Alexa,Tell a bedtime story.पन्नाशी उलटलेल्या लक्ष्मी ने ४ वर्षाच्या सिद्धार्थला झोप येण्यासाठी अलेक्साला ऑर्डर दिली आणि त्याच्याबरोबर गादीवर अंग टाकले. अलेक्साने पण अल्लाउद्दीन च्या चिरागप्रमाणे लक्ष्मीचा हुकूम मानला आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली.
कोणे एके काळी नेपाळच्या लुम्बिनी शहरात सिद्धार्थ नावाचा राजपुत्र जन्माला आला. सिद्धार्थ नाव ऐकायला आल्या वर लक्ष्मी च्या जवळ झोपलेल्या सिद्धार्थ ने डोळे पुन्हा उघडून बघायला लागला आणि म्हणाला, ” आजी, आजी हि म्हणाली सिद्धार्थ नावाचा राजपुत्र म्हणजे हि मला राजपुत्र म्हणाली का?”
“हो बाळा हि तुझीच गोष्ट सांगत आहे ऐक,” लक्ष्मी ने सिद्धार्थ च्या डोक्यावर हलकेच थोपटून सांगितले. सिद्धार्थ पुन्हा डोळे मिटून झोपला.स्वतःचा राजपुत्र म्हणून केलेला उल्लेखाने सिद्धार्थ सुखावला होता त्याचा आनंद झोपलेल्या सिद्धार्थ च्या चेहय्रावर दिसत होता. त्याला बघून लक्ष्मी मनातल्या मनात म्हणाली देव करो हा सिद्धार्थ पण गोष्टीतल्या राजपुत्रासारखा सुखात राहू दे.
अलेक्साचे गोष्ट सांगण्याचे काम चालूच होते. सिद्धार्थ च्या जन्माच्या वेळी एका ऋषीने सांगितले कि मोठेपणी हा एक महान संन्यासी होईल, म्हणून राजाने त्याच दिवसापासुन त्याच्या राज्यातील गोरगरिबांना, वृद्ध,अपंग,लोकांना राज्या बाहेर काढले. राजपुत्राच्या समोर कोणताही दुःखी,मनुष्य येऊ नये, दुःख म्हणजे काय हे त्याला माहित हि पडू नये यासाठी राजपुत्राभोवती दुःख संकटापासून दूर एक कवच बनवले होते. राजपुत्र देखील याच कोशा मध्ये लहानाचा मोठा झाला. हेच जग आहे आणि हे अत्यंत सुंदर आहे याच भ्रमात तो वाढला.
हे वर्णन ऐकून लक्ष्मीच्या २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. गोष्टीतल्या त्या राजपुत्राशी मिळते जुळते एक पात्र लक्ष्मीला २५ वर्षांपूर्वी भेटले होते. त्या पत्राचे नाव होते….”कॅप्टन रिझवान अहमद ” ! त्या राजपुत्रा प्रमाणे एका अशा कोषात वाढलेला, ज्यामध्ये दुःख, संकटे,गरिबी, आणि ‘आतंकवाद ‘ हे शब्दच नव्हते. अशा या कोषाचे नाव होते– न्यूयॉर्क, अमेरिका!
या नगरीतला “कॅप्टन रिज़वान अहमद” देखील परिकथेतील राजकुमार सारखा होता. ६ फुटापेक्षा जास्त ऊंची त्याबरोबर सिक्स पॅक ऍब्स. गोरापान रंग, निळे डोळे सोनेरी केस. टिपिकल अमेरिकन पेहराव, जेव्हा त्याने नाव सांगितले तेव्हा कळले कि तो मुस्लिम आहे. माझी आणि त्याची पहिली भेट भारतातच झाली.एअर ट्रॅफिक कंट्रोल मध्ये काम करत असताना एका ट्रैनिंग च्या वेळी तो ट्रेनर होता. तो लेक्चर देत होता पण त्यावर मन एकाग्र करणे मुश्किल झाले होते आणि सारखे दुःखी होत होते कारण मी स्वतःत्यावेळी विवाहित आणि एका ४ वर्षाच्या मुलीची म्हणजे सिद्धार्थच्या आई ची आई होते. आणि त्यालापण बायको आणि २ वर्षाचा मुलगा होता. तरी सुद्धा ८ दिवसाच्या ट्रैनिंग नंतर परीक्षा झाल्यावर चांगल्या मार्काने पास झाले आणि पुढच्या साधारण एक महिना चालणाय्रा ट्रेनिंग साठी A T C तर्फे U S ला पाठवण्यात आले. एअरलाईन मध्ये असल्यामुळे फ्री तिकीट वरती माझा नवरा स्वप्नील आणि मुलगी राजश्री ला पण घेऊन गेले.स्वप्नील ने त्यावेळी मार्केट मध्ये आलेले हॅंडीकॅम चे लेटेस्ट मॉडेल खरेदी केले होते.
न्यूयॉर्क ला गेल्यावर रिझवान च्या फॅमिली ची पण ओळख झाली. नेवार्क, न्यूजर्सी एअरपोर्टवर लोकल टाइम ०७:४५ A . M ला तारीख ११सप्टेंबर २००१ रोजी. रिझवान त्यांना आपल्या कार मधून घेऊन आला होता.
पहिल्यांदा एक व्यक्ती कार मधून उतरली लक्ष्मी त्याच्या जवळ जाऊन म्हणाली,”Hello, Mr. Rizwan”.
“Yes,”ती व्यक्ती म्हणाली.
त्या व्यक्ती ला बघितल्यावर लक्ष्मी एक्दम गोंधळून गेली. कारण समोरचा माणूस दिसत होता रिझवान सारखाच पण वयाने खूपच मोठा होता.
“Oh, sorry, I thought that you are Mr. Rizwan,”लक्ष्मी गोंधळून म्हणाली.
"Yes I am Rizwan,"त्याने उत्तर दिले.
तेवढ्यात रिझवान ड्राइव्हर च्या सीट वरून बाहेर आला आणि त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि म्हणाला,”Hi, Lux,meet my father Mr. Rizwan”.
“Aa?Is your father’s name also Rizwan?”लक्ष्मी पुन्हा गोंधळून म्हणाली.
तेवढ्यात कार मधून दोन महिला आणि एक छोटा २ वर्षांचा मुलगा बाहेर आला. त्यांना बोलवून रिझवान ने ओळख करून दिली,”This is my mother, and this is my wife, and this one is my son Altaf.“
“Glad to meet you,”लक्ष्मी हात जोडून म्हणाली.
“All of my family members are on their way to San Francisco on the 8:42a.m. United93 flight right now for a wedding. I’m going tomorrow.Now I am here to drop them all to the airport. Where are you going now?“रिझवान ने लक्ष्मी ला विचारले.
“I’m going to the time square now.My husband and daughter are there,”लक्ष्मी.
“Ok then sit in my car and I will leave you at the time square. And meet your family too,”रिझवान कार चा दरवाजा उघडून लक्ष्मी ला म्हणाला.
“पण एके दिवशी राजपुत्र या कोशातल्या आयुष्याला कंटाळला. आणि त्याने एका सारथ्याला आज्ञा देऊन आपला रथ महालाच्या बाहेर घेऊन गेला. आणि त्याच्या समोर आली दुःखाची मालिका !”
अलेकसाच्या रेकॉर्ड मधील या वाक्याने लक्ष्मी काहीवेळासाठी भानावर आली. तिने बाजूला गाढ झोपलेल्या सिद्धार्थ कडे पहिले. अलेकसाची रेकॉर्ड चालूच होती. लक्ष्मी रोज सिद्धार्थ झोपल्यावर अलेकसाला रेकॉर्ड स्टॉप करण्याची ऑर्डर द्यायची . पण आज अलेकसा सांगत असलेली गोष्ट पुन्हा भूतकाळात घेऊन गेली.
राजपुत्र सिद्धार्थ गौतमप्रमाणे दुःख म्हणजे काय माहित नसलेल्या अमेरिकन नागरिकांसमोर ११ सप्टेंबर २००१ ला सकाळी ९ वाजल्यापासून दुःखाची एक मालिका सुरु झाली. स्वप्नील ने नवीन कॅमेरा घेतला होता त्यात असे काही चित्रित होईल याचा कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आतंकवादाने न्यूयॉर्कच्या सुखी कवचाला भगदाड करून आक्रमण केले होते.
कार मध्ये बसल्यावर टाइम स्क्वेअर ला जात असताना वाटेत लक्ष्मी ने रिझवान ला विचारले,“How come you and your father have the same name?”
“What is so special about it? This is very common here in America,”रिझवान ने सांगितले.
“But doesn’t this cause problem ?Then how do you know if you want to contact ?”लक्ष्मी
“Here in America they call me Junior. You also call me by the same name,”रिझवान.
“O.K. Mr. Junior,”लक्ष्मी हसून बोलली,”Funny.”
तेव्हाच कॅप्टन जुनिअर साहेबांचे लक्ष आकाशात उडणाऱ्या एका विमानाकडे गेले. आणि म्हणाला,”This is an American Airlines Boeing 767. This time this plane is going from Boston to Los Angeles. How about this route?”
https://youtu.be/St7ny38gLp4?si=M8yo0x7f1Iuesybs
“Yes you are right,”लक्ष्मी विमानाकडे बघून म्हणाली,“I call ATC right now. And ask.”पण तेवढ्यात त्यांची कार वर्ल्ड ट्रेंड सेन्टर च्या जवळ पोहोचली तिथे एका रोड वरती काम चालले होते आणि त्याच्या बाजूला स्वप्नील आणि मुलगी राजश्री दिसली. ते दिसल्यावर लक्ष्मी ने फोन डिस्कनेक्ट केला आणि जुनिअर ला कार थांबवायला सांगितले,“Look there’s my husband and daughter.”लक्ष्मी कार मधून उतरली आणि स्वप्नील कडे गेली स्वप्नील तर हॅंडीकॅम ने शूटिंग करण्यात एवढा बिझी झाला होता कि त्याला लक्ष्मी जवळ आलेले कळले पण नाही. जुनिअर पण कार पार्क करून त्यांच्याकडे आला. लक्ष्मी ने स्वप्निलच्या डोक्यावर टपली मारली. स्वप्नील ने दचकून वळून बघितले तर त्याच्या बाजूला लक्ष्मी आणि जुनिअर उभे होते. लक्ष्मी ने राजश्रीला खांद्यावर घेतले आणि स्वप्नील ची जुनिअर ला ओळख करून दिली. जुनिअर ने पण स्वप्नील शी शेकहॅण्ड केला आणि राजश्री चा हात हातात घेऊन तिला चॉकलेट दिले. स्वप्नील ने पुन्हा शूटिंग करायला सुरवात केली. तेव्हाच मघाशी जुनिअर आणि लक्ष्मी ने पाहिलेले अमेरिकन एअरलाइन चे बोईंग ७६७ जोराचा आवाज करीत सरळ वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या बिल्डिंग मध्ये घुसले.
हे सगळे स्वप्निलच्या कॅमेरा मध्ये कॅप्चर झाले. प्रत्येक जण हा प्रसंग पाहिल्यावर जागच्या जागी स्तब्ध झाला.
ooo
What happened at the World Trade Center on 9/11?
The hijacked Flight 11 was crashed into floors 93 to 99 of the North Tower (1 WTC) at 8:46 a.m. The hijacked Flight 175 struck floors 77 to 85 of the South Tower (2 WTC) 17 minutes later at 9:03 a.m. When the towers were struck, between 16,400 and 18,000 people were in the WTC complex. Of those, the vast majority evacuated safely. As they rushed out, first responders rushed in trying to save those still trapped or injured.
The fires from the impacts were intensified by the planes’ burning jet fuel. They weakened the steel support trusses, which attached each of the floors to the buildings’ exterior walls. Along with the initial damage to the buildings’ structural columns, this ultimately caused both towers to collapse. The five other buildings in the WTC complex were also destroyed because of damage sustained when the Twin Towers fell.
The collapse of the buildings left the site devastated. Thousands of volunteers came to Ground Zero to help with the rescue, recovery, and clean-up efforts, and on May 30, 2002, the last piece of WTC steel was ceremonially removed
What was the World Trade Center?
The World Trade Center (WTC) was a 16-acre commercial complex in lower Manhattan that contained seven buildings, a large plaza, and an underground shopping mall that connected six of the buildings. The centerpieces of the complex were the Twin Towers. On September 11, 2001, the entire complex was destroyed in a terrorist attack that has come to be referred to as “9/11.”
What is Islam?
Islam is the world’s second-largest religion. An adherent of Islam is a Muslim. Islam’s beliefs and practices center around two key sources: the Qur’an and the Hadith. The Qur’an contains what Muslims believe is God’s final revelation, made to the Prophet Muhammad, Islam’s founder, more than 1,400 years ago. The Hadith is a collection of Muhammad’s sayings and deeds during his life.
“ओह शीट, व्हॉट ईज धिस ?हे प्लेन तर सरळ बिल्डिंगच्या आत मध्ये घुसले.” स्वप्नील ने पहिल्यांदा तोंड उघडले.”अमेरिकेत प्लेन लँडिंगची हे काय नवीन टेक्निक आहे का ? प्लेन पॅसेंजर ना पीक अप करण्यासाठी डिरेक्ट ऑफिस मध्ये घुसते.”
लक्ष्मी स्वप्नील च्या हाता वर जोरात फटका मारून म्हणाली,”इथे एवढी मोठी दुर्घटना घडली आणि तू कॉमेडी काय करत आहेस.”
” कॉमेडी नाही, पण हे असे कसे झाले. विमानात काही खराबी झाली म्हणून असा ऍक्सीडेन्ट झाला कि काय ?” स्वप्नील शूटिंग चालू ठेवून म्हणाला.
” Call ATC office “जुनिअर ने लक्ष्मी ला ऑर्डर केली.
लक्ष्मीने A T C ला फोन लावला पण तिथे सुद्धा फोन नुसता रिंग होण्याचा आवाज येतो.
” हे विमान टॉवर च्या मधोमध घुसले म्हणजे फक्त वरच्या मजल्याना नुकसान होईल.खालचे सगळे मजले सुरक्षित राहतील.” स्वप्नील शूटिंग चालू ठेवून म्हणाला.
” What nonsense ! या टॉवर च्या प्रत्येक मजल्यावर २४४ लोखंडाच्या सळ्या वापरल्या आहेत.
लोखण्डाच्या तापमानाच्या मर्यादा असतात. ५५० पेक्षा जास्त तापमान वाढल्यावर लोखंड वितळायला लागते. आणि जे प्लेन घुसले ते बोईंग ७६७ -८०० होते आतले इंधन जळल्याने आतले तापमान वाढते. थोड्याच वेळाने हि बिल्डिंग पूर्णपणे खाली कोसळेल.”रिझवान (जुनिअर) भीतीने थर-थरत बोलत होता.
“ग्रेट,तुम्ही खरोखर एक अग्रेसर पायलट आहेत. म्हणूनच एवढे सगळे डिटेल दिलेत.” स्वप्नील.
जुनिअर आणि स्वप्नील यांच्यात हे बोलणे चालू होते तेव्हाच ९:१६ वाजता दुसय्रा टॉवर वर युनायटेड ऐरलाइन फ्लॅट नंबर -१७५ चे प्लेन घुसल
पुन्हा तोच कानठळ्या बसवणारा भयंकर आवाज आणि लोकांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून लक्ष्मी च्या खांद्यावर असलेली ४ वर्षाची राजश्री जोर-जोरात रडायला लागली आणि लक्ष्मी ने पण जाऊन स्वप्नील ला पकडले. स्वप्नील ने एका हाताने दोघीना पकडून आणि दुसऱ्या हाताने शूटिंग चालू ठेवून म्हणाला,” अजून एक प्लेन दुसऱ्या टॉवर मध्ये घुसले म्हणजे नक्कीच कोणी तरी जाणून-बुजून हा एक प्रकारे हल्ला केला असेल”.
जुनिअर लक्ष्मी ला म्हणाला,” Lux, did you get any information from A T C?”
लक्ष्मी ,”No, no one is picking up the phone. I will call Harriet’s mobile right now, she is on duty at ATC. Maybe she can say something.”
तेव्हाच तिथे C N N , B B C आणि आणखी काही न्यु चॅनेल जमा झाली. ते न्युज सांगत होते. त्यांच्या एका न्यूज ने कळले कि तिसरं विमान ९:४५ वाजता पेंटागॉन मध्ये क्रॅश झाले.
त्याचवेळी जुनिअर चा मोबाईल वाजला ,”डॅड……!Where are you ?”
“Our plane has been hijacked.”रिझवान (जुनिअर चे वडील )
“What……! Your plane was hijacked too ?”जुनिअर
जुनिअर चे बोलणे ऐकून लक्ष्मी आणि स्वप्नील चे तिथे लक्ष वेधले गेले . आणि ते त्याच्या बाजूला उभे राहून त्याचे बोलणे ऐकायला लागले.
तेव्हाच लक्ष्मी ला ह्यरिएट चा फोन आला आणि ती बाजूला जाऊन बोलू लागली.
इथे जुनिअर चे वडील फोन वर बोलले,” Those guys have gone into the cockpit and we don’t know where they are taking us.”
तेव्हा लक्ष्मी ह्यारिएट शी आपले बोलणे संपवून जुनिअर च्या जवळ जाऊन त्याच्या कानात कुजबुजली
आणि नंतर स्वप्नील जवळ जाऊन म्हणाली,”,आत्ता ह्यारिएट ने सांगितले कि A T C ने अमेरिकेच्या हद्दीत उडणाऱ्या प्रत्येक विमानाला जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याचे आदेश दिले.”
हे ऐकून जुनिअर फोन वर वडिलांशी बोलला,”डॅड, A T C has asked all planes to land at the nearest airport. May be your plane is also landing at the nearest airport.”
” Our plane has been hijacked and are these hijackers going to listen to ATC? “रिझवान फोनवर बोलला. तेव्हाच रिझवान च्या आई ने फोन घेतला आणि म्हणाली ” These people are suicidal attackers. There has been an explosion in the plane.”
जुनिअर,”Mom, here are planes crashing into buildings one by one. Right now 2 planes have crashed into the World Trend Center and the third plane has crashed into the Pentagon.”
तेव्हाच सकाळचे दहा वाजता साऊथ टॉवर कोसळू लागला.आणि लोकांच्या किंचाळण्याच्या आवाजाने जुनिअर गोंधळून गेला. टॉवर कोसळत असताना त्याच्या धुराचे ढग पूर्ण मॅनहॅटन बेटावर पसरू लागले.
त्याच्यापासून वाचण्यासाठी जुनिअर त्याच्याच कार मध्ये जाऊन बसला. आणि लक्ष्मी ४ वर्षाच्या राजश्रीला खांद्यावर घेऊन फोन वरून बोलत होती. तेव्हा स्वप्नील चे शूटिंग चालूच होते,त्याने धुराचा ढग येताना पाहिले. त्याने लक्ष्मी आणि राजश्रीला दोन्ही हातानी घट्ट मिठी मारून एका बिल्डिंग च्या बेसमेंट मध्ये आडोशाला घेऊन गेला.
कार मध्ये बसल्यावर बाहेरचा आवाज आणि धूर थांबला. जुनिअर पुन्हा फोन वरून त्याच्या वडिलांशी बोलू लागला,”डॅड,इथे W T C चा साऊथ टॉवर कोसळला आहे. डॅड, ज्यांनी विमानाचे अपहरण केले आहे ते खूप डेंजरस आहेत. तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला धैर्याने तोंड द्यावे लागेल. मगच तुम्ही स्वाताहाला आणि माझ्या फॅमिली ला वाचवू शकाल. तुम्ही प्रयत्न करून कॉकपीट मध्ये जा. मग मी तुम्हाला सांगतो तिथे काय करायचे ते. प्लिज डॅड तुम्हाला एवढे करावे लागेल.”
“Ok I will see,” हे शब्द फोन वर रिझवान, जुनिअर ला म्हणाला पण त्यानंतर एक मोठा स्फोटक आवाज फोन वर आला २/३ मिनिटे लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर सर्व काही शांत शांत.
https://youtu.be/Rics6P4RUww?si=QWMEVC3ggCQ9k0Fd
जुनिअर फोन वरती किती वेळचा डॅड,डॅड ओरडत होता पण काहीच उपयोग झाला नाही. तो समजून गेला कि इतर तीन प्लेन सारखे हे प्लेन पण कुठल्या तरी इमारतीवर कोसळले असेल या कल्पनेने जुनिअर काहीवेळ पुतळ्यासारखा स्तब्ध बसून राहिला त्याने कार च्या खिडकी बाहेर पाहिले . बरोबर १०:२९ ला W T C चा नॉर्थ टॉवर कोसळला त्याचा पण धुराळा पसरू लागला पण या वेळी जुनिअर ने कार चा दरवाजा उघडला आणि बाहेर उभा राहिला तो धुराळा जसा त्याच्या अंगावर आला तसा तो तिथेच त्या टॉवरसारखा बेशुद्ध होऊन कोसळला !
अशा प्रकारे दुःखाची मालिका बघितल्यावर राजपुत्राला जाणवले कि मी काय करत आहे ? बस खाणे, सुख भोगणे, सगळ्या व्यर्थ गोष्टी! आणि त्याच्या मनात एक संघर्ष आणि बेचैनी झाली. आणि एकदा कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री एका चोरा सारखा राजपुत्र महालाच्या बाहेर सर्व सुख त्यागून कायमचा निघून गेला…..
या कथे बरोबर लक्ष्मीच्या आठवणींचा पहिला भाग संपला. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेतल्या मुक्कामाच्या, आठवणींच्या फाइल गेले २५ वर्षात लक्ष्मीच्या मेंदूमध्ये अशाच प्रकारे काही ना काही कारणाने क्लिक होत होत्या. आठवणींची ती फाइल कधी डिलीट झालीच नाही. जास्तीत-जास्त २ दिवसाच्या गॅप नंतर त्या आठवणींच्या फाइल क्लिक होऊन एपिसोड सुरु होत
होता.
पूर्वार्ध