FARMHOUSE short Story Genre-Drama of Misunderstanding Themes-morality playground ko hindi mein kya bolate hain

                                                  

                 भीमा शंकर च्या समोर शहरांच्या सर्व गर्दी गडबड गोंधळापासून दूर एका घरा बाहेरच्या  अंगणात २५/३० वर्षाचे /6 युवक  क्रिकेट  खेळण्यात दंग आहे. मुंबई मध्ये एका  बंगलेवजा घराच्या बाहेर एवढे मोठे अंगण कुठे मिळणार ? अशा अंगणात क्रिकेट खेळण्याची मजाच वेगळी. त्यामुळे सर्वेशसचिन  आणि त्यांच्या बरोबर सामील झालेला त्यांचा नवा  मित्रतिथलाच रहिवासी  रामा  सगळे आपले वय आपले रोजचे धावपळीचे जीवन विसरून त्या क्षणांचे आनंद घेत होते.

                तर  घराच्या  आतमध्ये  हॉल मध्ये. त्या घराचे स्वामी ज्यांनी ६० वर्षाच्या नोकरीतून सेवानिवृत्ती वेतनातून हे घर उभारले ते विनायक,त्यांचे चार वर्षांनी लहान त्यांचे सक्खे भाऊ  अरविंद, घराची वास्तुशांत करण्यात बिझी आहेत. थोड्याच वेळात वास्तुशांतीची  पूजा आटोपली.   

            अरविंद,”पूजा संपली मंत्र जप, आणि आरती,प्रसादाच्या सुवासाने तुझे हे रिटायर्ड होम कसे पवित्र झाले आहे  पण  आजून  तुझी लाडकी मुलगी  शिवानी  आलेली  नाही.”

           “येईल थोड्या वेळात, मघाशीच फोन केला होता म्हणाली कि वाटेतच आहे.” विनायक, हॉल मधील उपस्थित पाहुण्यांना प्रसाद वाटत दरवाजाच्या बाहेर येत बोलला, “तो पर्यंत तुझे लाडके सचिन, नितीन आणि माझा बाळ्या सर्वेशरामा  बास झाले तुमचे क्रिकेट. लवकर  आत  या आणि पूजेचा प्रसाद घ्या.”

प्रसाद  घेतल्या नंतर सचिन बोलला,” काका  कालच दुबई शॉपिंग फेस्टिवल वरून आलेलो आहे. मी आणि नितीन ने  तुमच्या साठी गिफ्ट आणलेली आहे. हे घ्या.”

विनायक ,” आरे  वाह, बघू या काय आहे ते.” बॉक्स उघडून बघितल्या वर विनायक,” आरे  व्वाह दुर्बीण. खूप उपयोगी आणि चांगले गिफ्ट आहे. आणि या दुर्बिणीने मी समोरच  भीमा शंकरचा धबधबा किती जवळून बघू शकतो. आणि हे काय आहे?”असे म्हणून विनायक  ने दुसरे गिफ्ट ओपन करून बघितले.”विनायक,”आरे  हे काय आणखी एक फ़ोन? काय आहे या फ़ोन  मध्ये विशेष?”

सचिन ,” आहो  काका या  फ़ोन मध्ये विशेष  म्हणजे  तुम्ही  विडिओ कॉल रेकॉर्ड करून  सेव्ह  करू शकता“.

                  असे  म्हणून  सचिन ने  फोन  मध्ये  विनायक  च्या जुन्या  फोन  मधून  सिम  कार्ड  काढून  नवीन  फोन  मध्ये  भरले. आणि  कार्ड  भरल्या  वर  लगेच  त्या मध्ये  शिवानी चा इनकमिंग व्हिडीओ  कॉल  येतो

सचिन, “हे
बघा कार्ड घातल्या  बरोबर शिवानी चा विडिओ  कॉल  आलाचला आपण आता हा  रेकॉर्डिंग   करू  या.”

        व्हिडीओ मध्ये दिसतेशिवानी गावा बाहेरच्या रस्त्या वर तिच्या गाडी बरोबर उभी असते.शिवानी,  “हॅलो, बाबा मला वाटते कि मी रस्ता चुकले. हा बघा (विडिओ वरून मागचा रस्ता दाखवून) या रस्त्यावरून  मी आले आहें. इथे नुसता मागून आणि  पुढून सरळच्या सरळ जात आहे. कुठे घर नाही. किंवा दुकाने नाही  आहेत. कि कोणाला काही विचारता येईल. आणि गूगल मॅप चा पण काही उपयोग होत नाहीये !”

     इथे विनायकाच्या घरी हॉल मध्ये. विनायक, अरविंद, सचिन, नितीन, सर्वेश आणि रामा.सगळे विडिओ  कॉल वरून बोलत असतात..

        विनायक,”हो, मग त्याच रस्त्यावरून सरळसरळ गाडी ड्राईव्ह करत ये .

       ” पण, बाबा किती वेळ ?” शिवानी विडिओ कॉल मधून रिप्लाय करते.

         तेवढ्यात सर्वेश  विनायकाच्या विडिओ कॉल वर मधेच येऊन बोलला ,” शिवानी,तेवढ्याच साठी मी तुला सांगितले होते कि आमच्या बरोबर चल,पण तुला जॉब महत्वाचा आहे ना ! तेवढ्या साठी स्वत: एकटी एवढी मोठी फोर व्हिलर घेऊन त्या निर्जन रस्त्या वर एकटीच ड्राईव्ह करून येत आहेस. चुकलीस ना रास्ता ? आता भोग आपल्या कर्माची फळ .”

      शिवानी,”दादा,
मला आत्ता बोलू नकोस, मला रस्ता दाखव. इथे रस्त्याच्या दोनही बाजूला निवडुंगाची झाडे
आहेत आणि त्याच्या पलीकडे उजाड माळरान आहे. एखादे झाड पण नाही आहे. आणि इथे बघ शेण
पडलाय ईईईई.”                 


सर्वेश,”तू विडिओ वरून आजू बाजूचा परिसर दाखव. हा रामा नावाचा मुलगा इथेच
राहणारा लोकल आहे. तो तुला सांगू शकेल तू कुठे अडकलेली आहेस.”


” o k “, बोलून शिवानी व्हिडीओ वरून आजू-बाजूचा परिसर दाखवू लागते.
रामा, सर्वेश आणि घरातील प्रत्येक जण व्हिडीओ बघायला लागतात. पण अचानक व्हिडीओ मध्ये
शिवानीच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागतो.  त्यामुळे
घरातील प्रत्येक जण गोंधळून जातो. त्यांना विडिओ मध्ये शिवानी कुठेही दिसत नाही फक्त
तिचा जिवाच्या आकांताने जोरात ओरडण्याचा आवाज
ऐकायला येतो. आणि व्हिडीओ मध्ये समोर फक्त शेत आणि रस्ता दिसत होता.


विनायक आणि सर्वेश दोघे मिळून जोरात ओरडतात,” शिवानी, शिवानीईई काय झाले?”

      अरविंद,”हे
देवा! काही कळत नाही. कुठे आहे ती?  तिच्या
ओरडण्याचा आवाज ऐकायला येतोय. ती तर कुठेही दिसत नाही.”

    तेवढ्यात
सर्वेश ला विडिओ कॉल मध्ये आणखी काही तरी घडताना दिसते ते बघताना तो एकदम शॉक होऊन
बोलतो…,” बाबा, हे  बघा शिवानी ला तीन
गुंडे उचलून नेत आहेत ! सचिन, हा विडिओ कॉल रेकॉर्ड झाला आहे ना?”

       सचिन,”हो
विडिओ कॉल चालू झाला तेव्हाच मी रेकॉर्डिंग वर टाकला होता.”

       सर्वेश लगेच तो फोन ज्या  वर
विडिओ कॉल चालू असतो तो बाबांच्या हातात देतो आणि त्यांना सांगितले,” बाबा  तुम्ही काकांना घेऊन पोलीस  स्टेशन ला जा. मी, सचिन,नितीन,आणि या फार्महाउस चा केअरटेकर रामा ला घेऊन शिवानी ला शोधायला  जातो.नितीन, तू आणलेली नवीन दुर्बीण बरोबर घेऊन चल  आणि सचिन तू आपले स्टंप आणि बॅट घेऊन चल.

विनायक,” ते
कशाला?”

सर्वेश,” बाबा, तीन गुंडानी शिवानी ला उचलून  नेले आहे. तिला  सोडवताना  मारामारी  करावी लागेल.”

विनायक,”पण तू  पहिले फ़ोन करून मला कळव. आणि   शक्यतो कोणाला जखमी करू नको.”

सर्वेश,”ठीक आहे पण तुम्ही लवकर पोलीस स्टेशन ला जाऊन पोलिसांना  घेऊन या.”

       सर्वेश,सचिन, रामा  आणि नितीन एका ओपन जीप मध्ये बसून निघतात आणि त्यांच्या मागोमाग  विनायक त्यांच्या भावाबरोअबर दुसऱ्या गाडीतुन  निघतात.

        गावातल्या  एका  रस्त्यावरून त्यांची जीप जात असतानासर्वेश ड्रायविंग करत होता, सचिन दुर्बिणी मधून  बघत  होता. तेवढ्यात त्याला दिसले जवळजवळ ५०  फुटाच्या अंतरावर 3 पुरुष जमिनी  वर  एका  मुलीच्या आजूबाजूला  होते.

        सचिन,”सर्वेश, तिथे बघ तीन पुरुष दिसत आहे. तिथेच असेल.”

        सर्वेश,”नितीन तू आत्ताच्या आत्ता बाबाना विडिओ कॉल कर. ते आत्ता पर्यंत पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले असतील. रामा ,तू पण या एरिया ची माहिती सांग.”

          असे  बोलून  सर्वेश  त्याच्या  जीप  चा  स्पीड  वाढवून आणखी स्पीड ने त्या ठिकाणी निघतो. याच दरम्यान  सचिन  दुर्बिणी मधून  सारखी  नजर  ठेऊन  त्याला  दिसणारी  बारीक  सारीक
माहिती देतो.

         सचिन,”त्या तिघां मधला  एक   जण
 शिवानी च्या पायाला चावत आहे. आणि  दुसरा तिच्या साडीचा पदर फाडतोय आणि  तिसऱ्याने  तिच्या दोनही  हाताला पकडून ठेवले आहे. शिवानी  खूप तडफडत आहे. आणि  आत्ता  ज्याने  तिचा  साडीचा  पदर  फाडला  त्याने  तिच्या  पायाला बांधलाआता ते तिला उचलून  नेत
आहेत.सर्वेश,गाडी लवकर पाळावं. ते तिघंही शिवानी ला तिच्याच गाडीत टाकत  आहेत. सर्वेश लवकर ते तिघे पण गाडीत बसले आणि गाडी  घेऊन चालले आहेत.”

           रामा,” साहेब, मी  तुम्हाला  दुसरा  रस्ता  दाखवतो
त्या रस्त्याने गेलात तर तुम्ही त्या गाडीच्या समोर जाल  आणि  त्या गाडीला अडवाल.”

          सचिन  मग  रामा ने सांगितल्या प्रमाणे वेगाने गाडी चालवू  लागला. आणि  थोड्याच वेळात त्यांची  गाडी शिवानी च्या गाडी समोर उभी राहिली. आणि शिवानी च्या गाडीतला ड्राइवर च्या सीट वर बसलेला  मुलगा जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली.

          सर्वेश,नितीन,सचिन, रामा, क्रिकेट ची  बॅट आणि  स्टंप हातात घेऊन  उतरले, आणि  शिवानी  च्या  गाडीतून  त्या  तिघांना बाहेर खेचून काढून  स्टंप  ने  आणि  बॅट ने  मारायला  लागले. ते  तिघेही सर्वेश  ला  काही  तरी  सांगण्याचा  प्रयत्न  करत  असतात  पण कोणीही  काही  ऐकत  नाही  आणि  ते  त्याला  बदडायला  लागले.

           तेवढ्यात  तिथे  पोलीस  आले. पोलिसांनी   एकएक  जणांना मारामारी  करण्या पासून  अडवले. नंतर त्यांनी  गाडी  मध्ये  बघितले. तिथे  मागच्या  सीट  वर  शिवानी  बेशुद्धा  अवषेत  पडलेली  होती.त्या तिघांना  बेड्या  ठोकून गाडीत ढकलले, आणि शिवानीला एक लेडी कॉन्स्टेबल  विनायक, सचिन  आणि  नितीन  तिच्या  कार  मधून  हॉस्पिटल  मध्ये   घेऊन  गेलेया सगळ्याचे  रामा आपल्या फोन कॅमेरा मध्ये शूटिंग  करून  त्याचा  विडिओ  व्हायरल  केला.

मीडिया रिपोर्टर, न्यूज चॅनेल  मधून, व्हायरल  विडिओ  tv  वरून  दाखवला गेला. आणि त्याचाही . न्यूज  विविध  न्यूज  चॅनेल  वरून  वेगवेगळ्या लोकेशन  वरून  tv वर  टेलिकास्ट  झाली.

         मीडिया  रेवोर्टेर,” आज  नेरळ पोलिसांच्या   तत्परते  मुळे एक  तरुणी  तीन  गुंडांच्या  वासनेला  बळी पडायच्या आगोदर वाचलीएका  तरुणीला  तीन  गुंडांच्या  तावडीतून  सोडवून  तिच्या  वडील  आणि  भावाच्या ताब्यात  दिले. नेरळ  पोलिसाच्या  या  कर्तव्य  दक्षतेला  झी  मीडिया  चा  सलाम.”

               पोलीस कोठडी मध्ये पोलीस त्या तिघांना बदडून  बदडून  चौकशी करू  लागले.

पोलिसांनी एकाला   बांबू  ने फटका मारून विचारले,” काय  नाव आहे रे  तुझे?”

                                       ” शिवा

नंतर पोलिसांनी  दुसऱ्याला  फटका  मारून विचारले,” आणि तुझे?”

                                      “गणेश

पोलिसांनी तिसऱ्याला
फाटकावले,” तुझे?”

                                  “योगेश

             तिघेही  एक्दम   मार  खात  खात वेदनेने  विव्हळून म्हणतात,” साहेब, विश्वास ठेवा  आम्ही त्या  बाई  बरोबर  असे काही  पण  केले  नाही.”


पोलीस पुन्हा तिघांना  फाटकावून  म्हणाले,”गप  बसा. तुमच्या  वर  आता attempt of rape चा चार्ज   लागणार. आमच्या कडे  तसे  पुरावे आहेत. शिवानी ला  शोधायला  आलेल्या  तिच्या भावानी तिच्या  वडिलांनाविडिओ  कॉल लावला  होता  तेव्हा  तिचे  वडील  आमच्या  पोलीस  स्टेशन मध्ये  होतेत्यामध्ये आम्ही पहिले आहे. तू , योगेश, त्या  बाईंच्या  पायाला चावत होता.आणि  तू…,गणेश  त्या  बाईंची  साडी  फाडून  तिचे  पाय  बांधत  होता. आणि  या शिवा  ने  तिचे  हात धरले होते. बोला खरे  आहे  ना?

             तिघे हि एक्दम म्हणाले,” हो, साहेब  आम्हि  असे  केले  होते  पण  साहेब आम्ही कशा साठी केले  होते  ते  तरी ऐका.”

            पोलीस  पुन्हा  फटके  मारून ,”चूप बसा! तुमच्या  वर  आत्ता  attempt
of rape
चा           Nonbailable  चार्ज  लागणार  आहे. कमीतकमी तीन महिने तुम्हाला जेल मध्ये  जावे लागणार.

            शिवा/गणेश/योगेश,”साहेब, असे  करू  नका  आमचे  ऐकून  घ्या. आम्हाला दुबई  मध्ये नोकरी   मिळाली  आहे. उद्या आम्ही  तिघेही मुंबईला जाणार आहोत कारण आमची उद्याची  फ्लाईट आहे.आमच्या  आयुष्याचे  असे  वाटोळे करू  नका. तुम्ही त्या  बाई  ना  विचारा. त्या  तुम्हाला  खरे  काय ते सांगतील.”

           पोलीस,”त्या बाई हॉस्पिटल मध्ये आहेत बेशुद्धा आहे. त्यांच्या वर  ट्रीटमेंट  चालू  आहे.”                 अशीच मार खाऊन त्या तिघांची  संपूर्ण रात्र तुरुंगात संपते. दुसऱ्या  दिवशी  सकाळी  पोलीस स्टेशन मध्ये विनायक एका महिला हवालदारा  बरोबर  आला.

          विनायक,”साहेब या तिघां  विरुद्ध  जी  कंप्लेंट  केली  आहे ती मी मागे घेत आहे. त्यांना आत्ताच्या   आत्ता सोडून द्या. आमचा  खूप  मोठा गैरसमज झाला  होता. आत्ताच माझी  मुलगी शुद्धीवर आली. आणि  शुद्धी वर आल्या वर  तिने  या महिला कॉन्स्टेबल ला आपली साक्ष दिली.”

             लेडी कॉन्स्टेबल,”हो साहेब, यांची मुलगी आता शुद्धीवर आली आहे. आणि आता ती आऊट ऑफ डेन्जर  आहे. आज  दुपार  पर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल. तिने तिची लेखी साक्ष दिली आहे आणि  त्याबरोबर  या  सर्वाना  लगेच सोडून द्यावे हि विनंती केली.’

             पोलिसानी   सगळी लेखी साक्ष  वाचली आणि जेल चा दरवाजा उघडून त्या तिघांना सोडून दिले. ते  तिघेही जखमी अवस्थेत लंगडत, हातावरच्या आणि  डोक्या  वरच्या जखमा धरून पोलीस स्टेशन च्या बाहेर  येतात.

      बाहेर आल्या वर , त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो! तिथे शिवानी व्हील  चेअर वर पायाला बँडेज केलेल्या अवस्थेत असते त्याबरोबर तिचे भाऊ, सर्वेश, नितीन, सचिन, मान  खाली घालून उभे असतात आणि काही  रिपोर्टर, कॅमेरामन  पण असतात

             विनायक , गणेश, योगेश आणि शिव याना आधार देत प्रेस वाल्यांसमोर उभे करतो.

              काही वेळातच शिवानी प्रेस वाल्यांशी बोलायला सुरुवात करते,” काल या  तिघां मुळे माझा जीव वाचला आणि त्याबदल्यात  या  तिघांना  मोठी  बदनामी  आणि  पोलिसाची  मारहाण सहन करावी लागली. त्याबद्दल  ‘सॉरी’, आत्ता  मीडिया  आणि  प्रेस  कडून  मी  तुमची  बाजू  दुनिये  समोर  मांडणार  आहे. काल, बाबांच्या  फार्महाउस  वर  जात  असताना  मी रस्ता  चुकले  म्हणून  मी  बाबाना  विडिओ  कॉल  लावला  आणि  त्यांना  आजू  बाजूचा  परिसर   दाखवत  होते. तेव्हा  खाली शेण पडले होते म्हणून मी माझी साडी  वरती घेतलीतेवढ्यात   झाडीतून   एक  मोठा  साप  बाहेर  आला  आणि त्याने माझ्या पायाला डंख मारला. त्यामुळे असहाय्य वेदनेने मी ओरडायला  लागले. तेव्हाच माझ्या हातातून  माझा फोन, ज्याच्या वर  व्हिडीओ कॉल  चालू होता, तो माझ्या हातातून निसटून एका निवडुंगाच्या झाडावर पडला आणि त्याच्या  दोन खोडांमध्ये अडकलात्याच  वेळी  रस्त्या  वरून हे तिघे जात होते. त्यांनी मला वेदनेने  तरफडत असताना पाहिले. या  तिघांनी मला उचलून  बाजूला  नेले  तेव्हाच मोबाईल च्या विडिओ कॅमेरा वर ते शूट  झाले, आणि त्यामुळे माझ्या बाबांचा आणि भावाचा गैरसमज झाला होता.

                 यातील एकाने माझ्या  पायातले  विष तोंडाने ,दाताने  चावूनचावून बाहेर  काढले. आणि   गणेशने   विष  पसरू  नये  म्हणून माझ्या साडीचा पदर फाडून माझ्या  पायाला घट्ट  बांधला. आणि या  तिसऱ्याने, म्हणजे  योगेश  ने  खांदे  पकडले  होतेनंतर  त्या   तिघांनी मला  उचलून  माझ्या  गाडीतून  हॉस्पिटल  मध्ये नेले.”

     शिवानीला मध्येच थांबवून सर्वेश म्हणाला,” पण  हे  सगळें चालू  असताना आमची  जीप त्यांच्या  दिशेने  जात होती, त्यामुळे आमचा पक्का समज झाला कि हे तिघेही माझ्या बहिणीचे वाईट करण्या साठी घेऊन जात आहेत, म्हणूनच विरुद्ध दिशेने गाडी नेऊन त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारले.”

               शिवानी,” मी  पण  तेव्हा  बेशुद्ध  होते  कोणालाही काहीच सांगू शकले नाही आणि मोठा  गैरसमज  झाला. त्यामध्ये  मी  कोणालाही  दोष  देत  नाहीयेपोलिसाचे पण  काही  चुकले नाही त्यांनी  आपली ड्युटी  चोख   बजावली.”

            शिवा, गणेश आणि  योगेश  यांच्या  हातात एक  एक  पाकिटे  देऊन विनायक बोलला,” तुमची  आज  रात्रीची दुबईची फ्लाईट आहे, असे  कळले. या  पाकीटा  मध्ये  तुमची  दुबईची  तिकिटे  आणि  थोडे  पैसे  आहे. थोड्या  वेळानी  आमची  गाडी  तुम्हाला  मुंबई  इंटरनॅशनल  एअरपोर्ट  ला  सोडेल. त्या  अगोदर  डॉक्टर कडून तुमच्या  जखमांवर  उपचार  केले  जातील.”

            तिघांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते तिघेही  विनायकाच्या  पाया पडतात.

            ” काल  मोठ्या  गैर  समजुतीला  बळी पडून  तुम्हाला  जनावरां  सारखे  बदडले  त्याबद्दल माफ करा,” खाली मान  घालून हात जोडून नितीन म्हणाला.

          शिव,”नाही साहेब तुमच्या  जागी  आम्ही  असातो,तर  आमचा  हि असाच  गैर  समाज  झाला  आसता. आणि आम्ही पण अशीच  मारामारी  केली  असती. आपल्या  डोळ्या  समोर  आपल्या बहिणीची  अब्रू  लुटत  असताना  कुठला  भाऊ  गप्प  बसेल ?”

     असे  म्हणून  ते  दोघेही  एकमेकांना  मिठी  मारतात.

                 

       

 

                                   The End

 

Related posts

One Thought to “FARMHOUSE short Story Genre-Drama of Misunderstanding Themes-morality playground ko hindi mein kya bolate hain”

Leave a Comment