The Mystery of the Swinging Swing
cctv फुटेज मध्ये पोलिस स्टेशन मधले सगळे
जोगेंद्र च्या हातातील मोबाइल नक्की कुठे पडला हे बघू लागले…..
त्यासाठी रवी ने जोगेंद्र जेव्हा झोपाळा
थांबवतो तिथं पासून cctv फुटेज रिवाइंड केले.
आणि सगळे बघू लागले. तिथून जोगेन्द्रने आपला मोबाइल कॅमेरा आणि नजर जशी खाली वळवली
तसा तो जोरात किंचाळला आणि घाबरून पाळायला लागला पण फोन मात्र हातात तसाच घट्ट धरून
ठेवला होता आणि तो तसाच चालू होता. धावता-धावता तो वरती बघत होता आणि आपले दोनही हात
हवेत जोरजोरात हलवत होता. जस काही हवेत कुठलातरी पक्षी,किंवा मधमाशांच्या पोळ्यावर
दगड मारल्यावर त्यांचा झुंड पाठी लागल्यावर
त्यांच्या पासून सुटका करून घेताना पळत पळत एखादा माणूस करीत असतो. त्या प्रमाणे तो
हवेत हात हलवत पळू लागला. पाळता पाळता जोगेंद्र
गार्डन च्या दरवाजाच्या बाहेर पडला.
त्यानंतरचे शूटिंग दुसऱ्या cctv मध्ये बघावे
लागले. त्यामध्ये दिसले…….
पाळता पाळता जोगेंद्र गार्डन च्या दरवाजाच्या
बाहेर पडला बाहेरच एक औदुंबराचे झाड असते त्या झाडावर जाऊन आपटला आणि तेव्हाच त्याच्या
हातातील मोबाईल पडला आणि जोगेंद्र तिथून पुन्हा पळाला आणि हायवे च्या मधोमध आला जिथे
गाड्या भरधाव वेगाने धावत होत्या अशाच एका भरधाव वेगातल्या ट्रक खाली जोगेंद्र आला
आणि जागीच मृत्यू पावला.
पण पोलिसांनी cctv फुटेज जोगेंद्र जेव्हा
औदुंबराच्या झाडावर आपटला आणि त्याचा मोबाईल पडला तिथेच स्टॉप केला. आणि जिथे मोबाईल
पडला ती जागा झूम करून बघितली तेव्हा दिसले….
तो मोबाईल झाडाखाली त्या झाडाच्या दोन मुळा
मध्ये अडकून बसला. त्यामुळे मोबाईल चे काहीच नुकसान झाले नव्हते.
फुटेज मधील नाट्य बघून झाल्यावर शिव म्हणाला,”
हा मोबाईल, झाडाच्या दोन खोडा मध्ये असा काही अडकला आहे जसा कोणीतरी मोबाईल सांभाळून
ठेवला आहे. आणि तो ऍक्टिव्ह पण दिसत आहे. जराही डॅमेज झालेला नाहीये. नक्कीच कोणी तरी
उचलून नेला असेल!”
रवी,” पुढचे फुटेज चेक करायला पाहिजे.”
सुधीर,”आपण प्रत्येकजण हे cctv फुटेज,
ज्यांना जसा वेळ मिळेल तसे आळीपाळीने चेक करूया. पुढच्या १ ते २ तासाच्या फुटेज मध्ये
कळेल कि मोबाईल कोणी पळवला ते.”
दुसऱ्या दिवशी
रात्री पुन्हा शिव ने रवी ला विचारले,”काय रवी, चेक केले का cctv फुटेज
?”
रवी डोक्याला हात मारून म्हणाला,”हो
केले, त्या दिवसापासून आत्ता पर्यंत चे सगळे फुटेज पहिले.”
शिव,” का रे एवढे काय चेक केले?
काय प्रॉब्लेम झाला?”
रवी,”cctv चा शोध लावला कि चोरी लवकर पकडता येईल पण इथे cctv
ने गोंधळ करून ठेवले!”
“कसले गोंधळ?” सुधीर, आलोक
दोघेही ऑफिस मध्ये एकत्र येऊन म्हणाले.
” एक मोठा सस्पेन्स निर्माण केला
आहे, या cctv फुटेज ने.” समीर थकून भागून खुर्ची वर बसून म्हणाला.
” जर का जोगेंद्र चा मोबाईल चोरी
झाला असता तरी शोधणे सोपे झाले असते पण या भूतावळीने जे काही कोडे घातले आहे ते सोडवणे
मुश्किल झाले आहे.” रवी एल सी डी च्या जवळ जाऊन म्हणाला.
शिव,” अरे बाबानो तुम्ही सरळ पणे
सांगणार आहात का काय झाले आहे ते?”
” काय झाले आहे ते सांगण्यापेक्षा
तूम्ही या cctv चे आताचे फुटेज बघा.”समीर एल सी डी वरील फुटेज झूम करून म्हणाला.
आणि समोर एल सी डी वर देऊळ आणि औदुंबराच्या परिसरातील cctv शूटिंग दिसते.
“यामध्ये या औदुंबराच्या झाडाखाली
त्या दोन खोडांच्या मध्ये बघा.”समीर त्या दोन खोडा मधील भाग झूम करून म्हणाला.
तो झूम केलेला भाग बघून शिव,समीर,सुधीर,
आलोक या सर्वाना आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो ! cctv फुटेज मध्ये दिसते….. कि जोगेंद्र
चा मोबाईल तसाच चालू कंडिशन मध्ये झाडाचा खोडामध्ये पडलेला असतो.
” आ, हा मोबाईल तर अजून तिथे
आहे आणि ते पण त्याचा कॅमेरा चालू दिसत आहे.” शिव डोक्यावर हात ठेऊन म्हणाला.
“हे कसे शक्य आहे?” सुधीर
म्हणाला.
” तुम्ही मग तिथे जाऊन मोबाईल
घेऊन का नाही आलात?” अलोक, रवी जवळ जाऊन म्हणाला.
“म्हणजे, तुम्हाला काय वाटले
आम्ही हे केले नसेल काय?” रवी वैतागून म्हणाला.
“आज दिवसभर cctv फुटेज मध्ये
हा मोबाईल झाडाच्या खाली पडलेला दिसत होता म्हणून मी सरळ बागे मध्ये गेलो. पण तिथे
बघितले तर काय …….?” समीर म्हणाला.
“काय,” शिव.
“तिथे मोबाईल नव्हता
!”समीर एल सी डी कडे हात दाखवून आपले बोलणे चालू ठेवून पुढे म्हणाला,” मला
वाटले कि मोबाईल गार्डन मध्ये येत असताना चोरी झाला असेल म्हणून मी इथं रवी ला
cctv चेक करायला सांगितले. तर तो म्हणाला कि मोबाईल अजून झाडाच्या खाली आहे. मला इथून
cctv मध्ये दिसत आहे.पण मला तिथे मोबाईल काही केल्या दिसला नाही. शेवटी मी माझ्या मोबाइलला
ने तिथले शूटिंग केले. त्यात पण मोबाईल दिसत नाही. हे बघा मी मोबाइल ने केलेले शूटिंग” असे म्हणून समीर
ने मोबाईल दाखवला.
“बाप रे, हे तर एक विचित्र
रहस्य आहे. आता हे रहस्य उलगडणार तरी कसे?”शिव.
” तो बघ, बागे मध्ये रिकामा
झोपाळा पुन्हा झोके घेऊ लागला आणि त्या झोपाळ्या
समोर ती काळी आकृती पुन्हा दिसत आहे,” अलोक
एल सी डी कडे बघत म्हणाला.
“माझ्याकडे एक आयडिया आहे हे रहस्य जाणून घ्या
साठी.” सुधीर.
“ती कोणती ?” शिव.
” मी, समीर आणि अलोक आम्ही तिघे
हि बागे मध्ये जातो. आणि मी माझ्या मोबाईल ने शूटिंग करतो आणि तो झोपाळा थांबवतो. जसा
जोगेंद्र ने थांबवला होता. आणि तुम्ही बाकीचे सगळे इथे थांबून cctv बघा. आणि आमच्या
बरोबर आर टी वरून संपर्कात राहा.” सुधीर.
” ठीक आहे,चांगली आयडिया आहे.” शिव.
काही वेळात, सुधीर,समीर आणि अलोक दोघे गार्डन
जवळ पोहोचले.
सुधीर गार्डन
च्या दरवाज्यात उभा राहून बोलतो,” तुम्ही दोघे इथेच थांबा आणि इथूनच माझ्यावर
लक्ष ठेवा. मी आतमध्ये जाऊन शूटिंग करतो आणि ब्लू टूथ वरून आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू.”
“ओ के,” समीर आणि अलोक
दोघेही बोलतात.
सुधीर गार्डन मध्ये झोके घेणाऱ्या रिकाम्या
झोपाळ्याचे शूटिंग सुरु करतो,cctv मध्ये त्याच वेळी पोलीस स्टेशन मध्ये दिसणारी काळी
आकृती सुधीर ला बागे मध्ये पण दिसत नाही आणि त्याच्या मोबाईल कॅमेरा मध्ये दिसत नाही. सुधीर अचानक हलणारा रिकामा झोपाळा पकडतो. आणि शूटिंग
चालू ठेवतो तेव्हा त्याला तिथे काहीच दिसत नाही आणि त्याच्या मोबाईल मध्ये पण काही
दिसत नाही. तो झोपाळा सोडतो पुन्हा झोपाळा झोके घेऊ लागतो. पुन्हा सुधीर हलणारा झोपाळा
पकडून थांबवतो याही वेळी त्याला काही दिसत नाही!
प्रत्यक्षात आणि मोबाईल कॅमेरात पण! त्याचवेळी सुधीर जोरात मागे फेकला जातो
आणि बेशुद्ध पडतो.
थोड्याच
वेळात त्या जागी………
“सुधीर साहेब, सुधीर साहेब,
” समीर आणि अलोक दोघे हि बागे मध्ये बेशुद्ध पडलेल्या सुधीर ला हलवून हलवून उठवतात
आणि पाण्याचा बाटलीने तोंडावर पाणी मारतात. त्यामुळे सुधीर डोळे उघडतो आणि दोन्ही हाताने
डोके धरून बसतो. समीर आणि अलोक दोघेही त्याच्या आजू-बाजूला उभे असतात.
“साहेब कसे आहेत तुम्ही
?” अलोक.
” साहेब तुम्हाला कुठे लागले आहे का ? काही
दुखापत झाली आहे का?”समीर.
“आ…? “सुधीर ने डोक्यावरती
ठेवलेले हात खाली करून डोके वर केले आणि अवती-भवती बघितले सुधीर आणि अलोक त्याच्या आजू-बाजूला उभे
होते आणि समोर तो हलणारा झोपाळा पूर्णपणे थांबला होता! सुधीर ने अलोक च्या हातातून
पाण्याची बाटली खेचून घेतली आणि एका घोटात बाटलीतील पाणी प्यायला आणि उठून उभा राहिला.
“आत्ता, पोलीस स्टेशन मधून फोन आला होता.
तिथे आपल्याला लवकरात लवकर बोलावले आहे. पण तुम्हाला बरे वाटत नसेल काही दुखापत झाले
असेल तर आपण आत्ताच्या आत्ता पहिले डॉक्टर कडे जाऊ या का साहेब ?”अलोक ने सुधीर
च्या खांद्यावर हात ठेऊन विचारले.
“No,need to go to the doctor. I am O.K. now.” सुधीर
ताठ उभा राहून म्हणाला.“Lets, go back to
the police station.” असे म्हणून समीर आणि अलोक बरोबर चालू लागला.
गार्डन च्या बाहेर आल्यावर अचानक
बाहेर असलेल्या दत्ताच्या मंदिरातील घंटा वाजू लागल्या सुधीर,अलोक आणि समीर ने त्या
दिशेने पहिले.तर त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
मंदिराच्या समोरच्या औदुंबराच्या झाडाखाली
खोडाच्या मध्ये जोगेंद्र चा मोबाईल पडला होता !
सुधीर ने धावत जाऊन मोबाईल आपल्या खिशात
घातला. आणि दत्तगुरुना नमस्कार करून समीर आणि अलोक बरोबर निघाला.
इथे पोलीस स्टेशन मध्ये आल्या नंतर सुधीर
सगळ्यांना मोबाईल दाखवून म्हणाला,” हा बघा जोगेंद्र चा मोबाईल ! स्विच ऑफ आहे
चार्जिंग करून आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर कडून अनलॉक करावा लागेल. मग कदाचित त्यात
कळेल कि जोगेंद्र अचानक कशाला घाबरून पळाला. कारण माझ्या मोबाईल मध्ये काहीच दिसले
नाही आणि प्रत्यक्षात पण काही दिसले नाही.”
” हो, पण इथे cctv मध्ये मात्र आम्ही एक हॉरर
फिल्म बघितली.” शिव म्हणाला.
“हॉरर फिल्म ?” समीर अचानक
म्हणाला.
अलोक,” पण आम्ही तर गार्डन च्या
बाहेर उभे होतो, आम्हाला एवढेच दिसले कि, सुधीर ने दुसऱ्यांदा झोपाळा थांबवल्या वर
त्याला कोणी तरी मागे ढकलले आणि पुन्हा झोपाळ्याजवळ गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला म्हणून
आम्ही दोघे त्याच्या जवळ गेलो.”
“हो, पण तेवढ्या वेळात खूप मोठा
हॉरर ड्रामा झाला !” शिव.
” एवढा मोठा हॉरर ड्रामा कि आजपर्यंत
कुठल्याही चित्रपटात पहिला नसशील. मला वाटते आपण जर का तिकीट लावून एखाद्या थिएटर मध्ये
एक शो केला तर चांगलेच पैसे मिळतील.” रवी हसून बोलला.
सुधीर,” मोठा हॉरर ड्रामा? लवकर
दाखवा आम्हाला पण बघायचा आहे दाखवा लवकर.”
सुधीर, अलोक आणि समीर तिघेही एल सी डी
वर बघू लागतात.
सुधीर गार्डन मध्ये शूटिंग करीत असताना
ती काळी आकृती cctv मध्ये दिसत असते. सुधीरने जेव्हा दुसऱ्यांदा झोपाळा हाताने थांबवला
तेव्हा अचानक कोणीतरी त्याला त्या काळ्या आकृती कडे ढकलले ती काळी आकृती सुधीर च्या
अंगात शिरली सुधीर एकदम वर पासून खाल पर्यंत थरारला आणि पुन्हा झोपाळ्या कडे येऊन खाली पडला .
झोपलेल्या
सुधीर च्या अंगातून काळी आकृती बाहेर पडली आणि त्याच वेळी झोपाळ्या वर आणखी एक लहान
आकृती दिसली. त्या २ ही आकृतीं मध्ये मारामारी सुरु झाली. आणि अचानक गार्डन बाहेरच्या
मंदिरा समोरच्या cctv मध्ये दिसले कि तेथील घंटा वाजू लागल्या आणि तिथून एक पांढरा
शुभ्र तेजस्वी फ़ुटबाँल च्या आकाराचा गोळा बाहेर पडला नंतर तो
गार्डन मध्ये या २ काळ्या
आकृतीं जवळ आला. आणि २ हि आकृतींना पकडून औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी जमिनीत त्यांना
नष्ट केले. त्या नंतर तो पांढरा गोळा दत्तगुरूंच्या मंदिराच्या पायथ्याशी अदृश्य झाला
!
” या सगळ्याचा काय अर्थ आहे?”
सुधीर गोंधळलेल्या स्वरात म्हणाला.
” कदाचित मंदिरातील दैवीय शक्तीने
त्या २ही प्रेतात्म्यांना नष्ट केले असेल.” शिव.
” cctv मध्ये पूर्वीपासून दिसणारी काळी
आकृती जोगेंद्रची आहे. हे नक्की आहे. कारण जेव्हा त्याचा गार्डन मध्ये वाढ-दिवस साजरा
होत होता तेव्हा गार्डन मध्ये ती काळी आकृती कुठेच नव्हती. कदाचित झोपाळ्या वरच्या
आकृतीशी त्याचे काही तरी शत्रुत्व असेल.” रवी म्हणाला.
” जोगेंद्र च्या मोबाईल मध्ये हे
रहस्य उलगडेल. ते पण खात्रीने सांगता येणार नाही.” एक मोठा सुस्कारा सोडून समीर
म्हणाला.
तेव्हाच तिथे एक जण फोन अनलॉक करून घेऊन येतो. फोन
मिळाल्या वर लगेच तो एल सी डी शी कनेक्ट करून सगळे जण जमा होऊन असे काही बघायला लागतात
जसे काही एखादा भयपट सुरु झाला.
मोबाईल मधील शेवटच्या क्लिप वर क्लीक
केल्या वर दिसते. रिकामा हलणारा झुला जोगेंद्र हाताने पकडून थांबवतो. तेव्हा पहिले
काहीच दिसत नाही. पण दुसऱ्या वेळेला पकडतो आणि जसा तो मोबाईल कॅमेरा झोपाळ्याच्या साखळीवरून
खाली नेतो तेव्हा……
तर त्यात झोपाळ्या वर एक लांब लांब केस
असलेली विद्रुप ,7/8 वर्षाची मुलगी त्याच्याकडे रागाने बघत होती. तिला बघून जोगेंद्र खूप जोरात आरडाओरड करून पाळायला लागला तेव्हा त्या
मुलीचे भूत उडत-उडत जोगेंद्र च्या मागे लागले. त्या गडबडीत जोगेन्द्रने फोन चा कॅमेरा
बंद केलाच नव्हता. पळत पळत हायवे वर ट्रक च्या खाली येई पर्यंत तो तसाच चालू होता आणि
त्यामध्ये ते भूत पण पाठलाग करताना दिसत होते!
पाळता पाळता जोगेंद्र गार्डन च्या दरवाजाच्या बाहेर पडला आणि औदुंबराच्या झाडावर जाऊन आपटला आणि तेव्हाच त्याच्या हातातील
मोबाईल पडला आणि जोगेंद्र तिथून पुन्हा पळाला आणि हायवे च्या मधोमध आला जिथे गाड्या भरधाव वेगाने धावत होत्या अशाच एका भरधाव
वेगातल्या ट्रक खाली जोगेंद्र आला आणि जागीच मृत्यू पावला. हे सगळे मोबाईल मध्ये शूट
झाले होते.
एल सी डी वर सुधीर ने सगळा विडिओ रिवाइंड करून
सुरवातीला जेव्हा त्या मुलीचे भूत क्लोजप मध्ये दिसते तिथे पॊझ केला,”या मुलीला कुठेतरी
पाहिल्यासारखे वाटते.”
“मुलगी?:” शिव एल सी डी कडे हात
दाखवून पुढे म्हणाला,” सुधीर, ते भूत आहे ! आणि तुला यात कुठला चेहरा दिसत आहे?
डोळ्यांचा जागी खाचा दिसत आहेत, दात तर काळे पिवळे दिसत आहेत केसात नुसते जंगल आहे.
गलिच्छ घाणेरडे शरीर आहे, आपल्या इथे सिग्नल वर भीक मागणारी मुले पण हिच्या पेक्षा
स्वच्छ असतात.”
” हां आठवले,”सुधीर लगेच
टेंबलावर जोरात हात मारून म्हणाला.” जोगेंद्र चा मृत्यू झाला त्याच्या २ ऱ्या
दिवशी धरबी वाडीच्या एका मोडक्या घरात एका ७/८ वर्षाच्या मुलीची डेड बॉडी मिळाली.
अजूनही तिची
डेड बॉडी शवागारात पडून आहे!”
” हा, माहित आहे कारण तिची
बॉडी घेऊन जायला कोणी आलेच नाही. सिग्नल वर भीक मागणारी बेवारस पोरगी होती ती. त्यामुळे
अजून तिचे प्रेत शवागारात पडून आहे.” अलोक म्हणाला.
“हो, त्या अगोदर तिच्या बॉडी
चे पोस्ट मार्टेम झाले होते, पोस्ट मार्टेम मध्ये त्या मुलीवर रेप झाल्याचे कारण सांगितले
होते.”रवी.
” आईडिया,” सुधीर जोरात
टिचकी वाजवून म्हणाला,” आपण या मुलीची डेड बॉडी जिथे मिळाली तिथले cctv फुटेज
चेक करू या. कदाचित आपल्याला त्यातून कळेल कि कोणी तिच्या बरोबर दुष्कृत्य केले आहे.”
रवी,”
धरबी वाडी आपल्या पोलीस स्टेशन च्या एरियात येते. याच कॉम्पुटर मध्ये cctv फुटेज मिळेल.”
असे म्हणून रवी ने धरबी वाडी फाईल वर क्लिक केले. फाईल ओपन झाल्या नंतर सुधीर ने जोगेंद्र
चा वाढदिवसाच्या तारखे वर क्लिक केले. साधारण २//३ तासा नंतर सुधीर ला त्या cctv फुटेज
मध्ये भरपूर माहिती मिळाली.
“काय सुधीर साहेब, गेले २/३
तासापासून तुम्ही हे cctv फुटेज असे काही बघत आहेत जसा काही टी व्ही वर एखादा पिक्चर
बघत आहेत! मी राऊंड वर जायच्या अगोदर तुम्हाला cctv च्या फाईल ओपन करून दिल्या आणि
राउंड वर गेलो होतो परत आल्या नंतर हेच करीत आहेत. काही निष्पन्न झाले का या तुमच्या
बघण्यातून?” रवी पोलीस स्टेशन मध्ये आत येऊन सुधीर च्या टेबल जवळ जाऊन म्हणाला.
सुधीर,” हो चांगली A टू Z माहिती
मिळाली. रवी तुझा एखादा व्हिडीओ एडिटर ओळखीचा आहे का?”
“त्याला कशाला विचारतो ?” मधेच
अडवून अलोक म्हणाला ,” त्या दिवशी आपण उचलून आणलेली ती दोन कार्टी काय नाव त्यांचे
बर…”
“अर्जुन आणि ध्रुव ” शिव उत्तराला
“त्यांचा इथे काय संबंध ?”
अलोक,” ती दोन हि कार्टी मला या
केस बद्दल चौकशी करून पीडत आहेत. जोगेंद्र चा फोन त्यांनीच अनलॉक करून दिला. त्यानंतर
सारखे विचारत आहेत. काय आहे त्या व्हिडीओ मध्ये. ती दोघेही या कामात एक्स्पर्ट आहेत,
ते हे काम चांगले करतील.”
सुधीर,” हा मग बोलावं त्यांना
उद्या दुपारी ३ वाजता मी तुम्हाला आपल्या कॉन्फरन्स रूम मध्ये प्रोजेक्टर वर तुम्हाला
कंप्लिट मूवी दाखवेन !”
दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मधील सगळे
जण,कॉन्फरन्स रूम मध्ये जमा झाले…
सुधीर,”
पोस्ट मार्टेम च्या रिपोर्ट प्रमाणे त्या मुलीच्या मृत्यूची वेळ काय होती रे रवी?”
” दहा ते बारा तास अगोदर
,” रवी.
“मग या पहिल्या cctv फुटेज मधील
टाईमिंग काय आहे ,”सुधीर.
“२१०० अवर म्हणजे रात्री ९ वाजता.”
अलोक म्हणाला.
“म्हणजे त्या मुलीच्या मृत्यूच्या
१२ तास अगोदर , इथूनच चित्रपट सुरु होतो तुम्ही प्रत्येक cctv फुटेज च्या टाईमिंग वर
लक्ष ठेवा. ध्रुव शो सुरु कर.
cctv फुटेज नंबर वन -२१०० अवर-
एका गल्ली मध्ये एका रिकाम्या पिंपावर ती
भिकारी मुलगी बसलेली दिसते. काही वेळातच त्या मुली जवळ जोगेंद्र आला. त्याने त्या मुलीचे
तोंड दाबून तिला उचलले, तिने स्वतःची सुटका करण्याचा खूप प्रयत्न केला. पण जोगेंद्र
च्या ६ फुटी देहाच्या अडीच-अडीच किलोच्या दोनही हाताच्या पकडीतून सुटका करणे शक्य होत नाही.
cctv फुटेज नंबर २१०५ अवर-
जोगेंद्र त्या मुलीला घेऊन त्याच मोडक्या
तोडक्या घरात येतो आणि त्या घराचे दरवाजे बंद
करतो. हे तेच घर असते जिथे दुसऱ्या दिवशी त्याच
मुलीचे प्रेत मिळाले. १५/२० मिनिटाने जोगेंद्र पॅन्ट ची झिप लावत आणि शर्टाची बटणे
लावत बाहेर पडतो. तेव्हाच तिथे त्याचा मित्र येतो आणि त्याला स्वतः बरोबर घेऊन जातो
.पण cctv मध्ये दिसते जोगेंद्र च्या मागे एक फिकट काळ्या रंगाची त्या मुलीच्या आकाराची
आकृती उडत जाते.
कॉन्फरन्स रूम मधील प्रत्येकाला ती धुरकट
आकृती दिसते आणि सगळे जण म्हणतात… ते बघ त्या मुलीची भूत!
cctv फुटेज नंबर थ्री- जो गार्डन समोर
असतो, आणि जोगेंद्र च्या मित्रांच्या मोबाईल कॅमेराच्या फुटेज मध्ये जोगेंद्र च्या
अपघाती मृत्यूचे नाट्य चित्रित होते त्यामध्ये जोगेंद्र च्या मोबाईल कॅमेरा मध्ये त्या
मुलीचे भूत दिसते.
cctv फुटेज नंबर फोर- ज्यात बागेत एका झाडाखाली
जोगेंद्रच्या आकाराची काळी आकृती आणि एक रिकामा झोपाळा झोके घेत आहे.
cctv फुटेज नंबर फाईव्ह – यामध्ये सुधीर
चे बागे मधले शोध नाट्य चित्रित होते.
cctv फुटेज नंबर सिक्स– जो मंदिराच्या
बाहेर असतो तिथून एक तेजस्वी पांढऱ्या प्रकाशाचा गोळा त्या दोन हि भूतांना नष्ट करतो.
cctv फुटेज नंबर सेव्हन -दुसऱ्या दिवशी
रात्री त्या बागेत सर्व काही सामान्य असते. कुठलाही रिकामा झोपाळा हालत नाही किंवा
कुठलीही काळी आकृती दिसत नाही. जशी काही ती बाग शापमुक्त झाली.
अशा प्रकारे सगळे फुटेज संपल्या नंतर सुधीर
प्रोजेक्टर समोर येऊन म्हणाला ,” शेक्सपिअर ने एकदा सांगितले होते कि हे जग एक
रंगमंच आहे आणि आपण सगळे त्यातील पात्र आहोत. पण आजच्या जमान्यात म्हणावे लागेल हे
जग एक मोठा चित्रपट आहे ज्याचा डिरेक्टर आणि निर्माता,कॆमेरामॅन, टेक्निशिअन अगदी ऍनिमेशन
स्पेसिऍलिस्ट साक्षात परमेश्वर आहे ! म्हणूनच cctv फुटेज , मोबाईल कॅमेरा मध्ये देवाला
पाहिजे तसे त्याच्या मर्जी नुसार भूत, जोगेंद्र चा मोबाईल दिसला ” सुधीर असे बोलत
असताना मागे एल सी डी वर दत्त गुरूंचा फोटो येतो. सुधीर वळून त्या फोटो ला नमस्कार
करतो आणि निघतो त्याच्या मागोमाग कॉन्फरन्स रूम मधला प्रत्येक जण श्रद्धेने त्या फोटो
ला नमस्कार करून निघून जातो.
समाप्त
भयाकह आहे ही कथा आहे कि रियालिटी..असा प्रश्न आहे एकदरीत सारी स्टोरी छान आहे उत्तम प्रयत्न..