अशा प्रकारे दुःखाची मालिका बघितल्यावर राजपुत्राला जाणवले कि मी काय करत आहे ? बस खाणे, सुख भोगणे, सगळ्या व्यर्थ गोष्टी! आणि त्याच्या मनात एक संघर्ष आणि बेचैनी झाली. आणि एकदा कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री एका चोरा सारखा राजपुत्र महालाच्या बाहेर सर्व सुख त्यागून कायमचा निघून गेला…..
‘हिमाचल प्रदेश ‘ मधील टाबो चॉ-खोर मोनास्टरी, बुद्ध धर्मीय साधू संतांचे आश्रम. मे 2017 मध्ये लक्ष्मी आणि तिची मुलगी राजश्री बरोबर हिमाचल प्रदेश ची टूर करण्यासाठी आली होती. हिमाचल मध्ये सिमला,मनाली, धर्मशाळा च्या विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असताना लक्ष्मी आणि राजश्री बुद्ध धर्मीय साधू संतांच्या आश्रमात पोहोचल्या. तिथे फिरत असताना समोर एक बौद्ध संत आला ! डोक्यावरचे केस पूर्णपणे नाहीसे झालेले. डोळ्यावर चष्मा, पण त्याचे धारदार नाक आणि ६ फुटापेक्षा जास्त ऊंच धिप्पाड देहयष्टी ने त्याची खरी ओळख करून दिली. आणि लक्ष्मी म्हणाली ,”कॅप्टन रिझवान!”
” लक्स मॅडम “, रिझवान ने पण हसून ओळख दाखवली,”मला तुमच्याशी बोलायचे आहे. पण तुम्ही इथे काही वेळ थांबाल का? माझ्या प्रार्थनेची वेळ झाली आहे. माझी प्रार्थना संपल्यावर मी तुमच्याशी बोलायला येईन. तोपर्यंत तुम्ही इथेच बसा असे म्हणून रिझवान ने बाजूच्या बाकड्याकडे बोट दाखवले आणि निघून गेला.
रिझवान निघून गेल्यावर लक्ष्मी च्या डोळ्यासमोर पुढचा एपिसोड सुरु झाला. तिची मुलगी राजश्री तर त्या वेळी ४ वर्षाची होती.हे सगळे तिच्या नकळत्या वयात घडले होते. पण वर्ल्ड ट्रेड सेन्टर वर आदळलेल्या २ विमानांचे व्हिडीओ सतत TV वर दाखवले जात होते. तसे कधीना कधी, काही ना काही, निमित्ताने ती तिच्या आई-वडलांच्या तोंडून कोणाशी तरी चर्चा करताना वर्ल्ड ट्रेड सेन्टर चे एपिसोड ऐकून-ऐकून मेंदू च्या मेमरी कार्ड मध्ये फिक्स झालें होते. तसेच त्यावेळच्या मुक्कामात तिच्या वडिलांनी म्हणजे स्वप्नील ने रिझवान चे फोटो काढून कॉम्पुटर मध्ये सेव्ह केले होते. त्यामुळे रिझवानचा चेहरा सुद्धा तिच्या चांगलाच परिचयाचा होता. पण लक्ष्मी आणि राजश्री च्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे-रिझवान सारखा श्रीमंत, देखणा पायलट असा अचानक बुद्ध धर्मीय संत कसा झाला ? त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्या साठी दोघीही शांत पणे बसल्या.
सकाळचे दहा वाजता साऊथ टॉवर कोसळू लागला.
तेव्हा स्वप्नील चे शूटिंग चालूच होते त्याने धुराचा ढग येताना पाहिले. त्याने लक्ष्मी आणि राजश्रीला दोन्ही हातानी घट्ट मिठी मारून एका बिल्डिंग च्या बेसमेंट मध्ये आडोशाला घेऊन गेला. नंतर १०:२९ ला W T C चा नॉर्थ टॉवर कोसळला त्याचा पण धुराळा पसरू लागला. लक्ष्मी,स्वप्नील आणि राजश्री बिल्डिंग च्या बेसमेंट मध्ये बसले होते. अर्ध्या- एक तासा नंतर स्वप्नील ने बेसमेंट च्या खिडकीच्या बाहेर बघितले.
बाहेरच्या रस्त्यावर धूळ पसरली होती. पण हवे मध्ये धूळ नव्हती. सगळी परिस्थिती पूर्ववत झाली होती. पहिले स्वप्नील हळू-हळू बाहेर आला त्याच्या मागोमाग लक्ष्मी राजश्री ला घेऊन स्वप्नील च्या खांद्याला धरून बाहेर आली.
“आता पुन्हा कुठले विमान असेच कुठल्या टॉवर वर आदळणार नाही ना?” स्वप्नील ने मधेच थांबून लक्ष्मी ला विचारले.
“नाही, सगळ्या फ्लाईट निएर बाय एअरपोर्ट वर लॅन्ड केल्या आहेत. कदाचित रिझवान ची फ्लाईट पण अशीच निएर बाय एअरपोर्ट वर लॅन्ड केली असेल. ती बघ तिथे त्याची गाडी आहे. चल जाऊ या तिथे, तो गाडीतच असेल.” असे म्हणून लक्ष्मी स्वप्नीलचा हात पकडून रिझवानच्या गाडी जवळ आली.
पहिले त्या दोघांनी खिडकीमध्ये डोकावले पण गाडीवर धूळ जमा झाली होती त्यामुळे आत काय झाले ते कळले नाही. नंतर गाडीला वळसा घालून दुसऱ्या बाजूला पहिले, तर तिथे रिझवान धुळीमध्ये बेशुद्ध पडला होता. त्याचे संपूर्ण शरीर धुळीने माखले होते. त्यावेळी रस्त्यावरून भरपूर ऍम्ब्युलन्स फिरत होत्या. स्वप्नील आणि लक्ष्मी ने ऍम्ब्युलन्स मधून रिझवान ला घेऊन गेले.त्यानंतर जे काही घडले त्याचा स्वप्नील, लक्ष्मी आणि रिझवान यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती…!
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’
-कॅप्टन रिझवान अहमद !!
रामदास स्वामींच्या या विधानाला ११ सप्टेंबर २००१ सकाळी दहा वाजे पर्यंत हेच उत्तर होते. त्यानंतर मात्र नियतीने त्याच्या आयुष्यात दुःखाची अशी काही मालिका सुरु केली कि,जर कोणाला स्वतःचे दुःख हलके करायचे असेल तर त्यांनी रिझवान अहमद ला बघावे ! त्याच्या इतका दुर्देवी माणूस जगात दुसरा कोणी नव्हता..!
लक्ष्मी आणि स्वप्नील ने रिझवान ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले, आता त्याच्या कुठल्या नातेवाईकांना इन्फॉर्म करायचे ते माहित नव्हते. म्हणून त्याच्या ऍडमिशन च्या कागद-पत्राचे काम लक्ष्मी आणि स्वप्नील ने त्यांची स्वतःचे नाव घालून पूर्ण केले. पण या ‘चांगल्या कामाचे’ एवढे भयानक फळ मिळेल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती.
‘युनायटेड ९३ न्यूयॉर्क टू सॅनफ्रान्सिस्को’, ज्या फ्लाईट मध्ये रिझवानचे आई-वडील, पत्नी-मुलगा होते ते प्लेन पण हायजॅक झाले होते. लक्ष्मी आणि स्वप्नील हॉस्पिटल मधील TV वर बघत होते, तेव्हा कळले कि ते प्लेन पण बाकीच्या विमाना सारखे हायजॅक झाले पण कुठल्याही बिल्डिंग वर क्रॅश झाले नाही त्या अगोदर एका जंगलात कोसळले. त्या वेळेला एवढीच माहिती मिळाली होती. हा सगळा आतंकवादी हल्ला होता. आशिया मधील तालिबान नावाच्या आतंकवादी संघटनेने हे हल्ले केले होते आणि ओसामा बिन लादेन नावाचा आतंकवादी या हल्ल्याचा मास्टर माईंड होता.
सगळे एकजात मुस्लिम आणि एशियन ! याचीच शिक्षा, रिझवान आणि त्याच्या बरोबर असलेल्या लक्ष्मी आणि स्वप्नील याना भोगावी लागली!
५-६ तासानंतर रिझवान शुद्धीवर आला. डॉक्टरनी त्याला चेक केले आणि त्याला डिस्चार्ज दिला. तो उठून निघत होता तोच समोर पोलीस उभे राहिले. आतंकवादी हल्ल्यातील संशयित म्हणून अटक करण्यासाठी! फक्त त्यालाच नाही तर लक्ष्मी आणि स्वप्नील याना सुद्धा! कारण रिझवान एक मुस्लिम पायलट, शिवाय त्याची फॅमिली हायजॅक केलेल्या प्लेन मध्ये होते. अशा मुस्लिम पायलट कडे लक्ष्मी एक आशियाई ट्रेनिंग ला आली होती आणि तिच्या बरोबर तिचा नवरा पण या हल्ल्यात सामील असेल म्हणून त्याला सुद्धा पोलिसांनी प्रत्येकाच्या हातात बेड्या ठोकून नेले. अमेरिकेत हीच पद्धत आहे. तिथे एखाद्या संशयिताला सुद्धा बेड्या ठोकून नेले जाते मग तो संशयित एखादी महिला असली तरी तिला दया दाखवली जात नाही.
पोलीस स्टेशन मध्ये तिघांना वेग-वेगळे ठेऊन दिवस भर चौकशी करण्यात आली. रात्रीच्या वेळी स्वप्नील आणि रिझवान ला तिथेच कोठडी मध्ये ठेवले. पण लक्ष्मी बरोबर ४ वर्षाच्या राजश्री कडे बघून, पोलिसांनी थोडी दया दाखवली आणि रात्रीच्या वेळी त्या दोघीना हॉटेल मध्ये राहायची परवानगी दिली. त्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवस भर चौकशी ला बोलावले. असे ४ दिवस स्वप्नील आणि लक्ष्मीची कसून चौकशी केली गेली. रिझवान ला ते कुठे घेऊन गेले काहीच कळले नाही. लक्ष्मी,स्वप्नील आणि ४वर्षाच्या राजश्रीच्या पासपोर्ट, विजा ची इंडियन एमबीसी बरोबर चर्चा करून त्याच्या अस्सलतेची खातरजमा करून घेतली गेली. त्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. यामध्ये विनाकारण सगळ्यात जास्त मनस्ताप आणि हाल-हाल झाले ते स्वप्नील चे. लक्ष्मी बरोबर तिची ४ वर्षाची लहान मुलगी राजश्री होती म्हणून रात्रीच्या वेळी हॉटेल मध्ये आणि दुपारी जेवणासाठी बाहेर सोडले जात होते. पण स्वप्नीलला मात्र २४ तास जेल मध्ये ठेवले होते आणि तिथलेच जेवण करायला लावले जात होते.तसेच ४ दिवस कपडे सुद्धा बदलता आले नाही त्याला. त्यामुळे तो मानसिक रित्या पूर्णपणे खचला होता. ४ दिवस नंतर कैदेतून बाहेर पडल्या वर त्याने लक्ष्मी आणि राजश्री ला घेऊन एअरपोर्ट गाठले. लक्ष्मी ने त्याला धीर देण्याचा, सांभाळून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तो राजश्री ला खांद्यावर घेऊन आणि लक्ष्मी चा हात पकडून फ्लाईट च्या दिशेने जोरात धावला. फ्लाईट ने टेक ऑफ घेतल्या नंतर थोडा रिलॅक्स झाला. त्यानंतर त्याने आयुष्यात कधी परदेशी प्रवास केला नाही!
“Hello .Lux madum” रिझवान च्या हाकेने लक्ष्मी वर्तमानकाळात आली.
” Oh, high,how did you get here And since when are you here?”लक्ष्मी ने एक्ससाईट होऊन विचारले.
” हो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन.” रिझवान हे वाक्य मराठी मध्ये बोलला.
लक्ष्मी आणि राजश्री दोघी ऐकून चकित झाल्या,” You are speaking marathi , amazing “
“हो, मी इथे भरपूर भाषा शिकलो आहे.” रिझवान खुर्ची वर बसून म्हणाला,” तुम्ही दोघीच कशा इथे ? स्वप्नील कुठे आहे?”
हे ऐकल्यावर लक्ष्मी आणि राजश्री पुन्हा गंभीर झाल्या,” स्वप्नील आता आमच्यात राहिला नाही. २६ नोव्हेंबर २००८ मुंबई वर झालेल्या हल्ल्यात छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशन वरती झालेल्या गोळीबारात त्याचे निधन झाले.”
“Oh , sorry ,” रिझवान पण नर्व्हस होऊन बोलला.
” पण तुम्ही सांगा तुम्ही कसे काय इथे ?” लक्ष्मी.
“त्या वेळी मला ग्वांटानामो बे मध्ये घेऊन गेले. मी एक मुस्लिम पायलट आणि युनाइटेड ९३ मध्ये माझी फॅमिली होती म्हणून ९/११ च्या हल्ल्यातील मुख्य संशयित म्हणून मला गुंटानामो बे मध्ये बंदी केले होते.”
” गुंटानामो बे ? ते कुठे होते?”राजश्री ने विचारले.
“ग्वांटानामो बे ही क्युबाच्या आग्नेय टोकाला असलेली खाडी आहे. त्यात नेव्हल बेस आहे, जो युनायटेड स्टेट्सचा लष्करी तळ आहे. युनायटेड स्टेट्सने 1903 पासून हा भाग क्युबाकडून करारानुसार भाड्याने घेतला आहे.”
” 3 वर्षांपर्यंत माझा छळ करण्यात आला होता. “रिझवान चे हे वाक्य ऐकल्यावर लक्ष्मी शॉक होऊन मधेच बोलली.
” ३ वर्ष? ते कसे काय?. पण इथे इंडिया मध्ये आल्या नंतर एक महिन्याभरात फ्लाईट ९३ बद्दल बातम्या आल्या होत्या कि ते प्लेन कुठल्याही बिल्डिंग वर कोसळले नव्हते, तर पेनसिल्वानियाच्या जंगलात कोसळले.!फ्लाईट च्या ब्लॅक बॉक्स ने त्यातील पॅसेंजर आणि हायजॅकर बद्दल माहिती मिळाली होती. त्यातील पॅसेंजरनि आपापल्या नातेवाईकांना फोन लावला होता. त्या कॉल चे डिटेल पण डिक्लेर झाले होते. त्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या वडलांमध्ये जो पण संवाद झाला होता त्याचे डिटेल्स मिळाले असतील ना? त्यावरून त्याना समजायला हवे होते कि तुम्ही गुन्हेगार नाहीयेत. तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला ३ वर्षे कसे काय ठेवले?”
” ते काही मला माहित नाही. तीन वर्षे त्यांनी मला कुत्र्या सारखे बांधून ठेवले आणि काही खायला द्यायच्या वेळी लाथ मारून मला खायला देत होते.” रिझवान
“अरे देवा, स्वप्नील ला सुद्धा दुसऱ्या सेल मध्ये ठेवले होते. माझ्या बरोबर राजश्री होती म्हणून मला रात्रीचे हॉटेल मध्ये जाऊ देत होते. पण त्या चार दिवसात स्वप्नील ला त्यांनी एवढा त्रास दिला कि भारतात आल्यावर त्याला सायकॅट्रिस्ट कडे दाखवावे लागले तेव्हा कुठे तो नॉर्मल झाला. मग तुझे तर त्या तीन वर्षात किती हाल झाले असतील? कल्पनाच करवत नाही.” लक्ष्मी डोक्याला हात मारून म्हणाली.
“9/11 हल्ल्यातील एकाही हल्ल्याशी संबंधित पुरावे सरकारला सापडले नाहीत.अखेर तीन वर्षानंतर मला रिलीज केले.तेव्हा मानसिक,शारीरिक आणि आर्थिक रित्या मी पूर्णपणे खचलो होतो.माझी पायलट ची नोकरी सुटली होती.नवीन नोकरी मिळणे शक्य झाले नव्हते. नवीन नोकरीच काय, पण विमान प्रवास करणे अशक्य झाले होते. जर प्रवाशांना कळले कि मी एक मुस्लिम पायलट आहे तर मला बाहेर काढल्या शिवाय ते विमान उड्डाण करू देत नव्हते. माझे घरदार विकले गेले. रोजच्या जेवणाला पैसे नव्हते. कित्येक दिवस-रात्र मी उपाशी पोटी काढल्या.त्याच दिवसात जेल मध्ये माझ्या बरोबर जे कैदी होते त्याच्या संपर्कात मी आलो. त्यांनी एक ग्रुप तयार केला होता. जो काही छळ झाला होता त्याचा बदला घेण्याचे ठरवले होते….
“म्हणजे तो काय आतंकवाद्यांचा ग्रुप होता का ?” राजश्री ने मधेच अडवून विचारले .
” हो,मी त्यांच्या बरोबर जॉईन होण्याचे ठरवले होते. पण माझी अंतरात्मा मला अडवत होती. माझ्या मनावर प्रचंड ताण आला होता. आणि मी रस्त्यातच बेशुद्ध पडलो. तेव्हा काही बौद्ध भिक्षु त्यांच्या मोनास्टरी मध्ये घेऊन गेले त्यांच्या कडे मी काही वेळ विश्रांती घेतली तेव्हा मी त्यांचे प्रवचन ऐकले. त्यानंतर मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी त्या ग्रुप कडे मी जात होतो पण एका चौकात आलो तेव्हा अचानक थबकलो. त्या चौकातला एक रास्ता त्या आतंकवादी ग्रुप कडे जात होता आणि दुसरा रस्ता त्या बौद्ध भिक्षूंच्या मठाकडे जात होता. बराच वेळ विचार केल्या नंतर मी त्या बौद्ध भिक्षूंच्या मोनास्टरी कडे गेलो आणि तेव्हा पासून मी इथेच आहे.”रिझवान.
तेवढ्यात रिझवान ला बोलवायला कोणीतरी आले.
“O . K .” असे म्हणून रिझवान तिथून निघायला लागला. तेवढ्यात लक्ष्मी त्याला म्हणाली .
” Give me your number please .” असे बोलून लक्ष्मी आणि रिझवान एकमेकांचे फोन नंबर save केले. आणि एकमेकांना बाय-बाय करून आपापल्या मार्गाने निघून गेले.
कॅब मध्ये बसल्या नंतर कॅब चालू झाल्या नंतर राजश्री लक्ष्मी ला म्हणाली,”Thank god रिझवान ला त्या चौकात योग्य रस्ता निवडण्याची सुबुद्धी झाली. नाही तर, ओसामा बिन लादेन, हाफिज सईद, यासिन मलिक या आतंकवाद्यांच्या यादीत आणखी एक नवीन नाव जोडले गेले असते- ते म्हणजे – रिझवान अहमद. “
” हो ना, अगदी महावीर सिद्धार्थ गौतम बुद्धांचीच कथा झाली हि! कुठे एके काळी अमेरिकेसारख्या धनाढ्य सुखी नगरात राजपुत्रा सारखा राहणारा रिझवान अहमद आणि कुठे. आता बौद्ध भिक्षु बनलेला रिझवान. पण एक आतंकवादी होण्यापेक्षा कितीतरी चांगले!.”लक्ष्मी.
“चला एकदाचा ,” राजश्री एक मोठा सुस्कारा सोडून बोलली,” १७ वर्षा पासून तुमच्या कडून आणि TV – इंटरनेट वर पाहत असलेल्या ‘११ सप्टेंबर २००१’ च्या कहाणीचा एक सस्पेन्स संपला! मी तुम्हा दोघांच्या तोंडून अनेकदा ९/११ च्या अटॅक बद्दल ऐकताना त्याचा कलायमॅक्स ला एक प्रश्न होता तो म्हणजे- रिझवान अहमद चे काय झाले.? जसे बाहुबलीच्या फर्स्ट पार्ट मध्ये होता-‘ कटप्पाने बाहुबली को क्यों मारा ?’ आज त्याचे उत्तर मिळाले.” एवढे बोलून लक्ष्मी आणि राजश्री हसू लागल्या, आणि इतर विषया वर गप्पा मारू लागल्या ……..
(उत्तरार्ध)