Shopping site/Marathi version

“तर आपल्या कंपनी ने हि नवीन शॉपिंग साईट चालू केली आहे. खास करून गाव-खेड्यातील छोट्या महिला उद्योजकांसाठी आहे. त्यांच्या छोट्या व्यवसायातील उत्पादने देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी दळण-वळणाचे एक साधन आहे. तेव्हा तुमच्या संपर्कात अशीच एखादी गाव-खेड्यातील छोटी महिला उद्योजक असेल तर तिच्या व्यवसायाची पूर्ण माहिती आपल्या साईट वर प्रसिद्ध करा आणि त्या महिले सोबत स्वतःची आणि या कंपनी ची पण उन्नत्ती करा ! ” एवढे बोलून बावकर साहेबानी आपले भाषण संपवले आणि केबिन बाहेर गेले.
पण बावकर साहेबांच्या भाषणातील शेवटच्या वाक्याने-‘त्या महिले सोबत स्वतःची आणि या कंपनी ची पण उन्नत्ती करा !’ दिशा च्या मेंदू मध्ये एक नवीन युक्ती वर क्लिक केले, आणि  त्याने ती उत्तेजित झाली.त्या उत्तेजित कल्पने बरोबर ती पण इतर स्टाफ बरोबर केबिन मधून बाहेर पडली. आणि लगेच मोबाईल वरून तिच्या नवऱ्याला श्रीकांत ला फोन लावला,”शिक्या,तुझी ती तिजगावात विणकाम करणारी सुलु मावशी आठवते का?”
“हो, आठवते पण काही खूप जरुरीचे असेल तर बोल. मी आत्ता एका जरुरीच्या मिटिंग मध्ये आहे.” श्रीकांत.
“ठीक आहे आपण मग संध्याकाळी घरी आल्यावर बोलू.”असे म्हणून दिशा ने पण फोन कट केला.

नंतर दिशाने ऑफिस मधील रोजची कामे संपवली.आणि संध्याकाळी सात वाजता घरी आली. पण श्रीकांत आला नव्हता. फोन केल्या वर ऑफिस मध्ये भरपूर काम असल्यामुळे फोन वर जास्त काही बोलता येणार नव्हते आणि घरी यायला पण कमीत-कमी दोन तास उशीर होईल तेव्हा तू जेवून घे आणि झोपून जा,उद्या बोलू ,असे म्हणाला. हे ऐकून दिशा खूपच निराश झाली. तिला श्रीकांत साठी दोन तास वाट बघत थांबणे म्हणजे दोन दिवसां सारखे वाटत होते.त्या दोन तासात स्वैपाक करून डायनिंग टेबल वर ताटे मांडून वाट बघत होती. पुन्हा एकदा तिने श्रीकांत ला फोन लावला पण तो फोन उचलत नव्हता कदाचित प्रवासात असेल, असे समजून फोन कट करून शांत पणे जेवायला लागली. जेवण झाल्यानंतर, टेबल साफ केले आणि तिचे उष्टे ताट सिंक मध्ये टाकले. श्रीकांत चे जेवण झाकून ठेवले. दहा वाजले तरी श्रीकांत आला नव्हता. दिशाला पण खूप झोप येऊ लागली. त्यामुळे बेड वरती पडल्यावर लगेच तिला झोप लागली.
त्यानंतर रात्री उशिरा श्रीकांत केव्हा घरी आला आणि केव्हा जेवून झोपला दिशाला काही कळलेच नाही. दिशाचे ऑफिस सकाळी लवकर असल्या मुळे तिला पहाटे पाच वाजताच उठावे लागले. तिने शेजारी पहिले तर श्रीकांत तिच्या बाजूला घोरत पडला होता.तिला जाणवलं कि आत्ता श्रीकांत सकाळी आठ वाजे पर्यंत उठणार नाही आणि तो पर्यंत दिशा तयार होऊन ऑफिस ला जात असते. म्हणजे आता सुद्धा श्रीकांतशी बोलता येणार नाही. मग तिने ठरवलं कि आत्ता कसेही करून श्रीकांतला उठवूया आणि त्याच्याशी बोलूया.

” शिक्या, उठ,” दिशा श्रीकांतला हलवून म्हणाली.
” काय ग झोपू दे ना, मी काल रात्री खूप उशिरा झोपलो. आत्ता झोपू दे ना,” श्रीकांत वैतागून दुसऱ्या बाजूला वळून झोपून बोलला .
“शिक्या उठ ना, अरे एकदा माझे ऐकून घे आणि नंतर झोप”,पण श्रीकांत हे ऐकायच्या अगोदर पुन्हा गाढ झोपला आणि घोरायला लागला.
हे बघून दिशाला खुप राग आला. तीने बाजूला ग्लास मध्ये ठेवलेले पाणी श्रीकांत च्या तोंडावर ओतले. त्याने श्रीकांत लगेच जोरात ओरडून उठला.
” काय ग तू पण, संगितले ना रात्री उशिरा झोपलो होतो. आता झोपू पण नाही देत. ” श्रीकांत चादरी ने चेहरा पुसत ओरडला,”हां,बोल आता काय बोलायचे ते. झोप उडाली माझी.”
“अरे,तुझी ती तिजगावात विणकाम करणारी सुलु मावशी साडी वर सुरेख भरतकाम,करणारी, आठवते का तुला ? “दिशा गरम-गरम चहाचा कप श्रीकांत च्या हातात देत म्हणाली.
श्रीकांत मोठी जाम्भई देऊन,आणि चहाचा कप हातात घेऊन म्हणाला,”हां आठवते ग बाई,काल दुपारी फोन वर पण तू हेच म्हणाली होतीस. आता पुढचे बोल.”
” हां, तर तिच्या कडे आपण दोघेही परवा रविवारी जाऊ या.” दिशा.

“सुलु मावशी कडे ? आणि ते पण परवा रविवारी ?”श्रीकांत आश्चर्याने जोरात ओरडला,”अग ऑफिस मध्ये केवढे काम आहे. मला तर या रविवारी पण जावे लागणार आहे. आणि तिच्या त्या तिजगावला जायला ३ तास लागतील आणि परत येताना पण तेवढाच वेळ लागेल. रविवारची पूर्ण सुट्टी त्यातच वाया जाईल.”

“अरे आपण कॅब करू तिथे जायला, त्याने कमी वेळात पोहोचू आपण तिथे.”दिशा.
” मी तुला आता कॅब ने पोहोचण्याचा टाइम सांगितला आहे. बस ने किंवा ट्रेन ने जायला तर दोन दिवस लागतिल.”श्रीकांत.
“ठीक आहे, आपण सकाळी ४वाजता कॅब ने निघू. तू आणि मी कॅब मध्ये सकाळची झोप काढू. ४ वाजता निघाल्यावर आपण सुलु मावशीच्या घरी ७ वाजता पोहोचू ८वाजता त्याच कॅब ने मुंबईत परत येऊ.तेव्हा ११ वाजले असतील. त्यानंतर तू ऑफिस ला जाऊ शकतोस.”

” अग पण तुला सुलु मावशी कडे एवढे काय काम आहे? कोरोना काळात तिचा नवरा आणि मुलगा वारल्या मुळे ती खूप एकटी झाली आहे. तिला एकटे पणाचा खूप त्रास होतो. एकदा आपण तिच्या कडे गेलो तर ती आपल्याला लवकर सोडणार नाही. आणि मला पण ऑफिसला जाता येणार नाही.” श्रीकांत.


“हो माहित आहे.एकटी झाल्या मुळे दिवसभर ती साड्यांवर आणि ड्रेस मटेरियल वर भरत काम करीत असते. आमच्या ऑफिस ने शॉपिंग साईट सुरु केली आहे. तिने भरत काम केलेल्या साड्या आणि कपडे जर ऑनलाईन विकायला ठेवले तर आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो आणि तुझ्या कडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ?,”दिशा.
“फक्त एक लँडलाईन नंबर आहे. त्यावरून तिचेच दिवसातून दहा वेळा मिस कॉल येत असतात. तिने दहा वेळा कॉल केल्या नंतर मी एखादा तिचा इनकमिंग कॉल घेत असतो. त्यावर ती सारखी मला तिच्या घरी बोलवत असते. तिला एकटेपणाचा खूप त्रास होतो. जर का मी तिला भेटायला गेलो तर तिला तिचाच मुलगा घरी आल्या सारखे वाटेल. आणि बरेचदा रडायाला लागते. आत्ता जर तिच्या घरी गेलो तर ती लवकर सोडणार नाही.”श्रीकांत.
” तू टेन्शन घेऊ नकोस त्याचे. आपण सकाळी ४ वाजता निघूया. मग आपण बरोबर ७ वाजता तेथे पोहोचू . आणि त्या नंतर बोरोबर एक तासात आपण निघूया . तू मला तिचा फोन नंबर दे मीच तिला फोन करते.” असे म्हणून दिशा स्वतःचा आणि श्रीकांत चा फोन हातात घेऊन बघू लागली.

श्रीकांत च्या फोन मधून सुलु मावशीचा फोन घेतल्या नंतर दिशा ने श्रीकांत ला झोपायला सांगितले. आणि स्वतः लगेच सुलु मावशीला फोन लावला पण पलीकडून बेल रिंग होत होती. त्या नंतर दिवसभर दिशा सुलु मावशीला फोन करत होती पण समोरून काहीच उत्तर येत नव्हते नुसती बेल वाजत होती. म्हणून श्रीकांत ला फोन लावून पुन्हा त्याच्या कडून नंबर घेऊन पुन्हा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.
श्रीकांत सुद्धा त्याच्या मोबाईल वरून सुलु मावशीला फोन करत होता पण त्याला सुद्धा तिला संपर्क करता आला नाही. त्यानंतर शनिवारी सुद्धा दोघांनी असाच प्रयत्न केला पण सुलु मावशी च्या फोन ची नुसती बेल वाजत होती. त्यामुळे दोघांनाही टेन्शन आले. शिवाय एका सुलु मावशीच्या लँडलाईन नंबर शिवाय श्रीकांत कडे दुसरा कोणाचा नंबर नव्हता. पूर्वी तिच्या मुलाचा आणि नवऱ्याचा फोन नंबर होता पण करोना मध्ये त्यांचे निधन झाल्या नंतर त्याचा नंबर बंद झाला होता. आणि श्रीकांत ने पण तिच्या संपर्का साठी दुसरा नंबर घेतला नाही. याचा आता श्रीकांत ला खूप पश्चात्ताप होत होता. त्यामुळे त्याने सुद्धा ठरवून टाकले कि आता या रविवारी कसेही करून सुलु मावशीला भेटायला जायचे.
अखेर रविवारी सकाळी सात वाजता दोघेही सुलु मावशीकडे पोहोचले. सुलु मावशी नुकतीच आंघोळ करून बाहेर तुळशीला पाणी घालत होती. तिला सुखरूप बघून श्रीकांत चा जीव भांड्यात पडला! त्याने लगेच “सुलु मावशी”, अशी जोरात हाक मारली.
श्रीकांत ची हाक ऐकल्यावर सुलु मावशीच्या हातून पाण्याचा तांब्या पडला तिने पळत जाऊन श्रीकांत ला मिठी मारली.
” अग, काय हे सुलु मावशी ? रोज मला तू १० वेळा फोन करायची पण आत्ता गेले २दिवस मी आणि दिशा दोघेही तुला फोन लावतो तर तुझ्या फोन ची बेल वाजत आहे.” श्रीकांत अलगद, तिची मिठी सोडून म्हणाला.
” हो ना सुलु मावशी, मी पण तुम्हाला फोन करत होते. पण नुसती बेल वाजत होती,” असे बोलून दिशा ने सुलु मावशी ला वाकून नमस्कार केला.
” अग , माझा तर फोन बंद झाला आहे. फोन च्या ऑफिस मध्ये तक्रार केली होती पण हि सरकारी कारभारातील माणसे कुठे लवकर येतात ?” सुलु मावशी दिशाच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाली. “चला, लवकर आत या, सकाळचा नाश्ता करू या. आत्ता सकाळी प्रवासात तुम्हाला काही खाताआले नसेल.”
सुलु मावशी ने लगेच गरम-गरम कांदेपोहे बनवून दिशा आणि श्रीकांत ला दिले.
“वाव यम्मी , बर का दिशा माझी सुलु मावशी स्वैपाक पण चांगला बनवते.  तिने बनवलेल्या डिशेश तू तुझ्या शॉपिंग साईट वर दाखव, त्याची पण तुला चांगली ऑर्डर मिळेल.”श्रीकांत पोहे खात-खात म्हणाला.
“हो नक्कीच,”दिशा एक चमचा पोह्यांचा खाऊन पुढे बोलली,”सुलु मावशी, तुम्ही छान भरतकाम करत असतात ना ? मला बघायचे आहे दाखवा.”
” हो,आता दिवस भर मला काही जास्त काम नसते म्हणून वेळ घालवण्यासाठी कपड्यांवर भरतकाम करत असते,” असे बोलून सुलु मावशीने एक अवजड पत्र्याची मोठी पेटी सरकवून खेचत आणून दिशा आणि श्रीकांत समोर उघडली. पेटी मधील भरतकाम केलेले कपडे बघून तर दिशाला मोठा खजिनाच मिळाला !
“वाव, किती सुंदर आहे हि एम्ब्रॉयडरी !”, असे म्हणून दिशा ने लगेच मोबाईल फोन मधून फोटो घेऊ लागली आणि त्याचे फोटो तिच्या शॉपिंग साईट वर अपलोड केले.
” मावशी, हि एम्ब्रॉयडरी केलेली साडी मला खूपच आवडली हि मी घेऊ ?” दिशा साडी आपल्या खांद्या वर घेऊन आरशा मध्ये बघून म्हणाली.
” हो , अग हि एक साडीच कशाला ? मी भरतकाम केलेल्या ओढण्या, हातरुमाल पण आहेत हे पण घेऊन जा. असे शंभर-दोनशे कपडे या पेटी मध्ये पडले आहेत सगळे घेऊन जा.” सुलु मावशी दिशांच्या दुसऱ्या खांद्यावर ओढणी टाकत म्हणाली.
“अय्या खरंच ! पैसे किती घेणार ?” असे बोलून दिशा ने मोबाईल वर तिच्या शॉपिंग साईट वर दहा हजारांची विक्री झालेली श्रीकांत ला दाखवली.
” काही तरीच काय, आपल्या माणसांकडून कोणी पैसे घेत का. हे सगळे कपडे माझ्या कडून छोटीशी भेट आहे, तुझ्या साठी!” सुलु.
” अरे वा, खूपच छान.” असे बोलून दिशाने बाहेरून कॅब ड्राइवर ला बोलावले.
श्रीकांतला, दिशा चे हे स्वार्थी वागणे बघून खूपच राग आला. पण दिशा मात्र त्याच्या कडे दुर्लक्ष करून आणि कॅब ड्राइवर च्या मदतीने ती ट्रंक कॅब च्या डिक्की मध्ये ठेवायला गेली आणि श्रीकांत तिच्या कडे हताश पणे बघत राहील.
काही क्षणात भानावर येऊन, श्रीकांत सुलु मावशीला म्हणाला,” मावशी, हे बघ मी तुझ्या साठी काय आणले आहे ते.”
“काय ते ?” असे बोलून,” सुलु मावशी ने श्रीकांत ने दिलेला बॉक्स उघडून बघितला.”मोबाईल? अरे मला हा आजिबात वापरता येत नाही.”
“कसा वापरायचे हे मी तुला आत्ताच दाखवतो. यात मी सिम कार्ड घातले आहे आणि या गावात नेटवर्क पण चांगले आहे. तेव्हा या फोन वरून तू मला केव्हा हि विडिओ कॉल करू शकतेस. आणि जर तू या फोन वरून मला विडिओ कॉल केलास तरच मी तुझ्याशी बोलेन. नाही तर मी बोलणार नाही.” असे बोलून श्रीकांत ने मोबाईल मध्ये सिम कार्ड टाकले.
तेवढ्यात दिशा तिथे आली आणि म्हणाली,” हो मावशी, आता आम्ही निघतो आणि या फोनवर तुम्हाला विडिओ कॉल करू.तो तुम्ही घ्यायचा आणि त्यावरून बोलायचे.”
” एवढ्या लवकर ! तुम्ही येऊन फक्त एक तास झाला आणि तुम्ही लगेच निघालात?” सुलु मावशी.
” हो मावशी , श्रीकांत ला ऑफिस मध्ये खूप काम आहे. आत्ता निघालो तर अकरा वाजे पर्यंत पोहोचू.” दिशा श्रीकांत चा हात पकडून म्हणाली.
” पण, निदान दुपारचे जेवण करून जा. ” सुलु मावशी दिशांच्या खांद्यावर हात ठेवून विनवणी करू लागली.
“मावशी , श्रीकांत ला ऑफिस मध्ये खूप काम आहे आज आम्हाला जमणार नाही. आम्ही गाडी मधून तुम्हाला विडिओ कॉल करू. विडिओ कॉल मध्ये असे वाटेल कि आपण समोर बसून गप्पा मारत आहोत.” दिशा श्रीकांत च्या हाताला पकडून ओढत म्हणाली.
“अरे श्रीकांत, थांब ना रे. मी अर्ध्या तासात स्वैपाक बनवते. तुला मी बनवलेली आमटी खूप आवडते ना.” सुलु मावशी श्रीकांत ची विनवणी करू लागली.
” श्रीकांत चल, आठ वाजून गेले. आता निघालो नाही तर उशीर होईल,” असे बोलून दिशा श्रीकांत च्या हाताला पकडून ओढत घेऊन जाऊ लागली.
तेवढ्यात श्रीकांत ने दिशा चा हात झटकला आणि जोरात ओरडला, “चूप, मी नाही निघणार एवढ्यात. आज मी इथे जेवूनच निघेन.”
हे ऐकून सुलु मावशी चा चेहरा आनंदाने खुलला,” बसा तुम्ही दोघे. मी आत्ताच स्वैपाकाला लागते.” आणि पदर खोचून सुलु मावशी स्वैपाक घरात गेली. श्रीकांत तिची ती लगबग कौतुकाने बघू लागला. आणि दिशा उदास चेहऱ्याने खुर्ची वर बसली.

समाप्त

 

Related posts

Leave a Comment