराव्याचा काहीच उपयोग होणार नाहीच, उलट कोर्ट तुलाच दोषी ठरवेल ! आणि देव ना करो मीडिया ला या केस बद्दल कळले तर त्याचा 24 तास तमाशा बनवतील. गेले 2 वर्षे एक मी सोडलो तर बाकी कोणालाही तुमच्या शरीर संबधा  बद्दल कानोकान खबर नव्हती पण या केस मुळे जर मीडिया ला समजले तर वर्ल्ड वाईड हि एक ब्रेकिंग न्यूज होईल. मीडिया तर या असल्या मसाल्याची वाटच बघत असते आणि शेवटी या केस चा निर्णय तुझ्या विरोधातच होईल!   याकूब – अरे पण या वर काहीच उपाय नाही का ? आदित्य- या वर  एकच उपाय आहे ते म्हणजे तू ऐश्वर्या बरोबर ब्रेक अप कर. जे तिला हवे आहे ते कर, आणि तिला मोकळे कर !   याकूब – ते शक्य नाही, माझे ऐश्वर्या वर जीवापाड प्रेम आहे, माझे प्रेम हे फक्त शरीर संबधा पुरते राहिले नाही मानसिक रित्या मी तिच्या मध्ये पूर्णपणे गुंतलो आहे. मी तिच्या शिवाय जगूच शकत नाहीये. मला आत्ता तिच्याशी लग्न करून तिच्या मुलाचा बाप बनायचे आहे. आणि यासाठी मला माझा धर्म बदलावा लागला तरी चालेल.   आदित्य – आणि हे असे झाले नाही तर ऐश्वर्याने तरीही तुझ्याशी ब्रेक अप केले तर ? याकूब – संपवून टाकेन!!! पहिले तिला संपवेन आणि नंतर स्वतःला !!!   आदित्य – झाले ? श्री. याकूब आपण मुंबई पोलीस डिपार्टमेंट मध्ये acp च्या पोस्ट वरती काम करीत आहेत. पण  ऐश्वर्यावरच्या  एकतर्फी प्रेमाने तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या त्या गुन्हेगारांच्या जागी बसवले. तुम्ही अगदी सिरफीरे आशिक बनले आहात! आज तुम्ही हिंसा करण्याचा विचार बोलून दाखवत आहात .उद्या खरोखरीचे कराल सुद्धा. तुम्ही हाच हट्ट चालू ठेवला हाच वेडेपणा चालू ठेवला तर मला तुमच्या बरोबर ची लहानपणपासूनची मैत्री संपवावी लागेल आणि ऐश्वर्याच्या सुरक्षेचा विचार करावा लागेल ! आणि तुम्हाला कुठल्या तरी सायकिऍट्रिस्ट ला दाखवावे लागेल !   याकूब- तसे नाही पण मला सुद्धा ऐश्वर्या च्या मर्जी विरुद्ध वागतोय याची अपराधी पणाची भावना मनात घर करून बसली आहे.मनावर प्रचंड ओझे झाले आहे या भावनेचे. या मानसिक तणावातून  पडायचे आहे.   आदित्य- त्यासाठीच तुला आणि ऐश्वर्याला  कोर्टात केस करण्या ऐवजी कौन्सिलिंग इथे माझ्या घरी बोलावले आहे. माझी पत्नी दीपिका हि सिविल कोर्ट मध्ये वकील आहे. त्यामुळे अशा केस कौन्सिलिंग ने कशा सोडवायच्या याचा अनुभव आहे. आत्ता थोड्या वेळात ऐश्वर्या आणि दीपिका येतील.   (आणि त्याच वेळी दीपिका आणि ऐश्वर्या बेडरूम मधून बाहेर येतात पहिले दीपिका येते तिच्या मागोमाग ऐश्वर्या येते.ऐश्वर्य च्या चेहऱ्यावर खूप निराशेचे आणि दुःखी भाव आहे. दीपिका तिला खुर्ची वर बसायला खुणावते. खुर्ची वर बसत असताना तिची नजर याकूबच्या नजरेला भिडते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव एक्दम बदलतात आणि स्तब्ध उभे राहून ती रागाने बघते. तेव्हाच दीपिका तिला बोलते.)   दीपिका – बस ना ऐश्वर्या . याकूब तू पण (ऐश्वर्याच्या समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून) इथे बस. (असे बोलून आदित्य आणि दीपिका दोघे हि मधल्या सोफ्या वर बसतात .)   दीपिका- हं आता बोल ऐश्वर्या काय प्रॉब्लेम आहे तुझा? ऐश्वर्या- हा याकूब, एक नंबरचा “लव्ह जिहादी” आता मला लग्न करून मुस्लिम धर्म मध्ये कॉन्व्हर्ट होण्याची जबरदस्ती करत आहे. आदित्य- ऑब्जेक्शन मॅडम, याकूब ने कधीच कोणाही पासून स्वतःची आयडेंटीटी लपवली नाही. तूम्ही दोघे  हि एका फ्लॅट मध्ये गेले 2 वर्षा पासून as a रूम पार्टनर राहात आहात. त्या फ्लॅट चा मालक याकूब ला याकूब याच नावाने ओळखतो.त्याचं कडे याकूब चे आधार कार्ड आहे ज्यावर त्याचे नाव याकूब आहे. आणि तुमच्या पासून पण त्याने स्वतःची आयडेंटीटी लपवली नव्हती. तुम्हाला याकूब बरोबर फक्त शरीर संबंध ठेवायचे होते याचे पुरावे आहेत आमच्याकडे. हॉटेल ची बिले आहेत आणि विडिओ आहे ज्यामध्ये तुम्हीच अँटी प्रेग्नन्सी गोळ्या घेऊन  याकूब ला शरीरसंबंध चे आव्हान करतानाचे.   ऐश्वर्या- एक्झॅटली, मी अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट घेत होते कारण मी बिझिनेस साठी लोन घेतले आहे. आणि ते फेडण्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. त्यात मला माझी फॅमिली साठी वेळ नाहीये. तर याने माझ्या अँटी प्रेग्नन्सी टॅबलेट च्या जागी दुसऱ्या गोळ्या देऊन माझी फसवणूक केली. आणि जेव्हा माझा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा पासून तर मला मारझोड करून लग्नासाठी जबरदस्ती करीत आहे. आणि हे मी खोटे बोलत नाहीये. हे बघा माझ्या चेहऱ्या वर निशाण  आले आहेत. (असे म्हणत ऐश्वर्य स्वतःचा चेहरा दाखवते ) एवढेच नाही तर मी डॉक्टर कडे ऍबॉर्शन साठी जाऊ नये म्हणून काल त्याने मला घरामध्ये कोंडून ठेवले. खोटे वाटत असेल तर त्यालाच विचारा.   आदित्य- याकूब, is it true…

Read More

Echoes of Mortality: Unveiling the Haunting Tale of Human Remains and the Specter of Death – English Version

Human Remains Running with the speed of the wind, Shweta entered the lobby of the hospital. Looking at her, the airline crew member in the hospital stood up and said— “Sorry madam, I know you and your husband Mr. Ashish is not living together now. But after landing in Kolkata, Ashish’s health became so bad that he had to be admitted to a hospital here! After examining him, Dr. Call the patient’s next of kin. I remembered that you are here in Kolkata. So called you.” Shweta, “But what happened…

Read More

The Mystery of the Swinging Swing: Unveiling the Secrets Behind an Empty Playground – English (Part: 2)

The Mystery of the Swinging Swing             In the cctv footage, everyone in the police station started to see exactly where Jogendra’s mobile fell…..          For that, Ravi   rewinds the cctv footage from where Jogendra stops swing. And everyone started watching. From there, as Jogendra lowered his mobile camera and gaze, he screamed loudly and followed in panic, but the phone was still firmly held in his hand and it was still on. He was looking up while running and waving both his arms vigorously in the air. Just like some bird in the air, or when…

Read More

The Mystery of the Swinging Swing: Unveiling the Secrets Behind an Empty Playground – Marathi Version (Part: 2)

The Mystery of the Swinging Swing             cctv फुटेज मध्ये पोलिस स्टेशन मधले सगळे जोगेंद्र च्या हातातील मोबाइल नक्की कुठे पडला हे बघू लागले…..          त्यासाठी रवी ने जोगेंद्र जेव्हा झोपाळा थांबवतो तिथं पासून cctv  फुटेज रिवाइंड केले. आणि सगळे बघू लागले. तिथून जोगेन्द्रने आपला मोबाइल कॅमेरा आणि नजर जशी खाली वळवली तसा तो जोरात किंचाळला आणि घाबरून पाळायला लागला पण फोन मात्र हातात तसाच घट्ट धरून ठेवला होता आणि तो तसाच चालू होता. धावता-धावता तो वरती बघत होता आणि आपले दोनही हात हवेत जोरजोरात हलवत होता. जस काही हवेत…

Read More

FARMHOUSE short Story Genre-Drama of Misunderstanding Themes-morality playground ko hindi mein kya bolate hain

FARMHOUSE                                                                     भीमा शंकर च्या समोर शहरांच्या सर्व गर्दी गडबड गोंधळापासून दूर एका घरा बाहेरच्या  अंगणात २५/३० वर्षाचे ५/6 युवक  क्रिकेट  खेळण्यात दंग आहे. मुंबई मध्ये एका  बंगलेवजा घराच्या बाहेर एवढे मोठे अंगण कुठे मिळणार ? अशा अंगणात क्रिकेट खेळण्याची मजाच वेगळी. त्यामुळे सर्वेश,  सचिन  आणि त्यांच्या बरोबर सामील झालेला त्यांचा नवा  मित्र –तिथलाच रहिवासी  रामा  सगळे आपले…

Read More

The Mystery of the Swinging Swing: Unveiling the Secrets Behind an Empty Playground – Marathi Version (Part: 1)

The Mystery of the Swinging Swing  ” नाईट शिफ्टला cctv  बघण्याची मजाच काही तरी वेगळी आहे. ” पोलीस स्टेशन मध्ये, इन्स्पेक्टर शिव  साळसकर हातात गरमागरम चहाचे घुटके घेत आणि  समोरील LCD वर  बघत बोलत होते.                 ” हो ना, 2 जणांना पोलीस व्हॅन मध्ये पेट्रोलिंग ला पाठवले आहे आणि आपण चौघे जण पोलीस स्टेशन मध्ये cctv ने शहरभर लक्ष ठेवू शकतो कुठे काही गडबड दिसली तर पटकन पेट्रोलिंग टीम ला ऑर्डर करू शकतो.” शिव चा सहकारी रवी म्हणाला.                ” तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहेत हे बघा cctv नंबर २० जो आपल्या स्टेशन पासून ५ मिनिटे लांब असलेल्या गार्डन मध्ये लावलेला आहे तिथे मला काहीतरी गडबड दिसत आहे. सुधीर, तू जरा हा cctv नंबर  २० झूम कर.” चौथा इन्स्पेक्टर समीर म्हणाला.       समीर च्या ऑर्डर प्रमाणे सुधीर ने LCD स्क्रीन वर cctv नंबर २० झूम केला आणि चौघेही जण बघू लागतात तेव्हा समोर दिसते…….       एका गार्डन मध्ये एक रिकामा  झोपाळा जोरजोरात हालत असतो ज्याच्या समोर एक ६ फूट उंच माणूस शांतपणे स्तब्ध उभा राहून बघत असतो आणि दुसरा एक १६/१७ वर्षाचा किशोरवयीन मुलगा त्या रिकाम्या हलणाऱ्या झोपाळ्याच्या अवती-भवती फिरून मोबाईल  ने शूटिंग करीत असतो.             “आरे, हा रिकामा झोपाळा बघ, किती जोर-जोरात हालत आहे! जसे काही त्या झोपाळ्यावर कोणीतरी बसले आहे आणि झोका घेत आहे. काही भुताटकी आहे कि काय ?” शिव आश्चर्याने म्हणाला. ” भुताटकी वगैरे काही नाहीये, हे या दोघांचेच काहीतरी षडयंत्र  चालू आहे.” समीर म्हणाला. ” तो कसा काय?” सुधीर म्हणाला .           ” हा जो समोर एकटक, शांतपणे,  बघत जो माणूस उभा आहे ना त्याने आपल्या पायाच्या आंगठ्याला बारीकशी इन्व्हिसिबल रस्सी बांधली असेल आणि त्याने तो झोपाळा  जोर-जोरात हलवत असेल. आणि हा मोबाईल ने शूटिंग करणारा मुलगा त्याचा व्हिडीओ बनवून सर्व शहरात व्हायरल करेल आणि अफवा पसरवातील   कि गार्डन मध्ये भूत आहे !.” समीर म्हणाला.           ” हरामखोर कुठला, आत्ताच आपण आपल्या  पेट्रोलिंग टीमला  सांगून गार्डन मध्ये या दोघांना पकडायला सांगूया” असे म्हणून सुधीर आर. टी. वरती बोलतो..”अलोक come in , alok come in , “             ” अलोक here  , अलोक here  , go ahed ,” अलोक ने रिप्लाय केला.              ” अलोक  तू आणि नितिश,तुम्ही दोघे आत्ताच्या-आत्ता   गांधी उद्यान जे चराई मध्ये आहे तिथे जा आणि तिथे २ माणसे नकली व्हिडीओ बनवून शहरात भीती निर्माण करतील ! त्यांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये आण. ओव्हर .”      हे ऐकल्यावर अलोक आणि नितिश दोघे पोलीस व्हॅन गांधी उद्यानाच्या दिशेने वळवतात पण तेवढ्यात सुधीर LCD वर बाघतो कि तिथे जो स्तब्ध उभा राहिलेला माणूस असतो तो नाहीसा झाला आहे आणि झोपाळा  हलायचा थांबला आहे. त्याबरोबर त्याचे शूटिंग करणारा मुलगा सुद्धा शूटिंग थांबवून गार्डन च्या बाहेर जायला  लागतो. गार्डन पासून थोडे दूर गेल्या वर दुसऱ्या एका व्यक्ती ला भेटतो. ती व्यक्ती अगोदर बागेत उभी असलेल्या माणसा सारखीच दिसत असते. तो मुलगा त्या व्यक्तीला फोन दाखवत असतो. त्यावरून सुधीर,रवी, समीर आणि शिव अंदाज घेतात कि हि दोघे तो  व्हिडीओ सोशल मीडिया वरून व्हायरल करीत आहेत, सुधीर पुन्हा अलोक ला आर टी वर बोलावतो आणि रस्त्यावर ते  दोघे जेथे उभे होते त्या जागेवरून उचलून पोलीस स्टेशन मध्ये आणायला सांगतो.        थोड्या वेळातच आलोक आणि नितीश त्या दोघाना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतात. ती आल्यावर पोलीस सर्वात पहिले त्यांचे फोन ताब्यात घेतात आणि फोन चा डेटा चेक करू लागतात. त्याबरोबर शिव त्यांना प्रश्न विचारतो ……. “काय नाव आहे तुमचे ?” “माझे अर्जुन “ “आणि माझे ध्रुव ” दोघे उत्तर देतात. “वय काय आहे तुम्हा दोघांचे ?” समीर विचारतो. “१७ ” अर्जुन “२०”ध्रुव “तुमच्या दोघांचे फोन अनलॉक करून द्या” सुधीर ओरडला. त्याप्रमाणे दोघेही फोन अनलॉक करतात आणि समीर  त्यांचा फोन बघायला  लागतो.              ” काय रे, रात्रीचे दोन वाजता गार्डन मध्ये रिकामा झोपाळा हलवण्याचे शूटिंग करून, शहरात भूताचा  खोटा व्हिडीओ व्हायरल करून, शहरात दहशत करायची आहे काय ? आत टाकू का तुम्हाला ?” शिव त्याच्या वर जोरात खेकसला.        त्यांचा ओरडा ऐकून अर्जुन आणि ध्रुव दोघांच्या अंगाचा थरकाप होतो. थरथरत्या आवाजात ध्रुव बोलला……” आ……ते …..ते म्हणजे आम्हाला तसे काही करायचे…….म्हणजे मी नाही……या अर्जुनला तसे काही करायचे नव्हते. त्याला भीती वाटत नव्हती म्हणून तो एकटाच शूटिंग करून आला…”               “चूप……! आम्ही मघाशीच cctv कॅमेराचे शूटिंग पहिले आहे तू झाडाच्या बाजूला उभा राहून रिकामा झोपाळा हलवत होता आणि हा अर्जुन ! पुढच्या बाजूने मोबाईल ने शूटिंग करत होता. त्यामुळे लोकांना वाटेल कि रिकामा  झोपाळा हालत आहे .” समीर पुन्हा त्यांच्यावर जोरात खेकसला.       त्याच्या खेकसण्याने आणि वटारलेल्या डोळ्यांनी ध्रुव मान खाली घालून, थर-थर कापत शांत उभा राहिला. तरी अर्जुन धीर एकवटून म्हणाला…..” नाही साहेब, गार्डन मध्ये मी एकट्यानेच  जाऊन शूटिंग केले होते. हा ध्रुव तर गार्डन च्या बाहेर उभा होता त्याला तर  आत मध्ये यायला भीती वाटत होती. त्यावेळी गार्डन मध्ये मी एकटाच होतो. तुम्ही  माझा व्हिडीओ बघा…….”              ” चूप, त्या आगोदर तू आमचे cctv कॅमेरा चे फुटेज बघ.” असे म्हणून सुधीर कॉम्पुटर मॉनिटर वर cctv फुटेज दाखवतो. त्या फुटेज मध्ये दिसते…. एक ६ फुटाची काळी  मनुष्याकृती  एका झाडाच्या बाजूला शांत उभी आहे आणि तिथे काही वेळात अर्जुन येतो आणि रिकाम्या झोपाळ्याचे मोबाईल ने शूटिंग करायला लागतो.            ” हे बघ या cctv मध्ये झाडाच्या बाजूला ध्रुव उभा आहे.” सुधीर, अर्जुन आणि ध्रुवाला मॉनिटर दाखवून   बोलतो.          अर्जुन,” नाही साहेब,मी गार्डन मध्ये एकटाच  शूटिंग करीत होतो. तुम्हीच बघा  या व्यक्ती मध्ये आणि ध्रुव मध्ये किती  फरक आहे हा माणूस ६ फूट उंच आहे आणि ध्रुव ची उंची जेमतेम ५ फुटाची आहे. हे पण एक भूतच आहे !”                “चूप, भूत वगैरे काहीही नसते, आत्ता पुन्हा भूत बोललास तर कानाखाली आवाज काढेन”, असे म्हणून  शिव, अर्जुन वर हात उगारतो, तेवढ्यात त्याला अडवून समीर म्हणतो,” साहेब, तो जे म्हणतो आहे ते बरोबर आहे!”                ” काय बरोबर आहे ? कि, त्या बागे मध्ये भूत आहे ? झाले का, आता तू पण हेच बोलतोस ?” शिव असे बोलून समीर कडे रागाने बघू लागतो.       समीर ,” मी नाही,अर्जुन च्या मोबाईल मधला व्हिडीओ  हे दाखवतो!  हा विडिओ आणि cctv फुटेज दोनीही एकत्र बघा !!”        असे बोलून समीर अर्जुन चा मोबाईल आणि मॉनिटर वर चे रेकॉर्डिंग सगळ्यांना एकत्र दाखवतो. ते बघितल्या वर सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो.                   cctv फुटेज मध्ये झाडाच्या शेजारी जी काळी मनुष्याकृती दिसत असते ती अर्जुन च्या व्हिडीओ मध्ये आजिबात दिसत नव्हती !            हा सगळा प्रकार पाहून पोलीस स्टेशन मध्ये ५ ते १० मिनिटे शांतता पसरली ! कोणाला काय बोलावे ते काही कळतच नव्हते, तेवढ्यात नितीश, शांततेचा भंग करून म्हणाला…….                          “साहेब, मला वाटते याचा संबंध ८दिवसापूर्वी  घडलेल्या रोड ऍक्सीडेन्ट शी असेल ! ८ दिवसापूर्वी  याच  गार्डन च्या बाहेर काही अंतरावर एक रोड ऍक्सीडेन्ट झाला होता त्यात मृत झालेल्या व्यक्ती ची शरीरयष्टी या cctv मधील माणसाशी मिळती-जुळती आहे. आपल्या पोलीस ठाण्यात  ८ दिवसापूर्वी अशीच नाईट शिफ्ट ला याच कॉम्पुटर  वर त्याच ऍक्सिडेंट  ची FIR सेव्ह केली होती. गार्डन मधला हा झोपाळा  सुद्धा गेल्या ८ दिवसां पासून असाच रात्रीचा रिकामा झोका घेत आहे. तुम्ही गार्डन मधल्या cctv चे  ८ दिवसापूर्वीचे म्हणजे या महिन्याच्या १९ तारखेच्या अगोदरचे  रेकॉर्डिंग  बघा ……… त्यामध्ये हा झोपाळा एकदम नॉर्मल दिसतो !”              नितीश च्या बोलण्या वरून सुधीर ने डेस्क टॉप वरती त्या cctv चे १९ तारखेच्या अगोदरचे २ तीन महिन्या चे रेकॉर्ड चेक केले त्या २/३ महिन्याच्या काळात प्रत्येक दिवस-रात्र गार्डन मधला तो झोपाळा एकदम  नॉर्मल दिसतो.                           “साहेब, मी एक बोलू ?” ध्रुव हात वर करून म्हणाला.                       “हा बोल, आणि एक कशाला? बोलतोस दोन बोल, तीन बोल, चार बोल,तुझं तोंड आहे जेवढे पाहिजे तेवढे नंबर बोल.” शिव त्याला तोंड वेडावून म्हणाला.            ध्रुव,”मी या गार्डन शेजारच्या दीप टॉवर मध्ये १० व्या फ्लोर वर राहतो, तिथून संपूर्ण बाग दिसते. १९ तारखेचा ऍक्सिडेंट मी पण तिथून पहिला होता. आणि त्याच्या २ऱ्या दिवसा पासून मी घराच्या गॅलरी मधून रात्रीच्या वेळी बघतो आहे तिथला तो झोपाळा रात्री १२ च्या सुमारास रिकामाच झोके घेत असतो. काल दुपारीच माझा चुलत भाऊ अर्जुन राहायला आला आहे. त्याला मीच सांगितले कि गार्डन च्या आतमधून शूटिंग घेऊन दाखव.”                        ” ठीक आहे,सुधीर तू कॉम्पुटर मध्ये सर्च करून ती FIR काढ.” शिव ने ऑर्डर केली. त्याप्रमाणे सुधीर कामाला लागला, ५ ते १० मिनिटातच त्यांनी ८ दिवसा  पूर्वीची FIR काढली.            ८ दिवसा पूर्वी रात्री ३ च्या सुमारास  गार्डन जवळच्या  हायवे वर ऍक्सिडेंट मध्ये  एका 2५ वर्षीय युवकाचे  on the spot death झाल्याचा फोन कॉल  पोलीस स्टेशन च्या लॅन्ड लाईन वर आला. बातमी मिळाल्या वर पोलीस लगेच घटना स्थळी पोहोचले. तेथे गेल्या वर कळले कि त्या मनुष्याच्या अंगावरून ट्रक गेला आणि त्याच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा केला होता. त्याच्या काही अंतरावर त्याचे समवयस्क 4 मित्र रस्त्यावरती संवेदना हरवून खिन्न अवस्थेत  बसले होते. त्यांना जाऊन विचारले तेव्हा पहिले ते काहीच बोलू शकले नाही, मोठ्या मुश्किलीने त्यातील एक जण म्हणाला,” कि ऍक्सिडेंट झालेला युवक आमचा मित्र जोगेंद्र आहे. इथल्या एका चाळी मध्ये आम्ही शेजारी शेजारीच राहतो.   त्याचा वाढदिवस होता. आज या गार्डन मध्ये आम्ही  चौघांनी त्याचा वाढदिवस  साजरा करायचे ठरवले. आत्ता यापुढे जे काही झाले ते आम्ही सांगू शकत नाही आमच्यात तेवढी ताकत नाहीये. हे आमचे मोबाईल तुमच्या ताब्यात देत आहोत यातील व्हिडीओ मध्ये या ऍक्सिडेंट च्या अगोदरचे अर्ध्या तासाचे शूटिंग आहे,तुम्हाला यातून पाहिजे ती माहिती मिळेल.” असे म्हणून तो पुन्हा खिन्न होऊन एका कठड्यावर बसला.                         FIR मध्ये हा एवढाच रिपोर्ट होता त्यानंतर सगळे व्हिडीओ होते. त्या व्हिडीओ वर क्लिक केले आणि विडिओ चालू झाला.            गार्डन च्या गेट मधून एका ६ फुटाच्या धिप्पाड युवकाने आतमध्ये पाय ठेवल्यावर आजूबाजूचा परिसर अचानक रोषणाईने झगमगला आणि त्याच्या चारही मित्रांनी  हैप्पी बर्थ डे, हैप्पी बर्थ डे चा जोरजोरात आरडा-ओरड आणि  टाळ्यांचा कड- कडाट केला.                        ” हे what a pleasant  surprise !” जोगेंद्र  आश्चर्य चकित होऊन बोलला .              ” आरे यार मीच हा सगळं प्लॅन  केला होता, म्हंटल आपल्या दोस्ताचा वाढदिवस असाच झकास करू या.”       असे म्हणून चार मधील एक जण त्याला  गार्डन मध्ये मधोमध ठेवलेल्या टेबलाजवळ घेऊन आला बाकीचे तिघे जण या सगळ्याचे मोबाइल  वरून शूटिंग करीत होते. जोगेंद्र  ने केक कापल्यावर सगळ्यांनी  पुन्हा एकदा जोरात Happy birth day  आणि टाळ्यांचा कड- कडाट केला. टाळ्यांचा कड- कडाट थांबल्यावर अचानक गार्डन मध्ये झोपाळा जोर-जोरात हलण्याचा आवाज आला. सगळ्यांनी तिकडे बघितले आणि त्याबरोबर शॉक  पण झाले. तेव्हाच त्यांच्या हातातील मोबाईल चा कॅमेरा चालू होता. कारण समोरचे दृश्यच तसे होते. गार्डन मधला रिकामा  झोपाळा जोर-जोरात झोके  घेत होता. जोगेंद्र ने  सुद्धा आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि झोपाळ्याच्या अगदी जवळ जाऊन शूटिंग करू लागला. बाकीचे त्याचे  चौघे मित्र ५ फूट लांब उभे राहून शूटिंग करत होते.                  “its really amazing “, जोगेंद्र  झोपाळ्याच्या अगदी जवळ जाऊन शूटिंग करीत बोलला  “The empty swing is swinging.” असे म्हणून त्याने  झोपाळ्याची  साखळी पकडून झोपाळा थांबवला.आणि २ मिनीटांनी पुन्हा सोडला .पुन्हा झोपाळा जोरजोरात झोका घेऊ लागला.              तेव्हा समोर उभे राहिलेल्या चौघांनी,”Hold it again, hold it…

Read More